प्रस्तावना:
आमचा भारत देश हा ऋतूंचा देश आहे. या देशामध्ये प्रत्येक ऋतू हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासह येतो.
त्यापैकी आमच्या भारत देशामध्ये एकामागून एक येणाऱ्या सर्व ऋतूंपैकी पावसाळा हा ऋतू सर्वांचा आवडता ऋतू आहे. कारण पावसाळा हा सार्वजनिक जीवनाचा आधार आहे. पावसाळा हा ऋतू सर्व ऋतूंचा राजा आहे.
या ऋतूमुळे निसर्गात अनेक प्रकारचे बदल होतात. तसेच पावसाळा या ऋतूचे सर्वात जास्त महत्त्व आहे.
वर्षा ऋतूचे आगमन
आमच्या भारत देशात पावसाची सुरुवात ही जुलै महिन्यापासून होते आणि हा पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो.
उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच आपल्या देशातील शेतकरी पावसाची वाट बघत आकाशाकडे पाहत असतात.
पावसाच्या आधीची स्थिती
पाऊस पडायच्या आधी उन्हामुळे संपूर्ण धरती तेव्हा समान तापलेली असते. प्रखर उन्हामुळे सगळी सडे – झुडपे, वनस्पती सुकुन जातात. तसेच पाण्याचे सगळे स्रोत सुखतात.
तसेच सगळे पशु – पक्षी पाण्यासाठी व्याकुळ होतात आणि पाण्याच्या शोधात असतात. भयंकर उष्णतेमुळे सर्वांचे जीवन त्रस्त होते. संपूर्ण सजीव सृष्टी दुखी होऊन आपल्या मनाला शांती मिळविण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसतात.
वर्षा (पावसाचे) वर्णन
आषाढ महिना सुरु होताच आकाशात काळे ढग दिसू लागतात. दिवसेंदिवस आकाशात काळे ढग दिसतात.
त्यानंतर काही वेळाने पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागतात. पाऊस पडताच सगळे प्राणी आणि पक्षी आनंदित होऊन नाचू लागतात. पावसाच्या पाण्यामुळे सर्व झाडे हिरवीगार होतात आणि त्यांना नवीन जीवनदान मिळते.
पावसाळ्यात झाडांना नवीन पालवी येते. गवत सुद्धा हिरवेगार, सुंदर आणि आकर्षक दिसू लागते. संपूर्ण वातावरण एकदम स्वच्छ दिसू लागत आणि मनाला शांती मिळते.
शेतकऱ्यांसाठी पावसाळा ऋतू
भारतातील शेती ही पावसावरच अवलंबून आहे. शेतकरी हे पावसाची खूप आतुरतेने वाट पाहतात. पावसाच्या हंगामात शेतकरी आपल्या पिकांच्या कल्याणासाठी भगवान इंद्र देवाला प्रार्थना करतात.
भगवान इंद्र देव हे भारतातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. कारण इंद्रदेवाला ‘वर्षा ऋतूचा स्वामी’ म्हटले जाते.
पावसाळ्यात इंद्रधनुष्य
जेव्हा आकाश साफ, सुंदर आणि हलके निळे दिसू लागते तेव्हा कधी – कधी सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो. त्यावेळी संपूर्ण वातावरण सुंदर आणि आकर्षक दिसते. काही ,उले इंद्रधनुष्य दिसल्यावर खूप आनंदित होतात.
पावसाळयात विविध सण
पावसाचे आगमन झाल्यावर भारत देशामध्ये एकामागून एक सण येतात. पाऊस पडल्यावर सणांचा उत्सव जसा भारतात होतो तसतसे प्रत्येकाला पावसापासून आनंद मिळतो.
त्यावेळी संपूर्ण वातावरण थंड आणि मोहक बनते. जसे कि भारतात रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, दिवाळी इ. अनेक सण साजरे केले जातात.
सर्व ऋतूंचा राजा
वर्षा ऋतू (पावसाळा) सर्व ऋतूंचा राजा असे म्हटले जाते. कारण पावसाळ्याच्या हंगाम हा तप्त उन्हाळ्यानंतर येतो. पावसामुळे सर्व सजीव सृष्टीला आणि भारतीय लोकांना मोठा दिलासा मिळतो. पावसाळा हा ऋतू सर्वाना आवडतो.
पावसाळ्याचा निर्सगावर प्रभाव
पावसाळ्यात सगळी मैदाने आणि बगीचे सुंदर दिसतात. मैदाने आणि बगीचे हे हिरव्या मखमली गवतानी झाकले जातात. नद्या – नाले, विहिरी, तलाव हे सर्व पाण्याचे स्रोत पाण्याने भरून जातात.
पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी होते. रस्ते आणि क्रीडांगणे सुद्धा पाण्याने भरली जातात आणि माती चिखल बनते. एकीकडे हा पाऊस सर्वाना दिलासा देतो तर दुसरीकडे पावसाळ्यात संक्रमक रोग पसरण्याची भीती असते.
निष्कर्ष:
पावसाळा हा ऋतू आपल्या धरतीसाठी खूप आवशयक आहे. या पावसामुळे आपल्या जीवनात आनंदनाची लाट वाहते. तसेच पावसाचे पाणी हे धरतीवरील सगळ्यांसाठी अमृत म्हणून काम करते.
पावसाळ्यात चोहीकडे हिरवळ आणि पाणीच पाणी असते. आजूबाजूला हिरवळ पाहून मनाला शांती मिळते. म्हणून पावसाळा या ऋतूला सर्व ऋतूंमध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे.
मराठीत पावसाळा (वर्षा ऋतू) निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.