reading

वाचनाचे महत्त्व मराठी निबंध – वाचा येथे Vachanache Mahatva Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे. आपण सर्वजण शाळेत असल्यापासून वाचनाचे महत्त्व ऐकत आलो आहोत. कारण शाळेत शिक्षक नेहमी वाचन किती महत्वाच हे सांगत असतात.

जे लोक अन्य पुस्तकांचे वाचन करतात त्यांना अनेक फायदे देखील होते. मनुष्याजवळ असलेले ज्ञान हे त्याची फार मोठी शक्ती आहे. कारण याच शक्तीच्या साहाय्याने मानव हुशार व चपळ बनतो.

मागच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीचे वाचन हे अगदी सोपे झाले आहे. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वाचनाची आवड निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत बनतो.

वाचन म्हणजे काय –

वाचनवाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धी अधिक वाढते. तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे आणि आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.

त्याच बरोबर आपले जीवन परिपूर्ण बनवण्यासाठी वाचन गरजेचे आहे. आपल्या ज्ञानामध्ये अधिक वाढ करण्यासाठी वाचन हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे.

वाचनालय

विद्यालय के पुस्तकालय पूर्वीच्या काळी अन्य विषयांची पुस्तके मिळण्याची जागा म्हणजे – वाचनालय होय. आजच्या आधुनिक युगात सुद्धा वाचनालये विकसित आहेत. या वाचनालायत साहित्य, ग्रंथ, निबंध लेखन पुस्तक अशी अनेक प्रकारची पुस्तके असतात.

परंतु आज या पुस्तकांची जागा ही इंटरनेट ने घेतली आहे. आज ऑनलाईन साईट यामुळे अन्य विषयांवरील पुस्तके ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे.

वाचनाचे फायदे

पब्लिक पुस्तकालयडॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, वाचाल तर वाचाल हे अगदी खरे आहे. कारण मानव वाचन करून आपल्या जीवनाचा विकास करू शकतो.

1) वाचन केल्याने मेंदूला चालना मिळते आणि नवनवीन शब्दांमुळे त्याच्यामध्ये प्रगती होते.

2) विविध विषयांची पुस्तके वाचल्यामुळे नवीन माहिती मिळते आणि आपल्या ज्ञानात अधिक भर पडते.

3) वाचनामुळे आपली शब्द संपत्ती वाढते.

3) ज्याचा उपयोग आपण निबंध, लेखन आणि भाषणामध्ये करू शकतो.

4) तसेच लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, ललित लेख आणि कविता यांची या सर्वांविषयी माहिती मिळते. यामुळे आपल्या सामन्यात ज्ञानात भर पडते.

मनोरंजनाची साधने

पंचतंत्र पुस्तकआज आपल्याला मनोरंजन करण्यासाठी अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. जसे की दुरदर्शन, संगणक आणि मोबाइल फोन यामध्ये इंटरनेटच्या साहाय्याने अनेक खेळ खेळू शकतो, गाणे ऐकू शकतो, फिल्म बघू शकतो इ आहेत. ही साधने आपल्याला केवळ मानसिक आनंद देतात. परंतु त्याऐवजी आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आनंद मिळवू शकतो.

आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा लेखकाचे म्हणणे ऐकत असतो. परंतु सध्याच्या जीवनामध्ये ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नसतो.

वाचन केल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते आणि हे ऐकण्यासाठी सर्वात प्रथम संयम जरुरी आहे. वाचनामुळे आपोआप संयम राखायला शिकतो.

आज अनके संधी या वाचनामुळे प्राप्त होतात. कारण ज्याचे वाचनीय ज्ञान हे चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळतात. जर वाचन चांगले असेल तर ई – मेल समजून घेण्यास मदत होते. त्याच बरोबर कामाची गती सुद्धा वाढते.

निष्कर्ष:

वाचन हे आपल्या सर्वांसाठी अधिक उपयुक्त आहे. म्हणून आपण सर्वानी पुस्तके वाचली पाहिजेत आणि इतरांना सुद्धा वाचायला सांगितली पाहिजेत. जेणेकरून आपली वाचन संस्कृती ही जपली जाईल.

तसेच वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरित केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आवडत्या विषयापासून वाचनाची सुरुवात केली पाहिजे आणि वाचनाचा आनंद घेतला पाहिजे.

तसेच आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment