प्रस्तावना:
आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एक असा ग्रह आहे. ज्यावर मानवाचे जीवन अस्तित्वात आहे. इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर मानवी जीवन नाही.
कारण तिथे मानवाला उपलब्ध संसाधने नाही आहेत. म्हणून पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे. या ग्रहावर मानवाला हवा, पाणी, निसर्ग आणि जमीन या सर्व मूलभूत गोष्टी उपलब्ध आहेत. यामुळे मानवाचे जीवन अत्यंत सुखदायकआहे.
तसेच या धरतीवरील वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. इतर प्रकारच्या वृक्षांमुळे निसर्गाचे सौंदर्य फुलून दिसते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वृक्षांचे महत्त्व आहे.
वृक्ष हे मानवाचे मित्र सुद्धा असतात. आमच्यासाठी सर्व प्रकारचे वृक्ष हे खूप उपयुक्त असतात आणि वृक्षांपासून आपल्याला खूप फायदा होतो.
ऑक्सिजन प्राप्त
वृक्षांमुळे मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच त्यांच्यापासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच वृक्ष हे सर्व सजीवांना आणि मानवाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन प्राप्त करतात. त्याच प्रमाणे ते सजीवांना हानिकारक असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडला अवशोषित करतात.
वृक्षांच्या लाकडाचा उपयोग
मानव वृक्षांच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. ग्रामीण भागातील लोक हे वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात. तसेच मानव घरे बांधण्यासाठी करतो.
मानव वृक्षांच्या लाकडापासून खिडक्या, दरवाजे आणि विविध प्रकारची तयार करतो. त्याच प्रमाणे उद्योगांना कच्चा माल सुद्धा तयार केला जातो. वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस इ.केली जातात.
विविध प्रकारची औषधे
सुपीक जमीन
भारतीय संस्कृती महत्त्व
वृक्ष आणि मानव यांचा अतूट संबंध आहे. निसर्गाच्या इतर गोष्टींप्रमाणेच आपल्या भारतीय संस्कृतीत वृक्षां फार महत्त्व दिले गेले आहे.
हिंदू धर्मामध्ये वृक्षांची पूजा केली जाते. जसे कि, वड, पिंपळ, तुळस, पीपल यांसारख्या वृक्षांना देवाचे निवास स्थान मानले जाते.
निसर्गाचे सौंदर्य
जेव्हा एखाद्या व्यक्तीला कधी – कधी थकल्यासारखे वाटते तेव्हा ती व्यक्ती या निसर्गाच्या हिरव्यागार छायेत जाऊन बसते. निसर्गाचा तो हिरवा रंग, एकांतांचे ते वातावरण आणि मिळणारी शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न होते.
तसेच काही लोक हे पर्यटनाच्या दृष्टीने या निसर्गाचा आनंद घेतात. परंतु आज आपण आपल्या मित्रांसारखी आणि आपल्याला नेहमी साथ देणारी झाडे तोडत आहोत.
वृक्षांची तोड
आज मानव आपली सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी इतका आंधळा झाला आहे कि, तो नेहमी वृक्षांची तोड करत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्याच बरोबर अनेक प्रकारचे प्रदूषण निर्माण होत आहे.
जसे की पाणी प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण इत्यादी. दिवसेंदिवस प्रदूषण जसजसे वाढत आहे तसतसे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. पूर आणि नैगिक आपत्ती निर्माण होऊ लागली आहे.
वृक्ष प्राणी आणि पक्ष्यांचे निवासस्थान
ज्या प्रमाणे मानवाला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे पशु – पक्ष्यांचे सुद्धा राहायला घर हवे असते. म्हणून निसर्ग हेच प्राणी आणि पक्षी यांचे निवास स्थान आहे. कारण बहुतेक पक्षी हे वृक्षांवर आपला घरटा बांधून राहतात.
निष्कर्ष:
आपल्या सर्वाना वृक्षांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपण झाडे तोडण्याऐवजी जास्तीत – जास्त वृक्ष लावणे गरजेचे आहे. वृक्ष हे आपले खरे मित्र आहेत हे जाणून घेऊन आपण त्यांचे संगोपन आणि संरक्षण केले पाहिजेत.
म्हणून आपल्या भारत देशात दरवर्षी १ जुलै पासून ७ जुलै पर्यंत वन दिवस साजरा केला जातो आणि सर्व लोकांना वृक्षचे महत्त्व पटवून सांगितले जाते.