प्रस्तावना:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, ज्यावर मानवाचे जीवन अस्तित्वात आहे. कारण या ग्रहावर मानवाला विविध प्रकारची संसाधने उपलब्ध आहेत.
या सर्व संसाधनांचा वापर मानव आपल्या जीवनामध्ये करतो. ईश्वराने या निसर्गाची रचना अत्यंत सुंदर प्रकारे केली आहे.
ज्यामध्ये प्राणी, पक्षी, नदी – नाले, पर्वत, डोंगर, समुद्र, झाडे, जमीन या सर्वांचा समावेश या निसर्गामध्ये आहे. झाडे ही निसर्गाचा सर्वात महत्वाचा हिस्सा आहे. तसेच मानवाच्या जीवनाचे अस्तित्व आहे.
या झाडांशिवाय मानव आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. झाडे ही पृथ्वीवरील एक अमूल्य संपदा आहे. या झाडांमुळेच मानव आपल्या मूलभूत गरज पूर्ण करू शकतो.
झाडांपासून मिळणाऱ्या विविध गोष्टी
तसेच मानवाला झाडांपासून शुद्ध हवा मिळते. झाडे सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देतात आणि स्वतः कार्बन डाय ऑक्साईड अवशोषित करतात. त्याच प्रमाणे काही प्राणी किंवा मनुष्य झाडांच्या सावलीत विश्रांती घेतात.
झाडांचा उपयोग
तसेच मानव झाडांपासून रबर, माचीस आणि कागद या वस्तू तयार करतो. मानवाने झाडांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी सुद्धा तयार केली आहे.
वन्यजीवांच्या जीवनात झाडांचे महत्त्व
घरटा बांधण्यासाठी ते झाडाच्या फांदीचा उपयोग करतात. तसेच त्यांना झाडांमुळेच अन्न प्राप्त होते. प्राणी आणि पक्षी उन्हाळ्यात कडक उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीत बसतात.
त्याच प्रमाणे काही प्राणी हे शिकार करण्यासाठी झाडांच्या मागे लपतात. म्हणून ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात झाडे आढळून येतात तिथे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात.
झाडांपासून मिळणारे लाभ
तसेच काही झाडांमध्ये औषधी गुण असतात. त्यामुळे अन्य प्रकारचे आजार बरे करण्यासाठी झाडांच्या पानांचा उपयोग केला जातो.
झाडांमुळे पाऊस पडण्यास मदत होते. म्हणून झाडांमुळे चांगला पाऊस पडतो. ज्यामुळे नद्या आणि तलाव यांची भूजल पातळी वाढते.
झाडांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग थंड राहतो आणि तापमानाचे प्रमाण वाढत नाही.
झाडांमुळे जमीन सुपीक बनते.
तसेच झाडे मातीला घट्ट धरून ठेवतात आणि पुराच्या वेळी माती वाहून नेण्यास रोखण्याचे कार्य करतात.
झाडांची तोड
आज मनुष्य आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करत आहे. मनुष्य झाडांचे मूल्य आणि महत्त्व विसरून गेला आहे. आज मनुष्य जंगलांची तोड करून सिमेंटच्या इमारती उभ्या करत आहे.
त्यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. तसेच विविध प्रकारच्या प्रदूषणाच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पाऊस वेळेवर पडत नाही आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत.
निष्कर्ष:
झाडे ही आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग आहे. झाडे आपल्या जीवनाचा आधार आहेत. म्हणून या पृथ्वीवरील झाडांना हिरवे सोने असे म्हटले जाते. झाडांची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
तसेच आपण सर्वानी मिळून वृक्षतोड कमी करून जास्तीत – जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. झाडांची तोड रोखण्यापासून सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे.