प्रस्तावना:
भारत देश हा उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये अन्य प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी तीन सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.
जसे की स्वतंत्रता दिवस (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिवस (२६ जानेवारी), आणि महात्मा गांधी इ. या भारतीय तीन राष्ट्रीय सणांपैकी स्वतंत्रता दिवस हा भारत देशाचा सर्वात महत्वाचा सण आहे.
तसेच हा भारतीय इतिहासातील सर्वात भाग्यशाली दिवस आहे. स्वतंत्रता दिवस हा सर्व भारतीय लोकांना आपल्या मिळालेली आझादीची आठवण करून देतो.
भारताला स्वातंत्र्य
१५ ऑगस्ट, १९४७ साली भारत देश ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. आमचा भारत देश हा जगाच्या नकाशात एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
या दिवशी भारत देशाने एक स्वतःचे संघ राज्य निर्माण केले होते. म्हणून हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान
भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. १५० वर्ष सर्व भारतीयांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या.
कित्येकांना फाशीची शिक्षा देण्यात आली तर कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला. आपण १८५७ पासून ब्रिटिश सरकारशी संघर्ष करत होतो. कित्येक लोकांना युद्धाच्या यज्ञ कुंडात आपल्या प्रमाणाची आहुती द्यावी लागली. कित्येक संसार नष्ट झाले.
या सर्वांच्या बलिदानामुळे भारत देश आज सोनियाचा दिवस पाहू शकला. १५ ऑगस्ट, १९४७ साली युनियन जॅक खाली उतरून तिरंगा भारत देशाची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला.
१५ ऑगस्ट (स्वतंत्रता दिवस) सोहळा
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान भारताची राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वतंत्रता दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करतात. तसेच देशाच्या तिरंग्याला २१ तोपांची सलामी दिली जाते.
त्यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान म्हटले जाते. या दिवशी ब्रिटिश सरकारच्या पंज्यापासून भारत मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते.
स्वतंत्रता दिनाच्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांच्या द्वारे भाषण दिले जाते. या दिवशी अनेकी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केला जाते.
लोकतांत्रिक देश
देशाच्या आझादीनंतर भारत देश हा एक सर्वात लोकतांत्रिक देश बनला. या भारत देशामध्ये विविधता मध्ये एकताची भावना दिसून येते. या भारत देशात विविध जातीचे आणि धर्माचे लोक राहतात.
या देशात जाती, पंथ, धर्म, भाषा आणि वेश यांमध्ये विविधता असूनही सर्व लोक एकत्र मिळून – मिसळून राहतात. म्हणून आमचा भारत देश हा एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.
तसेच हा देश एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळख निर्माण झाली. भारताची सहिष्णुता, अहिंसा आणि त्याग या तत्त्वांचे जगात स्वागत झाले.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वतंत्रता दिवस
स्वतंत्रता दिवस हा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व सरकारी संस्थानांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी शाळा आणि महाविद्यालय यामध्ये झेंडा फडकावला जातो. तिरंग्याला सलामी दिली जाते.
तसेच स्वतंत्रता दिनाच्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध खेळांचे आयोजन केले जाते. या दिवाही संपूर्ण देश देशभक्ती गाण्यांनी गुंजन उठतो. यादिवशी प्रभात फेऱ्या काढल्या जातात. तसेच लहान मुले हातात झेंडा घेऊन फिरतात.
निष्कर्ष:
भारत हि आपल्या सर्वांची मातृभूमी आहे आणि आपण या देशाचे नागरिक आहोत. आपल्या भारत देशाला कित्येक वर्ष संघर्ष करून आणि स्वतंत्रता सैनिकांच्या बलिदानामुळे आजादी मिळाली. म्हणून आपण सर्वानी देशाच्या तिरंग्याचा सम्मान केला पाहिजे.
मराठीत स्वतंत्रता दिवस निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.