प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये तीन सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. त्या तीन सणांपैकी स्वातंत्र्य दिवस हा भारत देशाचा सर्वात विशेष महत्वाचा सण आहे. स्वतंत्रता दिवस हा सर्व भारतीयांसाठी सर्वात महत्वाचा आणि भाग्यशाली दिवस आहे.
हा भारत देशाच्या आजादीचा दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी सर्व भारतीय हे इंग्रजांचे गुलाम होते. इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार आणि अन्याय करत असत.
या त्रासामुळे भारतीय लोक खूप त्रस्त झाले आणि त्यांच्या मनात बंडखोरांची ज्योत पेटली आणि देशातील अनेक विराणी आपल्या प्राणांची बाजी लावून, तसेच काहींनी आपल्या अंगावर गोळ्या झेलत या भारत देशाला ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त केले.
आपला भारत देश १५ ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला म्हणून याला ‘स्वातंत्र्य दिवस’ असे म्हटले जाते. म्हणून स्वतंत्रता दिवस संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.
“स्वतंत्रता” सैनिकांचे योगदान
भारत देशाला आजाद करण्यासाठी अनेक महान स्वतंत्रता सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. काहींनी लाठ्या खाल्ल्या तर काहींना तुरुंगवास भोगावा लागला. जसे कि सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी क्रांतीची आग पसरली आणि आपल्या जीवनाचा त्याग केला.
तसेच महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्य व अहिंसा तसेच शस्त्राविना संघर्ष करूनब्रिटिशाना आपला भारत देश सोडून जाण्यास भाग पाडले. या सर्व महान स्वतंत्रता सैनिकांच्या कार्यामुळे आणि महानतेमुळे भारत ‘सोनियाचा दिवस’ पाहू शकला.
“सर्वात” प्रथम झेंडावंदन
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात प्रथम १५ ऑगस्ट, १९४७ साली आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या कीलहोरी गेटच्या वर भारत देशाचा तिरंगा ध्वज फडकावला. ज्यामुळे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान दरवर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात.
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान हे ध्वजारोहण करतात. देशाच्या तिरंग्याला २१ तोफांची सलामी दिली जाते. तसेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायिले जाते.
त्याच प्रमाणे ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून आपल्या भारत देशाची सुटका करण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचे रान केले आणि आपले आयुष्य वेचले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि आपल्या देशाची सीमेवर राहून रक्षा करणाऱ्या शहीद जवानांना सुद्धा श्रद्धांजली वाहिली जाते. स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण देश देशभक्ती गाण्यांनी गुंजून उठतो.
तसेच या दिवशी लाल किल्ल्यावर आपला देशाचे पंतप्रधान यांच्या द्वारे भाषण दिले जाते आणि सास्कृतिक कार्यक्रमणाचे आयोजन सुद्धा केले जाते.
शाळा व महाविद्यालये यांमध्ये ध्वजारोहण
तसेच स्वतंत्रता दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये यामध्ये सुद्धा ध्वजारोहण केले जाते. तसेच यादिवशी नाच गाणी आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अनेक खेळांचे प्रदर्शन केले जाते.
स्वतंत्रता दिनाच्या दिवशी शाळेतून प्रभात फेरी काढली जाते आणि लहान मुले हातातून झेंडे घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत सहभागी होतात. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्था यांना सुट्टी दिली जाते.
धर्मनिरपेक्ष देश
आपल्या स्वतंत्र भारत देशात विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन इत्यादी. राहतात म्हणून भारत देश हा एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.
त्याच प्रमाणे अधिक लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या भारत देशाची संपूर्ण जगात ओळख निर्माण झाली.
निष्कर्ष:
आपण सर्वानी आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. कारण अनेक वर्ष संघर्ष करून तसेच काही महान स्वतंत्रता सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन या भारत देशाला आजादी मिळवून दिली आहे. म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे कि, भारताचे नागरिक या नात्याने आपल्या तिरंग्याचा दुरुपयोग करू नये.