प्रस्तावना:
आमचा भारत देश हा एक विविधता आणि संस्कृती वाला देश आहे. या देशाला प्राचीन काळी सुवर्ण पक्षी या नावाने ओळखले जात असे.
भारत देश हा एक विकसनशील देशांच्या यादीमध्ये येतो. परंतु या देशावर काही विदेशी आक्रमण झाल्याने देशाची स्थिती वाईट झाली. या देशातील नागरिक हे स्वच्छतेवर विशेष ध्यान देत नव्हते.
त्यामुळे देशामध्ये कुडा – कचरा हा मोठ्या प्रमाणात वाढू लागला होता आणि कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने अन्य प्रकारची रोगराई पसरू लागली. म्हणून स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने चालवलेल्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे.
स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात
आमच्या भारत देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात २ आक्टोबर, २०१४ साली महात्मा गांधी जयंती निमित्त केली होती. स्वच्छ भारत अभियानाला स्वच्छता अभियान असे सुद्धा म्हटले जाते.
स्वच्छतेच्या प्रति भारत देशाची प्रतिमा बदलण्यासाठी श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला या मोहीमेला जोडण्यासाठी जन आंदोलन करून याची सुरुवात केली.
महात्मा गांधीजींचे स्वप्न
आमच्या भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी हे देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी स्वच्छतेला खूप महत्त्व देत असत. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेला ईश्वर भक्तीप्रमाणे मानून देशातीळ सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावले.
त्यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचे शिक्षण दिले. महात्मा गांधी यांचे स्वप्न होते कि, देशातील सर्व नागरिकांना एकत्र करून देश स्वच्छ करणे. महात्मा गांधी स्वतः ज्या आश्रमात राहत असत. त्या आश्रमाची सकाळी पहाटे ४ वा. उठून साफ – सफाई करत असत. महात्मा गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले.
स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश
स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे कि, भारत देशातील सर्व शहरे आणि गावे ही हागणदारी मुक्त करणे.
त्याच बरोबर याचा दुसरा उद्देश म्हणजे रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे. स्वच्छ भारत अभियानाविषयी सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे.
स्वच्छ भारत अभियानाला संजीवनी
भारत देशाचा स्वच्छ भारत अभियान सुरु करण्याचा हा प्रथमच प्रयत्न नाही. तर सन १९९९ मध्ये भारत सरकारने संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले.
ज्याचे नाव पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘निर्मल भारत अभियान’ असे ठेवले. परंतु स्वच्छ भारत अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली.
स्वच्छ भारत अभियानाची मुख्य उद्दिष्ट्ये
खुल्या जागेवर शौच करण्यास रोखले पाहिजे. कारण त्यामुळे दरवर्षी हजारो मुलांचा मृत्यू होतो.
शौचालय वापरण्यास प्रोत्साहन देणे.
तसेच स्वच्छता वापरून लोकांची मानसिकता बदलणे.
स्वच्छतेच्या माध्यमातून सर्व लोकांमध्ये जन जागृती निर्माण करणे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुक्या व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन सुनिश्चित करणे.
स्वच्छतेचे महत्त्व
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये स्वच्छता ही ठेवली पाहिजे. जर आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ सेल तर कोणतीही रोगराई पसरू शकत नाही. स्वच्छतेमुळे आपली जीवन शैली सुद्धा बदलून जाते.
आपल्याला हे सर्व माहित असून सुद्धा आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो परंतु परिसराकडे मात्र दुर्लक्ष करतो. घर हे आपले असते आणि परिसर हा दुसऱ्याचा असतो.
यामुळे आपण या पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. स्वच्छता ठेवणे हे फक्त सरकारचे काम नाही आहे तर या भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
निष्कर्ष:
आम्हाला जर स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सरकारला आणि देशातील सर्व लोकांना एकत्र मिळून काम करावे लागेल.
तसेच सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात महत्वपूर्ण सहभाग घ्यावा लागेल. त्याच बरोबर सर्व लोकांच्या मनामध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण केली पाहिजे.
मराठीत स्वच्छ भारत अभियान निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.