प्रस्तावना:
स्वच्छता करणे हा एक महत्वपूर्ण गुण आहे आणि हा गुण प्रत्येकाच्या अंगी असणे गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे मानवाचे जीवन सुंदर बनू शकते.
स्वच्छतेची सुरुवात ही प्रत्येक व्यक्तीने आपल्यापासून केली पाहिजे. स्वच्छता ही केवळ माणसाने आपल्या घरापुरतीच नाही केली पाहिजे तर आपला देश, गाव सुद्धा साफ – सुथरा ठेवला पाहिजे.
म्हणून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरु केली.
स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात
स्वच्छ भारत करणे हा भारत सरकारचा प्रथमच प्रयत्न नाही आहे. यार सन १९९९ मध्ये भारत सरकारने ‘स्वच्छता अभियान’ सुरु केले होते. त्यानंतर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या योजनेचे नाव ‘निर्मल भारत अभियान’ असे ठेवले होते.
स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश
स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा हेतू महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती पर्यंत ग्रामीण भागातील १२ दशलक्ष शौचालये आणि शहरात स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देणे. त्याच बरोबर सन २०१९ पर्यंत भारत देशाला हागणदारी मुक्त करणे.
स्वच्छ भारत अभियान
तसेच या अभियानात विविध अभिनेते आणि क्रिकेटपटूनी सहभाग घेतला आहे. जसे कि सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी, प्रियांका चोप्रा इत्यादि. नी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच बरोबर अनेक लोकांनी हातात झाडू घेऊन रस्ते साफ केले.
स्वच्छतेचे महत्त्व
तर काही लोक सकाळी पहाटे जॉगिंगला जातात. अशा चांगल्या सवयींच्या परिणाम आपल्या जीवनावर होतो. स्वच्छ मैदानात मुले खेळ खेळतात. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे.
परंतु आजही काही लोक स्वच्छतेबद्दल एवढ सगळ माहित असून सुद्धा बेजबाबदार प्रमाणे वागतात. मानव फक्त आपले घर स्वच्छ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो.
स्वच्छता ठेवण्याचे उपाय
प्रत्येक व्यक्तीला स्वच्छता ठेवण्यासाठी खालील प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. जसे कि,
प्रत्येक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर बाटल्या, खाद्य पदार्थाची पाकिटे ही एका कागदात जमा करून कचरा पेटीत टाकावी.
ओला कचरा आणि सुखा कचरा अने दोन भागात विभाजन करून नगर पालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या गाडीत नेऊन टाकावा.
कोणी रस्त्यावर थुंकत असेल किंवा घाण टाकत असेल तर त्याला अडवले पाहिजे.
निष्कर्ष:
स्वच्छ भारत अभियान हे एक भारत सरकारने उचललेले एक प्रचंड आणि महत्वपूर्ण पाऊल आहे. जर आपल्याला स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारला आणि देशातील सर्व नागरिकांना एकत्र मिळून काम केले पाहिजे.
तसेच सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि साथ दिली पाहिजे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला असे वाटले पाहिजे कि आमचे शर हे आमचे प्रयत्न आणि आमची प्रगती हीच देशाची प्रगती. म्हणून सर्व लोकांनी मिळून स्वच्छ भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मराठीत स्वच्छतेचे महत्त्व निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.