स्वच्छ भारत अभियान वर निबंध मराठी – वाचा येथे Swachata Abhiyan Essay in Marathi

प्रस्तावना:

स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने उचललेले एक प्रचंड पाऊल आहे. हे एक साफ – सफाई  अभियान आहे.

स्वच्छता अभियान हा एक महत्वाचा विषय आहे. स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय स्तरावरचे अभियान आहे. या अभियानातून सगळ्या भारतवासियांना स्वच्छतेचे महत्त्व आणि फायदे याची जाणीव करून देण्यासाठी सुरु केले आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वच्छता ही घरापुरतीच नाही केली पाहिजे. त्याच बरोबर देशाला सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणून या अभियानाची सुरुवात केली गेली.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर, २०१४ रोजी केली. त्यांनी या देशातील सर्व भारतवासियांना एकत्र करून या मोहिमेला सुरुवात केली.

स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश

स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे कि, भारतातील सर्व शहरे आणि गावे हगणदारी मुक्त करणे.

प्रत्येक गावात आणि शहरात सौचालयांची निर्मिती करणे असा होता. तसेच या अभियाना द्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. तसेच भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे.

महात्मा गांधीचे स्वप्न

आमच्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते कि, भारत देशाला एक स्वच्छ भारत बनविण्याचे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

या आधी सन १९९९ मध्ये भारत सरकारने स्वच्छता अभियान सुरु केले होते. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याचे निर्मल भारत अभियान असे नाव ठेवले. परंतु स्वच्छ भारत अभियानाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी मिळाली.

महात्मा गांधीजींचे कार्य

Essay On Mahatma Gandhi in Hindiमहात्मा गांधीजीनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटीश सरकारला छोडो भारत असे सांगितले तसेच त्यांनी सर्व भारतीयांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला.

महात्मा गांधीजी हे स्वच्छतेला ईश्वर पूजेप्रमाणे मानत असत. महात्मा गांधीजी स्वतः ज्या आश्रममध्ये राहत असत त्या आश्रमची सकाळी ४ वा. उठून साफ – सफाई करत असत. त्यांनी हातात झाडू घेऊन आश्रम साफ करत.

तसेच त्यांनी लोकांना सांगितले कि, हातात झाडू, खराटे घेऊन आपला देश स्वच्छ करूया आणि अन्य प्रकारच्या रोगांना दूर करूया.

स्वच्छताची जरुरत

हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते कि, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा सहवास असतो. परंतु काही लोक धार्मिक स्थळांवर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन कुडा – कचरा टाकतात आणि त्या जागेवर प्रदूषित करतात. त्यामुळे अन्य प्रकारचे आजार पसरतात. या सगळ्याचा परिणाम मानवाच्या शरीरावर होतो.

संत तुकडोजी महाराज म्हणतात –

संत तुकडोजी महाराज यांच्या रचित ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातील ५० व्या ओवीमध्ये सांगितले आहे कि, गाव चांगले असेल तर देशाचे भविष्य सुद्धा चांगले होऊ शकते.

गावाच्या आणि देशाच्या विकासासाठी अनेक संतानी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचे मोलाचे योगदान महत्वाचे आहे.

त्यांनी ईश्वराच्या पूजे बरोबरच श्रमातून भक्ती करा आणि गाव चांगले ठेवा यातूनच देशाचा विकास होऊ शकतो. असा संदेश दिला.

स्वच्छता ठेवण्यासाठी “करावयाचे” उपाय

कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर बाटल्या तसेच खाद्य पदार्थांची पाकिटे एका कागदात जमा करून कचरा कुंडीत टाकावी.

ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही वेगवेगळे करून नगर पालिकेच्या जमा करणाऱ्या गाडीत टाकावा.

कोणत्याही व्यक्तीने रस्त्यावर थुंकू नये आणि जर कोणी कचरा व घाण टाकत असेल तर त्याला रोकले पाहिजे.

निष्कर्ष:

स्वच्छता सुरुवात ही प्रत्येक व्यक्तीने आपल्यापासून करायला हवी. आम्ही सगळे या भारत देशाचे नागरीक आहोत. म्हणून सर्वांचे कर्तव्य आहे कि, आपला देश हा स्वच्छ ठेवला पाहिजे.

मराठीत स्वच्छ भारत अभियान निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Updated: नवम्बर 14, 2019 — 11:02 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *