स्त्री भ्रूण हत्या वर निबंध मराठी – वाचा येथे Stri Bhrun Hatya Essay in Marathi Pdf

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे. या देशामध्ये पुरुषांना जास्त महत्व दिले जायचे. परंतु प्राचीन काळामध्ये स्त्रियांना सुद्धा महत्वाच स्थान देण्यात आळे होते. स्त्रीची पूजा केली जात होती. स्त्रीला एक देवीच्या बरोबरीने मानले जायचे.

कालांतराने देशावर विदेशी आक्रमण झाल्यामुळे स्त्रियांची स्थिती गंभीर झाली. स्त्रियांवर भरपूर अन्याय आणि अत्याचार केले जायचे.

विविध कथांमध्ये स्त्रीची भूमिका

परंतु विभिन्न कथांमध्ये देवादिकांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आदिशक्ती म्हणजे स्त्री जातीने शक्य करून दाखवल्या आहेत. अशा अनेक कथा आहेत त्यामध्ये महिषासुराचा वध किंवा सीतेची अग्नी परीक्षा.

आज आपण सर्व धन्प्रपातीसाठी – लक्ष्मीमाता, विद्येसाठी सरस्वती, संकट मुक्तीसाठी – दुर्गा देवीची उपसानाना करतो. परंतु आदिशाक्तींची पूजा करताना आपल्या भारतीय समाजात नवीन जन्माला येणाऱ्या स्त्रीला नाकारतो. तिचा जन्म होण्या आधीच तिची हत्या करतो.

मनुष्याचे वाईट विचार

काही लोकांना वाटायचं कि मुलगा आपल्या वंशाचा दिवा असतो आणि मुलगी दुसऱ्या घराला जाणारी असते. म्हणून काही लोक मुलगी जन्माला येताच तिला मारायचे. त्याच बरोबर देशात  विविध प्रथा रूढ होत्या. त्या सर्वाना स्त्रीला सामोरे जावे लागत असे.

विविध प्रथा

प्राचीन काळात भारतीय समाजात बाल विवाह, हुंडा प्रथा, स्त्री भ्रूण हत्या, सती प्रथा इ. विविध प्रथांना सामोरे जावे लागत असे.

काही लोक गरिबीमुळे स्त्रीची हत्या करत असत. तर काही लोक मुलीच्या लग्नाला दिला जाणारा हुंडा नसल्यामुळे तिला मातेच्या गर्भातच मारले जायचे.त्याकाळी स्त्रियांना घरातून बाहेर जाण्याची परवानगी सुद्धा नाही होती.

संबंधित लेख:  पानी प्रदूषण मराठी निबंध - वाचा येथे Essay on Water Pollution in Marathi

तिच्यावर फक्त घर सांभाळण्याची जबाबदारी दिली जात असे. स्त्रीला शिकायला सुद्धा शाळेत पाठवले जायचे नाही. प्राचीन काळी स्त्रीला अबला नारी ही संज्ञा दिली जात असे.

महान स्त्रियांची भूमिका

आमच्या भारत देशामध्ये काही महान स्त्रियांनी या देशासाठी आपल्या जीवनाचा त्याग केला आहे. जसे कि झाशीची राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला इ. स्त्रियांनी या देशाचे नाव लौकिक केले आहे. यांनी देशकार्य करण्यासाठी आपली महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

आजची स्त्री

आमच्या भारतीय संविधामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे जगायचं अधिकार दिला गेला आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला तिचा अधिकार आणि हक्क दिला गेला आहे. आजची स्त्री घरामधून बाहेर पडून प्रत्येक संकटाला सामोरी जाऊ शकते.

तसेच ती आपल्या अधिकार आणि हक्कांसाठी स्वतः लढू शकते. आज स्त्री आपल्या कुटुंबाबरोबर ऑफिसची जिम्मेदारी सुद्धा सांभाळत आहे. आजची स्त्री पुरुषांबरोबर खांद्याला – खांदा मिळवून प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहे.

समाजाला लागलेली कीड

स्त्री भ्रूण हत्या ही एक समाजाला लागलेली कीड किंवा कलंक आहे. या समाजातील कुप्रथेचा समाप्त करण्यासाठी आणि समाजातील लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर आज अनेक सामाजिक संस्था सुद्धा कार्यरत आहेत. सरकारने ही प्रथा बंड करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसेच स्त्री भ्रूण हत्या ही रोकण्यासाठी अनेक कायदे, कानून तयार केले आहेत. जसे कि,

*हुंडा विरोधी कायदा – सन १९६१

*लिंग परीक्षण विरोधी कायदे

*कन्या प्रशिक्षण प्रोत्साहन कायदे

संबंधित लेख:  मदर टेरेसा मराठी निबंध - वाचा येथे Essay on Mother Teresa in Marathi Language

*स्त्रीचे अधिकार आणि हक्क अनुमोदन कायदे

*तसेच कन्यासाठी संपत्तीमध्ये समान अधिकार

निष्कर्ष:

स्त्री भ्रूण हत्या या प्रथेला रोक्ण्य्साठी फक्त सरकारलाच कायदे बनवून चळणार नाही तर त्याबरोबर प्रत्येक व्यक्तीला स्त्री भ्रूण हत्या या विरोधी लढा द्यायला हवा. तसेच अन्य प्रकारचे प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत.

मराठीत स्त्री भ्रूण हत्या निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Updated: November 14, 2019 — 10:35 am

Leave a Reply

Your email address will not be published.