स्वतंत्रता दिवस वर निबंध – वाचा येथे Short Essay On Independent Day In Marathi

प्रस्तावना:

१५ ऑगस्ट १९४७ आपला स्वतंत्रता दिवस म्हणून आपण सर्व भारतीय साजरा करतो. पण या साठी किती थोर व्यक्तींनी बलिदान दिले आहे, आणि ते पण कसे याचा विचार देखील आपण नाही करू शकत.

भारत देश गुलाम

इ.स. १७७० पासून आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. त्यांनी या भारत देशातील नागरिकांना आपले गुलाम बनविले होते. जे इंग्रज आपल्या भारत देशात व्यापार करण्यासाठी आले होते त्यांनी जाणले होते कि, आपला भारत देश एक ‘ सोने कि चिडिया ‘ असा देश आहे.

कारण आपल्या देशात कापूस, गरम मसाले, खाणी , खनिजे याचे उत्पादन हार होते. आपला देश एक श्रीमंत देश म्हंटलं तरी चालेल. या सर्व बाबतींमध्ये. याचाच फायदा इंग्रजांनी घेतला आणि व्यापार कारण्यासाठी आपल्या भारतात घुसून आपल्याला हळू हळू गुलाम बनविले.

भारताचा इतिहास

इंग्रजांनी आपल्या देशात येऊन ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि मोठं मोठे सावकार, श्रीमंत यांच्याकडून व्यापार करू लागले. आणि हे धनिक लोक सामान्य जनतेला आपला गुलाम बनवून हे काम करून घेत. १८८७ चा उठाव हा एक मोठा प्रसंग आपल्या भारत देशाला बघावा लागला.

इंग्रंजांनी हळू हळू आपले सैन्य बनविण्यास सुरवात केली. यात हिंदू, मुस्लिम लोकांना सैनिक बनविले त्यात आपले इंग्रज पण सैनिक होते.

जालियनवाला बॅग हत्याकांड

हि एक दुर्दैवी घटना आपण पहिली आहे. इंग्रजांनी युक्ती करून सर्व भारत आपला करून घेण्याचे ठाणले होते. म्हणून त्यांनी जालियनवाला बागेत लोक फिरण्यासाठी येत असत हे त्यांना माहित होते.

म्हणून त्यांनी एक सभा बसविली, लोक त्या सभेला हजर सुद्धा होते, त्यात लहान मुले स्त्रिया सुद्धा सामील होत्या. या सभेला इंग्रजांनी चारही बाजूनी कडक पहारा दिला होता. आणि अचानक गोळीबार करून लोक सैरावैरा इकडे तिकडे धावू लागली आपला आपल्या मुलांचे जीव वाचविण्यासाठी.

पण शेवटी जागाच न्हवती यातून वाचण्यासाठी. काही स्त्रियांनी आपली आब्रू वाचविण्यासाठी विहिरीत आपल्या मुलांना घेऊन. तो परिसर अगदी भकास आणि रक्ताने भरला होता. हि इंग्रजांची यशस्वी चाल पूर्ण झाली.

आपले शूर स्वातंत्रवीर

भगत सिंग, सुखदेव, राजगुरु हे यांनी तर इंग्रजांना सैरावैरा करून सोडले होते. इंग्रंजांची आगगाडी लुटणे, रात्रभर पहारा करून इंग्रजांच्या सरदारांना मारून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी हलवून टाकली होती.

भगत सिंग राजगुरू, सुखदेव याना अटक झाल. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. यात गांधीजींनी त्यांची शिक्षा माफ व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले, पण भगत सिंग याना इंग्रजांच्या अटी मान्य न्हव्हत्या.

त्यांना माहित होते जर अटी मान्य केल्या तर इंग्रजांचे गुलाम बनूनच राहावे लागेल. म्हणून फाशीची शिक्षा त्यांना मंजूर होती. आणि वयाच्या २४व्या वर्षी भगत सिंग याना फाशीची शिक्षा देण्यात आली.

गांधी चळवळ

गांधीजींनी सुद्धा चले जाओ हे आंदोलन करून इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले होते. या चळवळीत खूप महिलांनी सुद्धा आपला प्रतिसाद दिला होता. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ पटेल, लाल लजपत राय, सारखे दिग्गज चळवळीत सामील होते.

मिठाग्रह सत्याग्रह करून गांधीजींनी इंग्रजांची तोंडाचे पाणी पळविले होते. त्यांनी सुती, मलमली कपडे त्यागून खादि परिधान करून आपला क्रोध व्यक्त केला होता. निळं चळवळ, हरितक्रांती चळवळ अश्या बऱ्याच चळवळी घडून आल्या.

१४ ऑगस्ट १९४७

१४ ऑगस्ट १९४७ ची ती रात्र आपल्या गुलामगिरीची शेवटची रात्र होती. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वांशी सभा घेऊन १४ ऑगस्ट च्या रात्री १२ वाजता हे घोषित केले कि, आपला देश स्वत्रंत्र झाला आहे. तेव्हा ते दृश्य पाहण्यास आपण न्हवते हे आपले दुर्भाग्य समजले पाहिजे.

१५ ऑगस्ट १९४७ स्वतंत्रता दिन

१५ ऑगस्ट हा आपला स्वतंत्र दिन म्हणून आपण साजरा करतो. लाल किल्ल्यावर सर्व शहिदांना सलामी देऊन त्यांचा मान वाढविला जातो. जर ह्या सर्व लोकांनी आपले बलिदान दिले नसते तर आजही आपला देश एक गुलाम देश म्हणूनच बोलले जात असते.

सारांश:

ह्या सर्व नेत्यांना मनाचा मुजरा. जय हिंद

Updated: मार्च 23, 2020 — 2:39 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *