प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख हिंदू सणांपैकी दिवाळी हा प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव भारत देशातील सर्व धर्माचे लोक मोठ्या आनंदाने साजरे करतात. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. दिवाळी या उत्सवाला दिपावली असेही म्हटले जाते. जशी नवरात्र आणि दशहरा झाला कि दिवाळीची चाहूल लागते. तसेच हळूहळू उष्णता कमी होऊन थंडी पडू लागते. असे मानले जाते कि, दिवाळी हा उत्सव रोषणाई, आनंदाचा, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेले उत्सव आहे.
दिवाळी हा उत्सव केव्हा साजरा केला जातो –
दरवर्षी भारत देशी दिवाळी हा उत्सव हिंदू महिन्याच्या आश्विन च्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. ही दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी केली जाते. दिवाळी हा उत्सव पांच दिवसांचा उत्सव आहे.
दिवाळी उत्सव का साजरा केला जातो –
हे ज्या दिवशी परत आले होते ती अमावस्येची रात्र होती. म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सगळ्या अयोध्याच्या लोकांनी तुपाचे दिपक लावून स्वागत केले.
दिवाळी उत्सव
दिवाळी या उत्सवाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. तसेच उंच ठिकाणी आकाश कंदील लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभित केले जाते. त्याच बरोबर घराच्या दारावर तोरण बांधले जाते. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
धनत्रयोदशी
नरकचतुर्थी
हा दिवस छोटा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
दिवाळी – लक्ष्मीपूजन
यादिवशी योग्य चालीरीती आणि परंपरेनुसार माता लक्ष्मी, श्रीगणेश आणि मत सरस्वती यांची पूजा केली जाते. तासेव सर्व लोक यादिवशी पटाखे फोडून मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
तसेच सगळ्यांना दिवाळीच्या शुभकामना दिल्या जातात. यादिवशी व्यापारी लोक आपल्या दुकानांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.
पाडवा
दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. यादिवशी बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा केली जाते. ग्रामीण भागातील घरातील पशूना जसे कि, गाई, म्हशी, बैल इ. सजवले जाते आणि त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला दिले जाते.
भाऊबीज
दिवाळीचा पांचवा दिवस हा भाऊ – बहिण्याच्या अतूट प्रेमाचा आणि बंधनाचा दिवस आहे. यादिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धीची आणि भरभराटीची शुभकामना करते.
तसेच भाऊ आपल्या बहिणीला उपहार देऊन खुश करतात. भाऊ आणि बहिण आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस भारतातील अन्य प्रांतांमध्ये विविध नावानी ओळखला जातो.
निष्कर्ष:
दिवाळी हा उत्सव असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो. तसेच दिव्याला अंधकाराला दूर करून प्रकश निर्माण करणारा मांगल्याचे प्रतीक मनाला जातो.
दिवाळीच्या प्रकाशाने लोकांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. आपण सर्वांनी मिळून या सणाला जाती आणि धर्म भेद विसरून एकसाथ साजरा केला पाहिजे.
मराठीत दिवाळी निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.