प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्याच प्रमाणे दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख सण आहे.
हा सण सर्व धर्माचे आणि जातीचे लोक मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. दिवाळी या सणाला दीपावली असे सुद्धा म्हटले जाते. दिवाळी हा सण रोषणाई, उत्साहाचा प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला सण आहे.
दिवाळी कधी साजरी केली जाते –
दिवाळी का साजरी केली जाते –
त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्यावासियांनी तुपाचे दिपक लावून स्वागत केले होते. हे तिघे ज्यादिवशी परत आले होते ती अमावास्येची रात्र होती. म्हणून सगळ्यांनी तुपाचे दिपक लावून प्रकाशमय केले होते.
दिवाळी पाच दिवसांचा सण
दिवाळी हा सण प्रामुख्याने ५ दिवसांचा सण आहे. सर्व लोक दिवाळीची तयारी हि दोन आठवड्यापूर्वीच सुरु करतात.त्यामध्ये घराची साफ – सफाई केली जाते आणि घराला रंग काढला जातो. घर आणि दुकान हे फुलांनी आणि आंब्याच्या तोरणांनी सजवले जाते.
दिवाळी या सणाच्या दिवशी घरा बाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. तसेच उंच ठिकाणी अक्ष कंदील लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.
धनत्रयोदशी
नरक चतुर्थी
दिवाळी – लक्ष्मी पूजन
तसेच सर्व लोक यादिवशी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. त्याच बरोबर सगळी लहान – थोर माणसे फटाके फोडून दिवाळी हा सण साजरा करतात.
पाडवा
दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याच्या रूपाने साजरा केला जातो. यादिवशी भगवान श्रीकृष्ण यांची गोवर्धन पूजा केली जाते. तसेच ग्रामीण भागातील गाई, म्हशी आणि बैल यांची पूजा करून त्यांना दिवाळेंचे मिष्ठान्न दिले जाते.
भाऊबीज
दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊबीजच्या रूपाने साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे बहीण – भावाच्या अतूट आणि प्रेमाला जोपासणारा आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धी आणि भरभराटीची शुभकामना करते.
भाऊ आपल्या बहिणीला छानसे उपहार देऊन खुश करतो. तसेच हा दिवस रक्षाबंधन इतकाच पवित्र मनाला जातो. हा दिवस भारत देशात अनेक राज्यांमध्ये टीका या नावाने ओळखला जातो.
निष्कर्ष:
दिवाळी हा एक प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. हा सण रस्त्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वाना दिवाळी हि प्रदूषण मुक्त साजरी केली पाहिजे.
आपला देश स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. देशाला फक्त आपले राष्ट्र न समजता त्याला आपले स्वच्छ आणि सुंदर घर समजले पाहिजे.
मराठीत दिवाळी निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.