प्रस्तावना:
आमच्या भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. जगाच्या इतिहासात भारताचा इतिहास हा सर्वात अद्वितीय आहे.
भारताचा इतिहास घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे सर्वात महान भारतीय राजा होते. तसेच देशाची शान आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
त्यांनी मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम स्थापन करून मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवीन पर्व सुरु केला. भारत देशातील सर्वाधिक शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात असे.
जन्म
शिवाजी महाराज यांचा विवाह सईबाई हिच्याशी झाला होता. संभाजी हा शिवाजी महाराजांचा मुलगा. शिवाजी आणि संभाजी यांचा संयुक्त अर्थ ‘शिवशंभू’ असा होतो. शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीला ‘शिवकाल’ असेही म्हटले जाते.
तोरणा गड किल्ल्यांवर विजय
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स १६४७ मध्ये आदिलशाहाच्या ताब्यात असलेला तोरणगड हा किल्ला जिंकला. तोरणगड हा किल्ला स्वराज्याचे तोरण हि ठरले.
त्याच साली शिवाजी महाराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर नियंत्रण केले. तसेच त्यांनी मुंबरगडाचा डोंगर जिंकून त्याला राजगड असे नाव दिले.
राजमुद्रा
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”
ज्याचा अर्थ होतो, ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि संपूर्ण विश्व वंदनीय होतो तसाच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांची हि मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
अष्टप्रधान मंडळाची सुरुवात
त्या मंडळात पेशवा, मजुरदार, डबीर, पंडितराव,सेनापती, सचिव, मंत्री, न्यायाधीश इ. मंत्र्यांची पदे होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासकीय धोरणे चालू केले.
त्यांनी चौथ आणि सरदेशमुखी अशी दोन कर पद्धती सुरु केली. त्यांनी राज्याची चार भागामध्ये विभागणी केली. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्त्रीला इजा या दुखापत होईल अस ना वागण्यास सक्त ताकीद दिली.
अफजलखानाची भेट
छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहाच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकत राहिल्यामुळे सन १६५९ साली त्याने शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा उचलला. परंतु हा विडा दरबारी असलेल्या अफजलखानने उचलला.
जेव्हा अफजलखान आपल्या मोठ्या सैन्यासह लवजमाच्या मोहिमेवर निघाला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून त्याला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरु झाली आणि त्याने शिवाजी महाराजांनी अंतिम बोलणीसाठी अफजलखानाला भेटायला बोलावले.
शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी आपल्या अंगावर चिलखत चढवले. तसेच त्यांनी आपल्या सोबत वाघनखे आणि बिचवा ठेवली होती. त्यांनी बिचवा चिलखती मध्ये लपवला होता आणि वाघ नखे हाताच्या पंजामध्ये लपवली होती.
शिवाजी राजाबरोबर जिवा महाला हा विश्वासू सरदार तर अफजलखान बरोबर सय्यद बंड हा होता. हि भेट प्रतापगडच्या छावणीमध्ये ठरली. अफजलखानने शिवाजी राजना मिठी मारली आणि त्यांच्यावर तलवारीचे वार केले. अफजल खानच्या दगा बाजीमुळे शिवाजी राजांनी वाघ नखे खानाच्या पोटात घुसवली.
खानची आरोळी सगळीकडे पसरली आणि सय्यद बंडाने शिवाजी महाराजावर वार केले. हे वर जीवाने आपल्या अंगावर झेलले. त्यामुळे शिवाजी राजांचे प्राण वाचले. म्हणून ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हि म्हण आज भी प्रसिद्ध आहे.
निष्कर्ष:
शिवाजी महाराज हे एक योद्धा, उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या सुखासाठी अर्पण केले. म्हणूनच त्यांना जनता राजा या नावाने संबोधले जाते.
जनतेला लेकरा प्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान पुरुषच नव्हे तर वंदनीय थोर पुरुष पण आहे. अशा या महान राजाला माझे शतशः प्रणाम.
मराठीत छत्रपती शिवाजी महाराज निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.