प्रस्तावना:
मानवाचा सर्वागीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. तसेच माणूस आणि पशु या दोघांमधील अंतर ओळखायचे साधन म्हणजे शिक्षण होय. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि चांगले यश मिळवण्यासाठी चांगले शिक्षण घेणे आवश्यक आहे.
शिक्षण हे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यास आणि आपले व्यक्तिमत्व घडविण्यास सहायता करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाची मोठी भूमिका असते.
शिक्षण म्हणजे –
शिक्षण म्हणजे पुस्तके वाचली, परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो असे नव्हे. तर शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे.
घर शिक्षणाचे पहिले साधन
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घर हे शिक्षणाचे पहिले स्थान असते. प्रत्येक मुलाच्या जीवनात आई – वडील हेच त्याचे सर्वात प्रथम शिक्षक असतात. ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांना घडवतात.
त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षक त्यांना एक चांगल्या प्रकारचे वळण देतात आणि देशाचा एक चांगला नागरिक घडविण्याचे कार्य करतात.
शिक्षणाचा पाया
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया हा शाळेतच रचला जातो. शाळेत प्राप्त झालेले शिक्षण, संस्कार आणि मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश हे अवलंबून असते. त्याच बरोबर शाळेमध्ये मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते.
शिक्षणाच्या पायऱ्या
प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण हे खूप महत्वाचे असते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण असे शिक्षण प्रणालीचे तीन भाग आहेत. शिक्षणाच्या सर्व स्तरांना विशेष महत्त्व आणि स्थान आहे.
प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा प्रदान करते, जे संपूर्ण जीवनभर मदत करते. माध्यमिक शिक्षण हे भविष्यात आयुष्याचा मार्ग तयार करते.
शिक्षणाचे महत्त्व
आजच्या युगात आणि समाजात शिक्षणाचे खूप महत्त्व वाढले आहे. शिक्षणाचे भरपूर उपयोग आहेत. परंतु त्याला एक नवीन वळण देणे आवश्यक आहे. शिक्षण हे असे पाहिजे कि, एखादी व्यक्ती ही आपल्या सभोवतालची परिचित होऊ शकते.
तसेच आपल्या शिक्षण घेणे गरजेचे आहे. आपण आपल्या जीवनात शिक्षण घेऊन आपले ध्येय पूर्ण करु शकतो. त्याच बरोबर उच्च स्तरीय शिक्षण घेणाऱ्या लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर मिळतो.
त्या लोकांची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होते. शिक्षणाचाही काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा असतो. यामुळे आपल्या सर्वांनाचं जीवनात शिक्षणाचे खूप महत्त्व आहे.
शिक्षणाची मुख्य भूमिका
आजचे युग हे संगणकाचे युग आहे. या विज्ञानामुळे मानवाला अनेक गोष्टी सुलभ होऊ लागल्या आहेत. तसेच त्याच्या शिक्षण पातळीत वाढ होत आहे.
आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची सर्वात मोठी भूमिका आहे. तसेच शिक्षणाची पातळी वाढविण्याचे अनेक मार्ग सुलभ झाले आहेत. आता संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलली आहे. शिक्षण हे काही फार महाग नाही आहे.
कोणीही पैसे कामावरून आपले शिक्षण चालू ठेवू शकतो. आज लहान संस्था देखील विशिष्ट क्षेत्रात कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण देत आहेत.
विद्या (शिक्षण) सर्वात मोठे धन
शिक्षण ही एक अशी संपत्ती आहे जी कोणीही चोरू शकत नाही. तशीच ही एकमेव संपत्ती आहे जी कोणालाही दिल्यावर कमी होत नाही. परंतु त्याऐवजी ती अधिक वाढते. म्हणून आपल्या समाजामध्ये सुशिक्षित लोकांचा आदर केला जातो.
म्हणून प्रत्येक व्यक्तीला साक्षर होण्यासाठी प्रशिक्षण मिळावे अशी इच्छा असते. ह्मणून आजच्या युगात तसेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे.
निष्कर्ष:
शिक्षण हे केवळ माणूस आणि प्राणी यात हस्तक्षेप करते. कारण प्राणी हा अज्ञानी असतो आणि माणूस जर का शिक्षण घेत नसेल तर त्याचे जीवन हे प्राण्यांसारखेच होते. तो आपल्या जीवनात कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही.
आपल्या सर्वाना लक्ष्यात ठेवले पाहिजे कि, शिक्षण हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ज्यामुळे आपल्याला समाजात आदर मिळतो आणि त्यामुळे आपण समाजात आपली मान उंचावून जगू शकतो.
शिक्षण मराठी महात्वा निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही खाली तुमची प्रतिक्रिया देऊन आम्हाला विचारू शकता.