प्रस्तावना:
आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. तसेच हा खेड्यांचा देश आहे. भारत देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन या शेतीवरच अवलंबून असते. शेतकरी हा साऱ्या जगाचा पोशिंदा असतो.
शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर गरिबी, दुष्काळ आणि अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहणारा तसेच आत्महत्या करणारा असे दृश्य समोर येते.
शेतकऱ्याची मनोगत
त्या सर्वांप्रमाणेच मी सुद्धा एक छोटा शेतकरी आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात माझी थोडीशी जमीन आहे. ती फार सुपीकही नाही आणि नापीकही नाही आहे.
या माझ्या जमिनीवर माझं खूप प्रेम आहे. मी तिला माझी माय मानतो. परंतु या जमिनीत मी जे पीक घेतो ते पीक अवलंबून असत लहरी राजावर म्हणजेच पावसाच्या पाण्यावर.
गावाजवळची नदी
आमच्या गावाजवळ एक मोठी नदी आहे. लहान – लहान नद्यांना पाणी असत आणि तेही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते.
उन्हाळ्यात या सर्व नद्यांचे पाणी आटून जाते. त्यामुळे मृगाचा नक्षत्र आलं कि, सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात.
कुठे दिसतोय हा काळा विठोबा. विठोबा म्हणजेच – काळे ढग. आम्ही सर्व शेतकरी पाऊस पडायच्या आधी आमची जमीन नांगरून ठेवायचो.
त्यातील काही काटकुट काढायचो आणि ढेकळं फोडायची . तसेच पावसाची वाट बघत बसायचो. प्रखर उन्हामध्ये अंग नुसतं भाजून जायचं.
पावसाची सुरुवात
मग अचानक कधीतरी आकाशात काळे ढग निर्माण व्हायचे आणि मळभ यायची. सोसाट्याचा वर सुटायचं आणि काही वेळाने पावसाचे थेंब टपटप जमिनीवर पडायचे.
कधी – कधी गारा पडायच्या. त्या गारांनी अंग भरून जायचं. वृद्ध, लहान – मोठी माणसे तसेच पावसामध्ये न्हाऊन निघायची. या पावसामधेय फक्त शरीर भिजत असं नाही तर मनाला सुद्धा शांती मिळायची.मग आम्ही शेतीला सुरुवात करायच्या तयारीत असायचो. जमिनीमध्ये बी – बियाणे टाकायचो. या बळीराजाने आमच्यावर अशी कृपा केली कि, रोप तरारून यायची.
पण हे सगळं काही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असायचं. त्यामुळे येईल ते पीक आणि मिळेल ते धान्य. त्यावर आमहाला संपूर्ण वर्ष काढाव लागत असायचं. हेच आमचं कोरडवाहू शेतकऱ्याचं नशीब. पोळा संपला कि पाऊस संपला.
कमी पाण्यावरची पीक
परंतु पाऊस गेला कि, आम्हाला दुसरं कोणतं पीक घेता येत नसायचं. म्हणून आम्हाला कमी पाण्यावरची नाचणी – वारीसारखी पीक घ्यावी लागत असायची. परंतु या कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशीबी कायम दारिद्र्य असायचं. नेहमी त्याला उपासमार करावी लागत असे.
मग शेवटी काय करणार. सरकारकडे जाऊन त्याचे उंबरठे झिजावे लागत असायचे. व्याजाने पैसे घ्यावे लागत असत आणि ते परतफेड करताना अर्धा जीव जायचा.
मांजरा नदी
आमच्या गावापासून खूप अंतरावरून एक मांजरी नदी वाहते. आमच्या गावातील नद्यांपेक्षा हि खूप मोठी नदी आहे.
या नदीला नेहमी पाणी असायचं आणि आम्ही सर्वानी मिळून या नदीवर धारण बांधलं व कालव्याच्या मदतीने ते पाणी आमच्या गावात आणलं. यामुळे गावाच्या लोकांनाच खूप फायदा झाला. आम्ही सर्वजण अन्य पिके घेऊ लागलो.
निष्कर्ष:
जो पर्यंत माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी या काळ्या मातीची सेवा करीन. एवढे सांगून मी माझे मनोगत थांबतो.
मराठीत शेतकरी-निबंध निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.