प्रस्तावना:
आमचा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक हे गावात राहतात आणि शेती करतात. आमच्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे.
गावातील शेतकरी दिन – रात मेहनत करून शेतीची कामे करतो, पिक उगवतो आणि संपूर्ण मानवतेचे पोषण करतात. म्हणून या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो.
शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहणारा तसेच आत्महत्या करणारा होय.
शेतकऱ्याचे मनोगत
मी एक छोटा शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातील साताऱ्या गावात माझी थोडी जमीन आहे. ही जमीन माझी माय आहे. ही जमीन फारशी सुपीक नाही पण नापीकही नाही आहे.
या जमिनीवर माझे भरपूर प्रेम आहे. पण माझी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आमच्या गावाच्या जवळ पास एक मोठी नदी आहे. लहान – लहान नद्यांना पाणी हे असतच. पण तेही पावसावरच अवलंबून.
उन्हाळ्यात त्या पण नदीचे पाणी हे आटून जाते. त्यामुळे मृगाच नक्षत्र आल कि आम्ही आकाशाकडे डोळे लावून असतो.
काळ्या ढगांचे वर्णन
आम्ही शोधत असतो कि, कुठे दिसतोय का हा काळा विठोबा – म्हणजेच काळे ढग. त्या आधी आम्ही जमीन नांगरून ठेवायची आणि ढेकळ फोडायची. तसेच पावसाची वाट बघत बसायचो.
उन्हाळ्यात शेतीच काम करून अंग नुसत भाजून निघायचं. पण पाण्याचा काही पत्ताच नसायचा. महिला पिण्यासाठी पाणी भरपूर दूरवरून आणत असत.
पावसाचे आगमन
मग कधीतरी अचानक मळभ येते. आकाश काळेभोर दिसू लागते. सोसाट्याच वार सुटत आणि काही वेळाने पाण्याचे टपटप थेंब धरतीवर पडू लागतात.
पावसाळ्यात कधी – कधी गारा सुद्धा पडतात आणि गारांनी अंगण भरून जाते. संपूर्ण गाव आणि लहान – थोर माणसे पावसात न्हाऊन निघतात. तसेच पावसात भिजून आपला आनंद व्यक्त करतात.
शेतीची सुरुवात
पाऊस पडल्यावर शेतीच्या कामाला लागायाल हव आणि भिजलेल्या मातीत बी – बियाण पेराल पाहिजे. पाऊस असा पडला कि शेतीचे रोपे तरारून येतात. पण सर्व काही हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे.
त्यानंतर येईल ते पिक आणि मिळेल ते धान्य. यावरच आमच संपूर्ण जीवन अवलंबून आहे. पोळा झाला कि पावसाचे दिवस सरलेत. त्यामुळे आठ महिने आम्हाला दुसर कोणत पिक घेता येत नाही.
त्यामुळे आम्ही कमी पाण्यावरची नाचणी – वरीसारखी पिक घ्यावी लागतात. त्यामुळे आमच्या नशिबात कायमच दारिद्य असत. कायमची उपासमार करावी लागते.
व्याजाने पैसे
त्यासाठी आम्हाला मग सरकारकडून व्याजाने पैसे घ्यावे लागतात. सरकारचे उंबरठे झिजावे लागतात. मग ते व्याज फेडता – फेडता आमचा अर्धा जीव जातो. तेव्हा अस वाटत कि, कश्यासाठी हे व्याज घेतले. नाही काढाल असत व्याज तर बर झाल असत.
नदीच पाणी
आमच्या गावापासून काही अंतरावर एक मोठी नदी आहे. आमच्या गावातील सगळ्या नद्यांमध्ये ती सर्वात मोठी नदी आहे. या नदीवर आम्ही धरण बांधून कालव्याच्या मदतीने तेच पाणी आम्ही गावामध्ये आणल. त्यामुळे गावातील लोकांना किती फायदा झाला.
एवढे सांगून मी माझे मनोगत थांबवतो. पण माझ्यात जीव असेपर्यंत या काळ्या मातीची सेवा करीन.
मराठीत शेतकरी-निबंध निबंधा संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.