वर्षा ऋतु से लाभ

शेतकरी वरती निबंध मराठी – वाचा येथे Shetkari Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील बरेच काही लोक गावामध्ये राहतात. भारत हा गावांचा देश आहे. या देशामध्ये पुरातन काळापासून बरेच काही लोक हे शेती हा व्यवसाय करत असत.

या शेतीवर त्यांचा उदार निर्वाह होत असे. शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी आणि अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा.

शेतकरी म्हणजे –

किसान की आत्मकथा4शेतकरी म्हणजे आपला बळीराजा होय. जो आपल्या पिकांसाठी वरुणाकडे चातक पक्षाप्रमाणे वाट बघणारा म्हणजे शेतकरी होय. तो बरसला कि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून यायचा.

पण वरुण राजाची वाट पाहून सुद्धा त्याला त्याचावरचा रुसवा त्याला सहन करावा लागत असे. तेव्हा मात्र त्याचे डोळे अश्रूंनी भरत असत.

जेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यां समोर त्याचे पीक पाण्याविना जाळू लागते. तेव्हा त्याचा मनाला खूप वाईट वाटते. त्याच्या मनाची होणारी घालमेल पाहता येत नाही.

शेतकऱ्याचा इतिहास

किसान की आत्मकथा2शेतकऱ्याचा शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला आहे. जेव्हा मानवाने शेतीची सुरुवात डोंगर – टेकड्यांवर लाकडाच्या साहाय्याने शेती करून त्यापासून धान्याची पैदास केली.

त्यानंतर मानव एक जागी स्थिर होऊन जास्त प्रमाणात शेती केली जाऊ लागली. तसेच भारत देशात पूर्वीपासून सखोल भागात शेती हा व्यवसाय केला जात असे. म्हणून या देशाला कृषिप्रधान देश म्हटले जाते.

शेतकऱ्यांना लागणाऱ्या मुलभूत वस्तू

किसानों के लिए योजनात्यांना शेती करण्यासाठी सगळ्यात पहिलं सुपीक जमीन लागते. त्यानंतर त्यांना पाण्याची गरज भासते. शेतीला जर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर शेती चांगली होते.

तिसरी घोष्ट म्हणजे मनुष्यबळ लागते आणि शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या विकासासाठी येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो.

त्यानंतर तो शेवटी उत्पादन घेऊन शेतमाल बाजार पेठेत विकतो. शेतकऱ्याचा उदार निर्वाह आणि देशातील सगळी माणस हि शेतकऱ्यावर अवलंबून असतात.

शेतकऱ्यावर येणारी संकटे

किसान की आत्मकथा1कधी – कधी शेतकऱ्याला अन्य संकटांना सामोरे जावे लागते. त्याला शेती करताना ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजार पेठेत होणारी घसरण तसेच निर्यातीत होणारे सरकारी बदल, अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान इ. समस्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याला प्रत्येक वेळी कष्टच फळ मिळत अस नाही.

शेतकऱ्यांचे मित्र

farmer शेतकऱ्याला शेती करण्यासाठी गाय, म्हैस, बैल, रेडा इत्यादि. ची गरज भासते. परंतु जेव्हा शेती परिपूर्ण झाल्यावर त्यावर किडे बसतात. त्यामुळे शेतीला नुकसान पोहचते.

निसर्गातील किडे पिकांचे संरक्षण करतात. जसे कि साप, बेडूक, मधमाश्या, कोंबड्या, शेळ्या आणि गांडूळ इत्यादि. सगळे शेतकऱ्याचे मित्र आहेत.

देशात हरित क्रांती

farmer2 आज देशात हरित क्रांती झाल्यामुळे देशाच्या धन्य उत्पादनामध्ये मोठे बदल झाले आहेत. त्या काळी प्रश्न असा होता कि, उत्पादित केलेले धन्य साठवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही होती.

त्यामुळे उत्पादन केलेल्या धान्याची नासाडी होत असे. आजच्या युगात शेतीची विविध यंत्रे विकसित झाली आहेत. त्यांचा उपयोग करून मानव मोठ्या प्रमाणात शेती करू लागला आहे. पिकांचे प्रमाणही वाढले आहे.

तसेच शेतकऱ्याचे कष्ट हि कमी झाले आहेत. आज शेतकरी आमची शेती आमची माती, पिकावू येथे माणिक मोती या जिद्दीने प्रयत्न करत आहे.

निष्कर्ष:

आज भारत सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या देशाला एक परिपूर्ण तसेच चांगल्या प्रकारे शेती करून परिस्थिती बदलून दाखवतील.

म्हणून आपल्या देशाचे माजी पंतप्रधान म्हणाले आहेत कि ‘जय जवान, जय किसान’. म्हणून आपणा सर्वाना या जगाच्या पोशिन्द्याला सहकार्य केले पाहिजे.

मराठीत शेतकरी वरती निबंधाबद्दलच्या इतर प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment