सावित्रीबाई फुले मराठी निबंध – वाचा येथे Savitribai Phule Essay in Marathi

प्रस्तावना:

जशी ही भारतभूमी महान पुरुषांची भूमी आहे तशीच ही भारतभूमी महान स्त्रियांची सुद्धा भूमी आहे. या भूमीवर अनेक महान पुरुषांचा आणि स्त्रियांचा जन्म झाला आहे.

काही महान स्त्रियांनी आधुनिक युगात पुरुषांच्या बरोबरीने अन्य क्षेत्रात आपली भूमिका निभावली आहे. त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी अन्य कार्य केले आहे. त्या महान स्त्रियांपैकी सावित्रीबाई फुले यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

कारण भारतीय स्त्रीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी समाजामध्ये स्त्रीला महत्वाचे स्थान निर्माण करून दिले आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते.

ज्यावेळी भारतीय समाजात स्त्रीला शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून परतंत्र आणि परावलंबी ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाई फुले याचं जन्म झाला.

सावित्रीबाई फुले यांचा विवाह

सन १८४० साली सावित्रीबाई फुले नऊ वर्षच्या असताना त्यांचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतीराव फुले हे १३ वर्षाचे होते.

यांचा विवाह झाल्यानंतर ज्योतीराव फुले यांच्या इच्छेनुसार स्त्रियांनी शिकावे असा विचार केला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासून स्त्री शिक्षणाला सुरुवात केली.

सावित्रीबाई फुले यांचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागरचे होते. परंतु त्यावेळी पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली होती.

स्त्री शिक्षणाचा पाया

महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचा पाया घातला. प्राचीन काळात स्त्रियांना घराच्या बाहेर आणि शिक्षण घेण्यासाठी पाठवले जात नव्हते. तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी या विरुद्ध आवाज उठवला.

१ जानेवारी, १८४८ साली ज्योतीराव फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. परंतु त्यांना शिकवण्याचे धाडस कोणी केले नाही. तेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत जावून शिकवू लागल्या.

जेव्हा त्या शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातले अति कर्मठ लोक त्यांच्यावर दगडफेक, शेण आणि चिखल फेकत असत. परंतु सावित्रीबाई फुले यांनी या सगळ्या समस्यांना धीराने तोंड दिले आणि त्यांनी शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले.

समाजात विविध प्रथा रूढ

प्राचीन काळामध्ये समाजात विविध प्रथा रूढ होत्या. जसे कि बाल विवाह, सती प्रथा, केशवपन या सर्व प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे.

तसेच या प्रथांच्या नावाखाली स्त्रियांवर अत्याचार होत असे. म्हणून त्यांनी स्त्रियांना होणाऱ्या क्रूर प्रथांना विरोध केला. बाल जठार या प्रथेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत.

त्या काळी पुनर्विवाह मान्य नसल्यामुळे ज्या मुली सती जात नसत त्यांचे केशवपन करून त्यान कुरूप बनविण्यात येत असे.

सत्यशोधक समाजाची स्थापना

ज्योतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी ज्योतीराव फुले यांना सहकार्य केले.

परंतु सन १८७५ -१८७७ मध्ये दुष्काळात दुष्काळ ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अन्नछत्रे चालवली. तसेच पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने आश्रय दिला. समाज जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली गेली. तसेच त्यांनी काव्यफुले आणि बावनकशी के काव्यसंग्रह लिहिले.

प्लेगची साथ

सन १८९६ साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. म्हणून लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरु केला. आणि रोग्यांची सेवा करू लागल्या.

परंतु याची लागण त्यांना झाली आणि १० मार्च, १८९७ साली सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

निष्कर्ष:

सावित्रीबाई फुले ह्या एक महान समाज सुधारक आणि पहिल्या महिला शिक्षिका होत्या. म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस हा ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.

मराठीत सावित्रीबाई फुले निबंधाबद्दलच्या इतर प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Updated: November 14, 2019 — 6:15 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *