वृक्ष मराठी निबंध – येथे वाचा Save Trees Essay in Marathi

प्रस्तावना:

मानव आणि निसर्ग या दोघांचा भरपूर पूर्ण संबंध आहे. या निसर्गातून मानवाला विविध प्रकारची संसाधने ही प्राप्त होतात. त्या सर्व संसाधनांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.

तसेच वृक्ष हा निसर्गाचा सर्वात महत्वाचा हिस्सा आहे. वृक्ष हे आपल्या सर्वनाच्या जीवनामध्ये पाणी आणि आहाराप्रमाणे खूप महत्वाचे आहेत. वृक्षांशिवाय मानव आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.

वृक्ष हे आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहेत. तसेच वृक्ष हे निसर्गाची मानवाला  मिळालेली एक अमूल्य देणगी आहे.

वृक्षांपासून मिळणाऱ्या गोष्टी

वृक्ष हे मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त करून देतात. तसेच मानवाला वृक्षांपासून शुद्ध हवा मिळते. वृक्ष सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देतात आणि वृक्ष स्वतः कार्बन डाय ऑक्साइडला अवशोषित करतात.

त्याच प्रमाणे वृक्ष मानवाला राहण्यासाठी जागा देतात आणि उन्हाळयात सर्वाना सावली प्रदान करतात. वृक्षांमुळे आजूबाजूचे वातावरण हे सुंदर आणि स्वच्छ राहते.

वृक्षांचा उपयोग

मानव वृक्षांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. वृक्षांपासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग मानव इंधनाच्या रूपाने करतो. तसेच वृक्षांपासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग मानव इमारत म्हणजेच घरे बांधण्यासाठी करतो.

वृक्षांच्या लाकडाचा उपयोग हा ग्रामीण भागात जास्त जास्त प्रमाणात केला जातो. तसेच मानव वृक्षांपासून दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.

प्राणी आणि निसर्ग

या सृष्टी चक्रामध्ये प्राणी आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. तसेच अन्य प्रकारचे पाणी आणि पक्षी यांचे हे निवास स्थान आहे.

काही पक्षी हे वृक्षांवर आपला घरटा बांधून राहतात. मानवा प्रमाणेच प्राणी आणि पक्ष्यानाच्या जीवनामध्ये वृक्षांचे खूप महत्त्व आहे.

वृक्षांपासून फायदे

वृक्ष हे आपल्याला भरपूर काही देतात पण ता बदल्यात ते मानवाकडे काहीच मागत नाही.

वृक्ष हे वातावरणाला शुद्ध ठेवण्याचे कार्य करतात.

वृक्षांपासून मानव उद्योगांसाठी लागणारा कच्चा माळ तयार करतो.

तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस, औषधे इत्यादी अनेक वस्तू तयार करतो.

वृक्ष पाऊस पडण्यास मदत करतात.

त्याच प्रमाणे वृक्ष मातीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे मातीची हालचाल होत नाही.

वृक्ष हे जल, वायू, माती आणि ध्वनी इत्यादी प्रदूषणांना रोकण्याचे कार्य करतात.

स्वार्थी मानव

आज मानव आपल्या स्वार्थापायी इतका आंधळा झाला आहे कि, तो वृक्षांचे महत्त्व विसरूनच गेला आहे. तो आपली सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी या वृक्षांची तोड करत आहे.

वृक्ष तोडताना मानवच आपल्या स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत आहे. हे त्याला कळतच नाही आहे. वृक्षांची तोड केल्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.

तसेच रस्त्यांवरचे सावली देणारे वृक्ष हे नामशेष होत चालले आहे. परंतु या सर्वाचा सर्वात जास्त परिणाम हा माणसावाच्या जीवनावर होत आहे.

वृक्ष वाचवण्याचे उपाय

वृक्ष हे मानवाला निसर्गाने दिलेले एक अमृत वरदान व एक जीवनछत्र तसेच मानवाच्या जीवनाचा आधार आहे. म्हणून मानवाने वृक्षांचे संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:

सर्व लोकांनी वृक्ष तोडण्याऐवजी जास्तीत – जास्त वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे.

वृक्ष तोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

जास्त प्रमाणात वृक्ष लावून त्यांचे जतन केले पाहिजे.

तसेच सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना वृक्षांचे महत्त्व “समजावून” सांगितले पाहिजे.

निष्कर्ष:

जर मानव दिवसेंदिवस वृक्षांची तोड करत राहिला तर एक दिवस मानवाच्या जीवनाचा शेवट होईल. याला मुख्य जबाबदार मानव असेल. म्हणून आपण सर्वानी मिळून दरवर्षीं एक तरी झाड लावले पाहिजे.

तसेच आपल्या जीवनातील वृक्षांचे महत्त्व आणि मूल्य पाहून जीवन आणि पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षांचा सम्मान आणि जतन करणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या देशात २१ मार्चला ‘जागतिक वन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Updated: नवम्बर 27, 2019 — 11:43 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *