मुलगी वाचवा, मुलगी शिकवा मराठी निबंध – येथे वाचा Save Girl Child Essay in Marathi

प्रस्तावना:

या धरतीवर मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचे अणे खूप गरजेचे आहे. तसेच महिला या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत.

सामाजिक संतुलन रोखण्यासाठी समाजातील महिला या पुरुषांप्रमाणेच खूप महत्वाच्या आहेत. परंतु आज भारतातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे महिलांचे प्रमाण हे सातत्याने कमी होत चालले आहे.

म्हणून महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ही योजना सुरु करण्यात आली आहे.

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियानाची सुरुवात

लड़का – लड़की एक समानमुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा ही मोहीम स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी भारत सरकारने सुरु केली. या मोहिमेची ओळख ४ ऑक्टोबर, २०१४ साली करण्यात आली.

तसेच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी, २०१५ साली हरियाणा येथील पानिपत मध्ये सुरु केली.

देशाला स्वातंत्र्य

ऐक्याची भावनाआज आपल्या भारत देशाला ७० वर्षे उलटून गेली तरीही देशामध्ये अनेक प्रथा विकसित आहेत. आज आपण २१ व्या शतकात पोहचुनही महिलांना दुय्यम दर्जा दिला जात आहे. आजकाल महिलांविषयक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे महिलांची संख्या कमी होत चालली आहे.

लोकांचे मानसिक विचार

मानसिकता काही लोकांचे म्हणणे असायचे की, मुलगा हा आपल्या वंशाचा दिवा असतो आणि मुलगी दुसऱ्या घरचे परके धन असते. म्हणून काही लोक हे मुलीचा जन्म होताच तिला आईच्या गर्भामध्ये मारायचे. तर काही लोक हे गरिबीमुळे स्त्रियांची हत्या करत असत.

विविध प्रथा

विधवा प्रथाआपल्या भारतीय समाजात प्राचीन प्रथा रूढ होत्या. जसे की स्त्रीभ्रूण हत्या, सती प्रथा, बाल विवाह, हुंडाबळी इत्यादी. या सर्व प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे.

तसेच काही लोक हे मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नाच्या वेळी तिला हुंडा द्यावा लागत असे. म्हणून गरीब लोकांकडे हुंडा द्यायला नसल्याने त्यांची हत्या करत असत.

स्त्रीभ्रूण हत्या

कन्या भ्रूण हत्यास्त्रीभ्रूण हत्या हा एक सर्वात मोठा अपराध आहे. कारण वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे महिलांची संख्या खालावली आहे. यामुळे कमी होत जाणारे लिंग गुणोत्तर आणि समाजाचा समतोल रोखण्यासाठी स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

भारत सरकारची धोरणे

भारत सरकारमुलगी वाचवा, मुलगी शिकवा अशा मोहिमेची सुरुवात करून मुलींसाठी समान संधी उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाचा प्रचार करणे.

तसेच मुलींचा जन्मदर कमी असलेल्या जिल्ह्यांवर आणि शहरांवर जास्तीत – जास्त लक्ष देणे. ज्यामुळे जन्म दरात वाढ होईल.

सरकारने आखलेली धोरणे आणि योजना यांची अंमलबजावणी होते कि नाही याकडे लक्ष केंद्रित करणे.

घटत जाणाऱ्या कन्या जन्म दराची समस्या जनतेसमोर मांडून जनजागृती निर्माण करणे.

विविध क्षेत्रात कामगिरी

Importance Of Hard Work पुरुषांपेक्षा महिला या  पूर्णपणे पार पडतात. तसेच कुटुंबाची काळजी घेतात. आज मुलींनी अनेक क्षेत्रात आपली भूमिका बजावली आहे. महिला कुटुंबासोबत ऑफिसची सुद्धा जिम्मेदारी पार पडत आहेत.

आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. एक मुलगी तिच्या आयुष्यात आई, पत्नी, बहीण आणि मुलगी इत्यादी भूमिका निभावते.

निष्कर्ष:

मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा हे भारत सरकारने उचलले एक योग्य पाऊल आहे. म्हणून सर्व लोकांनी मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये कधीच भेदभाव नाही केला पाहिजे. मुलगा आणि मुलगी या दोघांना समान मानले पाहिजे आणि त्यांना सम्मान दिला पाहिजे.

आपण मुलींना सुद्धा मुलांसारखी संधी दिली पाहिजे. जेणेकरून मुलीसुद्धा आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतील आणि जगात एक वेगळीच छाप सोडतील.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *