प्रस्तावना:
महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. या भूमीवर अनेक महान संतांचा जन्म झाला आहे. जसे की संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत चोखोबा, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज अशा अनेक संतांनी जन्म घेऊन या भूमीला अधिक पवित्र बनवले आहे.
या सर्व संतांपैकी संत तुकाराम हे एक आहेत. संत तुकाराम हे इ. स सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी चार सर्वश्रेष्ठ संतांपैकी अखेरचे संतकवी होते.
जन्म:–
संत तुकाराम यांचा जन्म पुण्याजवळ असलेल्या देहू या गावात झाला. तसेच त्यांचा जन्म हा वसंत पंचमीला – शुद्ध माघ पंचमीला झाला.
त्यांच्या आईचे नाव कनकाई असे होते. संत तुकाराम यांचे आडनाव अंबिले असे होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष हे विठ्ठलभक्त होते.
पंढरपूरचा विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांच्या घराण्यात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा होती. सावजी हा त्यांचा मोठा भाऊ होता आणि सावजी हा त्यांचा छोटा भाऊ होता.
संत तुकाराम यांचा मोठा भाऊ सावजी हा विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे त्यांच्या घराची संपूर्ण जबादारी ही त्यांच्यावर पडली.
जीवन परिचय
संत तुकाराम यांचा विवाह पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई हिच्याशी झाला. संत तुकारामांना आपल्या प्रापंचिक जीवनात अनेक दुःख सहन करावी लागलीत. ते १७ – १८ वर्षाचे असताना त्यांचे आई – वडिलांचे निधन झाले.
त्यांचा मोठा भाऊ हा विरक्त वृत्तीमुळे तीर्थयात्रेला निघून गेला. तसेच त्यांना भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा हा दुष्काळात गेला आणि गुरे – ढोरे सुद्धा गेलीत. त्यामुळे त्यांच्या घरी अठरा विश्व् दारिद्र्य आले.
अभंग रचना
कवित्वाचा स्वप्न दृष्टांत झाल्यामुळे त्यांनी अभंग रचना करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ध्यान, चिंतन यामध्ये घालवल्यामुळे त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून अनेक अभंग रचना केल्या.
अभंग हे संत तुकाराम महाराजांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. संत तुकाराम महाराजांना वारकरी ‘जगद्गुरू‘ म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या प्रवचन आणि कीर्तनाच्या शेवटी “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” असा जयघोष केला जातो.
साक्षात्कारी व निर्भीड
संत तुकाराम महाराज हे एक साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. अभंग म्हटलं की तो संत तुकाराम महाराजांचा एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली होती. संत तुकाराम महाराज यांचे अभंग हे महाराष्ट्राच्या संस्कृतरिक परंपरेचे द्योतक आहेत.
वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक आणि अभ्यासक तसेच सामान्य रसिक सुद्धा त्यांच्या अभंगांचे अभ्यास करतात. आज खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.
संत तुकाराम महाराज यांचे कार्य
संत तुकाराम महाराजांनी बहुजन समाजाला देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून दिली. तसेच त्यांनी देव धर्मातील भोळ्या समजुती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच प्रमाणे समाजातील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे कार्य केले. संत तुकाराम महाराज यांचे समाज प्रबोधनाचे कार्य आजही समजला मार्गदर्शक ठरले आहे.
भागवत धर्म
संत ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, संत एकनाथ, संत नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला.
संत ज्ञानेश्वरांनी देऊळ बांधले आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढविला. संत तुकारामांनी समाजामध्ये पसरलेली धर्म व कर्मकांडाची जळमटे त्यांनी आपल्या अभंगातून पुसून टाकलीत. त्यांनी आपल्या अभंगातून समाजाला सत्यधर्माची शिकवण दिली.
निष्कर्ष:
संत तुकाराम महाराज हे एक महान संत कवी होते. म्हणून ज्या दिवशी संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालेत तो दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.