प्रस्तावना:
आमची महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखही जाते. या भूमीवर अनेक महान सनातनचा जन्म झाला आहे. जसे कि संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखोबा इ अनेक संत होऊन गेलेत.
त्या सर्व संतानांपैकी एक म्हणजे – संत तुकाराम. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. तसेच त्यांना तुकोबा, संत तुकाराम आणि तुकाराम महाराज या नावानी संबोधले जायचे.
संत तुकाराम यांचा जन्म
त्यांच्या वडिलांचे नाव ‘बोल्होबा’ आणि आईचे नाव ‘कनकाई’ असे होते. संत तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले असे होते. सावजी हा संत तुकाराम यांचा मोठा भाऊ आणि कान्होबा हा त्यांचा धाकटा भाऊ होता. पंढरपूरचा विठ्ठल किंवा विठोबा हे त्यांचे आराध्य दैवत होते.
जीवन परिचय
संत तुकाराम यांना आपल्या प्रापंचिक जीवनात खूप दुःखे सहन करावी लागली. ते १७ – १८ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मोठा भाऊ हा विरक्तीमुळे तेर्थयात्रेला निघून गेला.
त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळात गेला आणि गुरे – ढोरे सुद्धा गेलीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अठरा विश्व दारिद्य आले.
वारकरी संप्रदाय
संत तुकारामांच्या प्रवचन आणि करतानाच्या शेवटी – ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष करतात.
भागवत धर्माचा पाया
त्यांच्या अभंगामध्ये परतत्त्वाचा स्पर्श आहे आणि त्यातून त्यांच्या मंत्राचे पावित्र्य शब्दात पाझरते. संत तुकाराम यांचे अभंग हे अक्षर वाङमय आहे. त्यांच्या काव्यातील मधुरता आणि भाषेची सरलता अतुलनीय आहे.
अभंगांना लोकप्रियता
संत तुकारामांचे अभंग हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचे द्योतक आहेत. त्यांच्या काव्यातील गोडवा आणि भाषेची मधुरता ही अतुलनीय आहे.
जातीभेदावर टीका
संत तुकारामांनी विठ्ठलावरची भक्ती प्रकार केली. अध्यात्माचे सार सांगितले. तसेच देश – काळ आणि लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावली.
संत तुकारामांची गाथा
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम म्हणजे सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारस्तंभ आहे. यांच्या अभंगाची भाषा सोपी आणि सरळ आहे.
निष्कर्ष:
संत तुकाराम हे महान संत कवी या महाराष्ट्राला लाभले होते. संत तुकारामांनी आपल्या अभंगामुळे मराठी साहित्यात महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.
संत तुकाराम यांचा देह फाल्गुन वाद्य द्वितीयेला वैकुंठ गमन झाला. म्हणून हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.