Dnyaneshwar

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध – वाचा येथे Sant Dnyaneshwar Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील एक महान संत आणि प्रख्यात मराठी कवी होते. तसेच त्यांना महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न म्हटले जाते.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातही परमार्थाच्या क्षेत्रात अजोड व्यक्तिमत्त्व असणारे आणि अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर होय.

सुमारे ७२५ वर्षे महाराष्टरातील सर्व पिढ्यांतील, तसेच सर्व समाज वर्गाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ स्थान म्हणून जपले आहे ते एकमेवद्वितीय व्यक्तिमत्त्व असणारे संत ज्ञानेश्वर.

जन्म

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इ. स १२७५ साली जन्माष्टमीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील आपेगाव जवळील पैठण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणी बाई असे होते.

त्यांचे वडील हे एक ब्राह्मण होते. निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले भाऊ होते. तसेच ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी ही चार भावंडे होते. विठ्ठलपंत हे तीर्थयात्रा करत आळंदी येथे स्थायिक झाले.

परंतु समाजातील लोक हे त्यांना संन्यासाची मुले म्हणून हिणवत असत. म्हणून त्यांच्या गावाने त्यांना वाळीत टाकले होते. त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहांत प्रायश्चित केले.

जीवन परिचय

SANT GYANESWAR

आई वडिलांच्या मुत्युनंतर समाजातील लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यानंतर सर्व भावंडे ही पैठणला गेली आणि तिथे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता प्राप्त केली.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला.

लहान असताना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे हि भिक्षा मागून खात असत. एके दिवशी मुक्ताबाईला भाकरी भाजण्यासाठी कोणी खापर दिले नाही म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी भाजल्या.

संत ज्ञानेश्वरांचे कार्य

gyaneshwar

निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्वरांचे सदगुरु होते. त्यांनी नेवासा येथे गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर टीका केली. ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. म्हणून या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हटले जाते.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले. ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत ऐकूण ९००० ओव्या आहेत. तसेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इ. स १२९० मध्ये लिहिल्याचे मानले गेले आहे.

अमृतानुभव ग्रंथ

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव हा आहे. हा ग्रंथ विशुद्ध तत्त्वज्ञानाचा आणि जीव – ब्रह्म ऐक्याचा आहे. या ग्रंथामध्ये एकूण ८०० ओव्या आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा ग्रंथ सर्वात महत्वाचा आहे.

अमृतानुभव या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेच्या उल्लेख संत नामदेवांच्या ‘तीर्थावली’ मध्ये आढळून येतो. या यात्रेनंतर संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला.

चांगदेव पासष्टी

चांगदेव पासष्टी

जेव्हा योगी चांगदेव वाघावर बसून माऊलींकडे यायला निघाले होते. तेव्हा त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडांसह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून गेले. तसेच त्यांनी कर्मठ पंडिता समोर संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवला.

पसायदान

पसायदान

संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाची रचना केली.

आता विश्वात्मके देवे ! येणे वाग्यज्ञे तोषावे !

तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !!

जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रती लाभो !!

भूता परस्परे “घडो !” मैत्र जीवाचे !!

हा विश्व् बंधुत्वाची प्रेरणा देणारा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाला. या ग्रंथामुळे लोकांचेच नव्हे तर जगातील भारतीय संस्कृतीकडे आणि वाङमयाकडे सर्वांचे लोकध वेधले गेले. आजही जगामध्ये ज्ञानेश्वरीचे अध्ययन चालू आहे.

समाधी

Dnyaneshwar sant

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर समाधी घेतली. तसेच हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर निवृत्ती, सोपं आणि मुक्ताबाई यांनी देखील इहलोकाची यात्रा संपविली.

निष्कर्ष:

संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होते. संत ज्ञानेश्वर यांना वारकरी संप्रदायासह सर्व भक्त माऊली असे म्हणतात. त्यांनी वाङमय निर्मितीबरोबर आध्यात्मिक बीज रोवून चंद्रभागेच्या वाळवंटात गेले. त्याच बरोबर त्यांनी भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा पाया घातला.

Leave a Comment