प्रस्तावना:
आमची भारतभूमी ही महान पुरुषांची भूमी मानली जाते. या भारत भूमीवर अनेक महान , नेत्यांनी, समाज सुधारकांनी, क्रांतिवीरांनी, संतानी, कवींनी, ऋषी – मुनींनी जन्म घेऊन या भूमीला पवित्र बनवले आहे.
ज्या प्रमाणे क्रांतिवीरांनी आपल्या देशासाठी आपले जीवन बलिदान केले आहे. त्याच प्रमाणे काही समाज सुधारकांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला.
त्या सर्वांपैकी एक आहेत – महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे एक मराठी लेखक, विचारवंत आणि समाज सुधारक होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ साली पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते.
ज्योतिराव फुले यांचे मूळ घराणे साताऱ्यापासून दूर अंतरावर असलेल्या कटगून हे गाव होते. ज्योतिराव फुले हे नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
शिक्षण
ज्योतिराव फुले यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा धंदा केला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी सन १८४२ साली पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख असल्यामुळे ५ – ६ वर्षातच त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. ते शाळेतील शिस्तप्रिय आणि हुशार विद्यार्थी होते.
विवाह
ज्योतिराव फुले हे १३ वर्षाचे असताना इ. स १८४० मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई यांच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाई यांचे वय ८ वर्ष होते.
शैक्षणिक कार्य
महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या कवितेमधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यातील काही प्रसिद्ध ओळी आहेत.
विद्येविना मती गेली | मती विना नीती गेली |
नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एक अविद्येने केले ||
मुलींसाठी पहिली शाळा
महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील भेदभाव पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी सन १८४८ साली पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली.
त्याच बरोबर शिक्षिका म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांची निवड केली. तसेच त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी इत्यादि. सन १८५२ मध्ये पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली. या दोघांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला.
परंतु समाज त्यांना सतत विरोध करत असे. पण ज्योतिराव फुले आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, त्यांनी सर्व संकटांना धैर्याने तोंड दिले. म्हणून स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले भारतीय होय.
सत्यशोधक समाजाची स्थापना
महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर, १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे आणि सर्व लोकांपर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे मुख्य वैशिष्ट्य होते.
जेव्हा त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सहभाग घेऊन सत्यशोधक समाजाचे कार्य सुरु केले.
छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठींबा दिला. तसेच अत्याचारापासून आणि गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे आणि त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे हे मुख्य ध्येय होते.
ज्योतिराव फुले यांचे लेखन
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सन १८५५ साली तृतीय नाटक यामध्ये शूद्रांच्या परिस्थितीचे वर्णन केले.
तसेच त्यांनी सन १८६८ साली ब्राह्मणांचे कसब.
सन १८७३ मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ आणि अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा केला.
सन १८८३ मध्ये ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला.
निष्कर्ष:
महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपले संपूर्ण जीवन समाज कार्य आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्याग केले. महात्मा ज्योतिराव फुले हे युक्ती आणि कुटीत एकवाक्य असणारे महान समाज सुधारक होते.
मराठीत महात्मा ज्योतिबा फुले निबंधाबद्दलच्या इतर प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.