sachin tendulkar

सचिन तेंडुलकर निबंध मराठी – वाचा येथे Sachin Tendulkar Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

सचिन तेंडुलकर हा भारत देशाचा सर्वोच्च महान खिलाडी आहे. तसेच क्रिकेट विश्वात जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा एक माजी क्रिकेट पटू आहे. सचिन हा एक फक्त एक प्रसिद्धच खेळाडू नाही तर तो स्वतःच एक संस्था आहे.

कारण त्याचे चाहते त्याला ‘क्रिकेटचा देव’ मानतात. सचिन तेंडुलकर संपूर्ण जगभरात एक उत्तम क्रिकेटर मानला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर शतके पूर्ण कर्ण एकमेव खेळाडू आहे.

जन्म

सचिन के अलग – अलग नाम सचिन तेंडुलकर यांचा जन्म २४ एप्रिल ,१९७३ रोजी मुंबईमध्ये एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला. सचिन चार भावंडांमध्ये सर्वात लहान होता. त्याच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर होते. ते एक मराठी कादंबरीकार आणि त्याची आई रजनी विमा कंपनीला कामाला होती.

रमेश तेंडुलकर हे सचिन देव बर्मन यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव सचिन ठेवले. सचिनच्या मोठ्या भावाने त्याला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन केले आणि रमाकांत आचरेकर यांच्या प्रशिक्षण देत असलेल्या अकादमीमध्ये भरती केली.

रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर हाई स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्या स्कूलमध्ये क्रिकेटची चांगली व्यवस्था आणि परंपरा होती. त्या शाळेमध्ये सचिन क्रिकेटचा तारा म्हणून चमकला.

क्रिकेट खेळात कामगिरी

सचिन तेंदुलकर का शिक्षासचिन तेंडुलकरने सन १९८८ मध्ये  मुंबईसाठी खेळून आणि पहिल्याच क्रिकेट सामन्यात शतक बनवून सगळ्यात पहिल्या श्रेणीच्या कामगिरिलिया सुरुवात केली. तसेच तो सर्वोच्च धावा करणारा खिलाडी ठरला.

सचिन तेंडुलकरने सन १९८९ मध्ये आपल्या वयाच्या १६ व्या  वर्षी पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रदार्पण केले. सचिनच्या प्रसिद्ध दौऱ्यांपैकी सन १९९८ भारताचा शारजा दौरा.

त्याच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत शतकामुळे या दौऱ्यातील भारताला विजय मिळवून देण्यात सचिनचा महत्वाचा हिस्सा होता. सचिन सन १९९६ मध्ये प्रथम कर्णधार झाला. परंतु संघाच्या वाईट कामगिरीमुळे सचिनला सॅन १९९७ मध्ये राजीनामा द्यावा लागला.

सचिनने सन २००३ च्या जागतिक क्रिकेट कपमध्ये ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा करून उत्तम प्रकारे खेळला आणि भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य केले. भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध हार मानावी लागली. सचिनला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले.

पुरस्कार

पुरस्कार प्रदान सचिन तेंडुलकर हा सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा मानकरी ठरला. त्याला सन १९९७ – १९९८ मध्ये राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

तसेच त्याला भारताच्या सर्वोच्च खेळ पुरस्काराने आणि सन २०१४ मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले. हा पुरस्कार मिळणारा सर्वात पहिला खिलाडी आहे.

निष्कर्ष

सचिन तेंडुलकर हा एक विक्रमी भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिन तेंडुलकर २०१२ पासून राज्यसभेचा सदस्य आहे. तसेच सचिन तेंडुलकर हा सर्वात १०० शतके पूर्ण करणारा, आंतर राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारांमध्ये ३०००० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू आणि २०० कसोटी सामने खेळणारा सर्वात पहिला खेळाडू आहे.

मराठीत सचिन तेंडुलकर निबंधाबद्दलच्या इतर प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment