प्रस्तावना:
आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण हे साजरे केले जातात. त्या पूर्व सणांपैकी तीन सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.
जसे कि १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिवस), २६ जानेवारी (गणतंत्र दिवस व प्रजासत्ताक दिन), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) हे तीन सण देशाचे राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतात.
त्यापैकी प्रजासत्ताक दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी सर्वात महत्वाचा आहे. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
इतिहास
आमचा भारत देश हा १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला होता. परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. २६ जानेवारी, १९३० साली लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्ष परिश्राम घेऊन आपल्या भारत देशाची राज्य घटना लिहिली आणि हि राज्य घटना २६ जानेवारी, १९५० साली लागू केली.
म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्राला लागू करण्यात आले.
भारत एक लोकशाही राज्य
आमचा भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. ते म्हणजेच लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य होय. २६ जानेवारी, १९५० पासून प्रजेची सत्ता सुरु झाली.
या भारतीय संविधानात देशाच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आला. तसेच प्रत्येक व्यक्तीला अधिकार आणि हक्क देण्यात आला.
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
भारत देशाचे राष्ट्रपती यांच्या हस्ते आमच्या भारत देशाची राजधानी दिल्ली येथे ध्वजारोहण केले जाते. देशाच्या तिरंग्याला २१ तोपांची सलामी दिली जाते.
तसेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान म्हटले जाते. भारत देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते.
त्यानंतर भारतीय फौजेचे वेगवेगळे सेनाविभाग (घोडदळ, पायदळ आणि तोफखाने) आणि रणगाडे समवेत संचलन करतात. तसेच देशाच्या राष्ट्रपतींद्वारा भारतीय फौजेची मानवंदना स्वीकारली जाते.
स्कुल आणि कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन हा शाळा, महाविद्यालये आणि अन्य सरकारी संस्थाने यामध्ये सुद्धा साजरा केला जातो. यादिवशी शाळांतून आणि सरकारी कार्यालयातून सकाळी ध्वजवंदन केले जाते व मानवरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
तसेच अनेक ठिकाणी प्रभात फेरी, भाषणे आणि प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लहान मुले हातात तिरंगा घेऊन आपल्या भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत सहभागी होतात.
यादिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. संपूर्ण देश देशभक्ती गाण्यांनी गुंजन उठतो.
स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान
प्रजासत्ताक दिन हा देशाचा राष्ट्रीय उत्सव आहे. जो आपल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो.
या सर्व महान नेत्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या भारत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणून आपल्या सर्वाना मिळालेली लोकशाही हि प्रत्येकास मानली पाहिजे.
त्याच बरोबर देशाच्या प्रत्येक व्यक्तीने भारत देशाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे आणि शांती, प्रेम आणि सौम्यता पसरवली पाहिजे.
निष्कर्ष:
प्रजासत्ताक दिवस हा केवळ साजरा करून संपत नाही तर या दिवशी आपण सर्वानी या महत्वाच्या दिवशी देशासाठी हितकार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे.
तसेच त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय उत्सव साजरे केल्याने मनातील राष्ट्रीय भावना, प्रेम अधिक उजळून आणि उधळून निघते.
प्रजासत्ताक दिन निबंधाविषयी मराठीत इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.