प्रस्तावना:
आमचा भारत देश हा ऋतूंचा देश आहे. या भारत देशामध्ये एक मागून एक ऋतू हे येत असतात आणि निसर्गाची शोभा वाढवतात. जसे कि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे मुख्य तीन ऋतू येतात.
त्या सर्व ऋतूंपैकी पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वाना आवडतो. पावसाळा या ऋतूमुळे निसर्गात खूप काही बदल घडून येतात. पाऊस हा माणसाचा मित्र, जगाचा पोशिंदा आणि सर्व सृष्टीचा जीवनदाता आहे.
पावसाळ्याच्या आधीची स्थिती
उन्हाळ्यामध्ये बाहेर पडणे सुद्धा अवघड जाते. तसेच सर्व झाडे – झुडपे व वनस्पती हि सर्व झाडे उन्हाने करपून जातात. त्याच बरोबर पाण्याचे सगळे स्रोत सुकून जातात.
त्यामुळे पशु – पक्षी पाण्यासाठी व्याकुळ झालेले असतात आणि पाण्याच्या शोधात असतात. काही पशु – पक्ष्यांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.
म्हणून सर्व पशु – पक्षी आणि मानव पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. सगळी लोक आकाशाकडे नजर लावून असतात आणि त्यांच्या मनात एकच इच्छा असते ती म्हणजे कधी हा पावसाळा सुरु होतो असं.
पावसाचे आगमन
पावसाळा हा जून महिन्यात सुरु होतो आणि सप्टेंबर महिन्या पर्यन्त असतो. जेव्हा आकाशात काळे ढग निर्माण होतात आणि संपूर्ण वातावरण अंधारून येते.
तेव्हा काही वेळाने पाऊस पडू लागतो. असे वाटते कि ढगांना खाली येण्याची घाई झाली आहे. टप टप थेंब जमिनीवर पडू लागतात आणि तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस कोसळतो.
पहिला पाऊस
पहिला पाऊस पडताच मातीतून सुंगंध वास येतो आणि संपूर्ण निसरग ओलाचिंब होतो. पाऊस पडल्याने सर झाडे हिरवीगार होतात. सर्व झाडांना नवीन जीवनदान मिळते.
पहिला पाऊस म्हणजेच जणू काही वृक्षवेलींची आणि घरादारांची पहिली आंघोळच. पावसामुळे सर्व वातावरण स्वच्छ होऊन जाते. तसेच पशु – पक्षी सुद्धा आपल्या अंगावर पहिला पाऊस घेतात.
तसेच पाऊस पडताच मोर हा पक्षी आपला भव्य पिसारा फुलवून नृत्य करू लागतो. हा पशु अगदी सर्वानाच लाडका असतो. त्याच बरोबर प्रत्येकाची आनंद घेण्याची पद्धत हि वेगळी असते.
पावसाची मजा
काही छोटी मुले हि पावसात भिजत ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा असे गाणे म्हणत नाचतात. तसेच पावसाळयात शाळेत जाण्याची मजा वेगळीच असते.
पावसाळयात इंद्रधनुष्य
लहान – मोठ्याना मोहित करणारा हा इंद्रधनुष्य म्हणजे जसे आपल्या डोळ्यांना मिळणार निसर्गाचा एक नायब तोहफाच आहे.
पाऊस शेतीसाठी उपयुक्त
शेती हि प्रामुख्याने पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे सर्व शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. काही दिवसानंतर हिरवीगार शेते डोलू लागतात.
निष्कर्ष:
पाऊस हा सर्वाना समाधान देतो. तसेच काही कवींनी पावसावर आपल्या आविष्कारातून प्रकाश टाकून कवितेची निर्मिती केली आहे. जसे कि “श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे” अशा प्रकारे वर्णन केले आहे.