प्रस्तावना:
ज्या प्रमाणे आमच्या भारत देशात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. त्याच प्रमाणे या भारत देशामध्ये राष्ट्रीय सण सुद्धा साजरे केले जातात. त्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे – प्रजासत्ताक दिन.
२६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाला गणतंत्र दिवस असे म्हणतो. हा दिवस भारतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे.
प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो –
ही भारताची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ वर्ष परिश्रम घेऊन लिहिली होती. या दिवशी भारत देशाच्या लोकशाहीचे नवे पर्व सुरु झाले होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी, १९३० साली लाहोर अधिवेशात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.
भारत लोकशाही राज्य
या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला तिचा अधिकार आणि हक्क हा देण्यात आला. या संविधानानुसार देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला.
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
तसेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायिले जाते. त्याच बरोबर आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी धारातीर्थी पडलेल्या क्रांतीकारांकाना आणि शूरवीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
तसेच भारतीय सशस्त्र दल राजपथावर परेड करून राष्ट्रपतींना सलामी देतात. तसेच या दिवशी अन्य कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते. या दिवशी संपूर्ण देश देशभक्ती गाण्यांनी गुंजून उठतो.
शाळा, सरकारी संस्थाने
२६ जानेवारी हा दिवस शाळा, महाविद्यालय आणि अन्य सरकारी संस्थांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तसेच यादिवशी प्रभात फेरी सुद्धा काढली जाते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लहान – मोठी मुले मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात आणि भारत मातेचा जयघोष करीत फेरीत भाग घेतात. तसेच भाषणे आणि प्रदर्शन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा व महाविद्यालयांमध्ये एन. सी. सी व स्काउट चे विद्यार्थी संचलन करतात.
राष्ट्रीय उत्सव
प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव आहे. जो आम्हां सर्वाना महान नेत्यांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो.
त्यांनी कधी आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या प्राणांचा विचार केला नाही. या देशासाठी त्यांनी आनंदाने आपले संपूर्ण बलिदान केले. म्हणून या दिवशी संपूर्ण देशभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येते.
निष्कर्ष:
भारत देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेली लोकशाही ही मानली पाहिजे. त्याच बरोबर देशाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
देशातील लोकांच्या मनामध्ये शांती, प्रेम आणि सौम्यता जागरूक करणे गरजेचे आहे. असे हे राष्ट्रीय दिवस साजरे करुन आपल्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्र प्रेम उजळून निघते.
मराठीतील प्रजासत्ताक दिवस निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.