प्रस्तावना:
आज संपूर्ण देशात प्रदेशात ही एक सर्वात गंभीर समस्या बनली आहे. ही आपल्या देशाचीच समस्या नाही तर आंतरराष्ट्रीय समस्या सुद्धा आहे. कारण ज्यामध्ये पृथ्वीवर राहणारे सजीव आणि इतर निर्जीव पदार्थांचा सुद्धा समावेश आहे.
या प्रदूषणाचे दुष्परिणाम आहे सर्वत्र पाहायला मिळत आहेत. प्रदूषण हे एक विष आहे जे दिवसेंदिवस आपले पर्यावरण आणि जीवन नष्ट करत आहे. या मानवाने आपल्या आजच्या विज्ञानाच्या युगात मानवाला काही वरदान मिळाले तर काही अभिशाप सुद्धा मिळाले आहेत.
प्रदूषण हे सुद्धा विज्ञानाच्या गर्भातूनच जन्मालाआलेला एक शाप आहे. त्यामुळे बहुतेक लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना आणि आजारांना सामोरे जावे लागत आहे.
प्रदूषण म्हणजे काय –
जेव्हा सजीवांना हानिकारक आणि विषारी असे पदार्थ जेव्हा पर्यावरणात मिसळले जातात त्या प्रक्रियेला ‘प्रदूषण’ असे म्हणतात. जीवनाचा विकास हा केवळ स्वच्छ वातावरणावर अवलंबून आहे.
जेव्हा काही घटक आणि दूषित पदार्थ वातावरणात मिसळले जातात तेव्हा वातावरण दूषित होते. त्याच बरोबर अस्वच्छ वातावरण हे सजीवांना हानिकारक असते.
प्रदूषणाचे प्रकार
प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. जसे कि पाणी प्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण इत्यादी.
पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी
जेव्हा कारखान्यातील आणि गटारातील पाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडले जाते तेव्हा यामधील पाणी संपूर्ण पणे दूषित होते. पुराच्या वेळी कारखान्यांचे आणि गटारांचे पाणी हे नदी – नाल्यांमध्ये विलीन होते.
त्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात. तसेच काही लोक हे नदी – नाल्यांमध्ये कुडा – कचरा टाकतात. त्यामुळे नदी – नाल्यात पाण्याऐवजी कचरा वाहताना दिसून येतो. पाणी प्रदूषणामुळे साथीचे रोग पसरत आहेत. जसे कि डेंग्यू, मलेरिया इ संसर्गजन्य रोग निर्माण होऊ लागले आहेत.
वायु प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा
हवा ही प्रत्येक सजीवाला आणि मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सर्वात आवश्यक असते. तसेच महानगरांमध्ये हवा प्रदूषणाचे प्रमाण जात पसरते.
कारखान्यांचा धूर आणि रस्त्यावर चालणाऱ्या अनेक वाहनांमधील धूर हा हवेत मिसळला जातो. त्यामुळे हवा प्रदूषित होते आणि हवा प्रदूषण घडून येते. हवा प्रदूषित झाल्यामुळे मानवाला श्वास घेणे सुद्धा अवघड जाते.
ध्वनी प्रदूषण
मानवाला आपले जीवन जगण्यासाठी शांत वातावरणाची गरज असते. ध्वनी प्रदूषण ही एक सर्वात मोठी समस्या आहे. असह्य होणारा आवाज आणि जोरजोराने ऐकायला येणारा आवाज हा ध्वनी प्रदूषणाच्या प्रकारात येतो.
ध्वनी प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत – मोटारसायकली, डीजे, लाऊडस्पीकर, कारखाने, सायरन या सर्वांचा कर्कश आवाज. ध्वनी प्रदूषणामुळे आपली ऐकण्याची क्षमता कमी होते. तसेच ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणावाची स्थिती सुद्धा निर्माण होते. ध्वनी प्रदूषण ही एक सर्वात हानिकारक समस्या आहे.
प्रदूषणाचे परिणाम
मानव आपल्या स्वार्थासाठी सतत झाडांची तोड करतो. तसेच वाहनांचा वाढता वापर, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण या सर्वांचा वाईट परिणाम आपल्या पर्यावरणावर होतो.
त्याच प्रमाणे विषारी आणि हानिकारक कचऱ्यामुळे जमीन, हवा आणि पाणी यामध्ये बदल होतात. म्हणून मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
भूमी प्रदूषण
सर्व प्रकारच्या प्रदूषणाना मानव हा स्वतः कारणीभूत आहे. कारण तो आपल्या स्वार्थासाठी या प्रदूषणाला प्रोत्साहन देत आहे. कारखान्यांमधून निघणारा कचरा मानव जमिनीमध्ये पुरतो किंवा जमिनीवर फेकतो.
त्यामुळे जमीन हळूहळू नापीक होऊ लागते. तसेच प्लास्टिकमुळे मातीचे प्रदूषण होत आहे. कारण प्लास्टिकमधून निघणारे विषारी पदार्थ हे जमिनीत गेल्याने जमीन विषारी बनते.
निष्कर्ष:
जर या पृथ्वीवर प्रदूषणाचे प्रमाण असेच वाढत राहिले तर काही वर्षात विनाशाचे रूप धारण करील. म्हणून आपण सर्वानी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तसेच सर्व लोकांनी जास्तीत – जास्त झाडे ही लावली पाहिजेत. प्रदूषणाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली पाहिजे.