प्रस्तावना:
आज संपूर्ण जगामध्ये प्रदूषणाची समस्या ही एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. कारण या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर आणि सजीव सृष्टीवर अनिष्ट परिणाम होत आहे.
आज धरतीवर असा कोणताच प्राणी नाही ज्याला प्रदूषणाचा धोका नाही. मागील काही वर्षांपासून प्रदूषणाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. याला मुख्य कारण मानव आहे. कारण मानवाला या निसर्गातून खूप काही मिळत.
परंतु मानव याच दुरुपयोग करत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या सर्वांपैकी प्रदूषणाची समस्या हि सर्वात मोठी समस्या आहे.
प्रदूषण म्हणजे काय –
प्रदूषण म्हणजे वातावरणात हानीकारं पदार्थ मिसळल्याने जसे की पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या प्रक्रियेला ‘प्रदूषण’ असे म्हटले जाते. प्रदूषणामुळे मानवाला ना शुद्ध हवा, शुद्ध भोजन, ना शुद्ध पाणी आणि ना शुद्ध वातावरण मिळत.
प्रदूषणाचे प्रकार
प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. जसे की पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण असे अनेक प्रकार आहेत.
पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा
अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण होय. जेव्हा नदी – नाल्यांमध्ये दूषित पाणी मिसळले जाते तेव्हा ‘पाणी प्रदूषण’ होते. मानव कारखान्यातील सांडपाणी आणि दूषित कचरा हा नदी – नाल्यांमध्ये सोडतो.
त्यामुळे नदी – नाल्यांमधील पाणी हे दूषित बनते आणि त्यामुळे रोगराई पसरते. तसेच अनेक आजार देखील निर्माण होतात. त्याच बरोबर मानव नदी – नाले, तलाव यांमध्ये कुडा – कचरा फेकतो.
जेव्हा पूर येतो तेव्हा कारखान्यातील दूषित पाणी किंवा दूषित कचरा हा नदी – नाल्यांमध्ये जाऊन मिसळतो. पाणी प्रदूषणामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. उदा. डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य रोग होतात.
हवा प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा
हवा प्रदूषण म्हणजे वातावरणात विषारी घातक पदार्थ मिसळणे.आज आपल्या देशामध्ये शहरीकरण, औद्योगिकरण आणि कारखानदारी इ. कारणांमुळे मानव झाडांची तोड करत आहे.
झाडांची तोड केल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि वातावरणात दूषित पदार्थ मिसळले जात आहेत. वायू प्रदूषणामुळे मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.
तसेच अनेक कारखान्यांमधून आणि वाहनांमधून निघणारा धूर हा हवेत मिससळा जात आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. हवा प्रदूषणास लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण हे घटक सुद्धा जबाबदार आहेत.
ध्वनी प्रदूषण म्हणजे मोठा आवाज
नको असलेला किंवा खूप मोठा आवाज म्हणजे ‘ध्वनी प्रदूषण’ होय. मानवाला आपले जीवन जगण्यासाठी शांत वातावरणाची गरज असते.
परंतु कारखान्यांमध्ये चालणाऱ्या मशिनींचा आवाज तसेच रस्त्यावर चालणाऱ्या गाड्यांचा कर्कश आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होते.
त्याच बरोबर डीजे, लाऊड स्पीकर इत्यादि. चा मोठा आवाज यामुळे मानवाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम होतो. ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची चिडचिड वाढते आणि रक्तदाब वाढतो.
प्रदूषणाचा परिणाम
या सर्व गोष्टींना मानव स्वतः कारणीभूत आहे. कारण तो आपला स्वार्थ आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी दिवसेंदिवस झाडांची तोड करत आहे.
या सर्वच जास्त परिणाम हा मानवावर आणि सजीवांवर होत आहे. जर हे प्रदूषण असेच होत गेले तर मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सर्वानी प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
निष्कर्ष:
आज प्रदूषण आपले पर्यावरण नष्ट करत आहे. त्यामुळे आपण सर्वानी हे थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. तसेच जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत.
प्रदूषणाची समस्या हि आपल्या देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे. प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी शक्य होईल तितक्या सर्व लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत.