प्रदूषण एक गंभीर समस्या वर निबंध – वाचा येथे Pradushan Ek Samasya Marathi Essay

प्रस्तावना:

आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. आज या विज्ञानाने अनेक चमत्कार केले आहे. त्यामुळे मानवाचे जीवन अतिशय सुलभ बनले आहे. आजच्या या विज्ञान युगात माणसाला जसे वरदान मिळाले आहे तसेच काही अभिशाप सुद्धा मिळाले आहेत. त्यातील एक मोठा अभिशाप आहे तो म्हणजे – प्रदूषण.

जो विज्ञानाच्या क्रांतीतून जन्माला आला आहे. त्यामुळे आज सर्व लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आज प्रदूषणाचा हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे.

मागील काही वर्षांपासून प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि सर्व सजीव सृष्टीला त्यासाठी सामोरे जावे लागत आहे.

प्रदूषणाची व्याख्या –

प्रदूषण म्हणजे – जीवन नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे दूषित घटक जेव्हा वातावरणामध्ये मिसळले जातात. तेव्हा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे अन्य प्रकार आहेत. जसे कि पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण इ. समावेश होतो.

पाणी प्रदूषण

पाणी प्रदूषण म्हणजे जेव्हा नद्या – नाले, समुद्र, तलाव व पर्यावरणामध्ये विषारी किंवा घटक पदार्थ मिसळले जातात. तसेच पाण्यामध्ये विरघळून जातात व तळाशी जाऊन सडतात, कुजतात. त्यामुळे पाणी अशुद्ध होते तेव्हा जल प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

याचा सर्वात जास्त परिणाम जल प्रणालीवर होतो. हे पाणी त्यानंतर पिण्यासाठी किंवा अन्य कामांमध्ये वापण्यासाठी योग्य राहत नाही. तसेच पाणी प्रदूषण हे फक्त मानवासाठी नाही तर पशु – पक्ष्यांसाठी, जीव – जंतू व पाण्यात राहणाऱ्या माश्यांसाठी विनाशकरी आहे.

वायू प्रदूषण

वायू प्रदूषण म्हणजे – जेव्हा हवेमध्ये दुषित पदार्थ मिसळले जातात व त्यामुळे हवा दुषित होते. तेव्हा वायू प्रदूषण होते.

जसे कि, रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनामधून निघणारा धूर, कारखान्यांमधून व अन्य उद्योगांमधून निघणारा धूर हा हवेत मिसळला जातो आणि हवा प्रदूषित होते.

तसेच लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार घटक आहेत. याचा सर्वात जास्त परिणाम मानवाच्या जीवनावर होतो. हवा दुषित झाल्यामुळे माणसाला श्वास घेणे अवघड जाते.

ध्वनी प्रदूषण

ध्वनी प्रदूषण म्हणजेच – नको असलेला आवाज आणि खूप मोठ्या प्रमाणात होणारा आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण होय.

जसे कि अन्य प्रकारच्या वाहनांचा कर्कश आवाज, तसेच कारखान्यांमध्ये चालणाऱ्या मशिनींचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

तसेच काही लोक अन्य कार्यक्रमाच्या वेळी डीजे, लाऊड स्पीकर जोरजोराने लावतात. त्यामुळे मानवाला बहरेपण यांसारख्या आजाराला सामोरे जावे लागते.

मृदा प्रदूषण

मृदा प्रदूषण म्हणजे मातीचे प्रदूषण. जेव्हा काही लोक दुषित कचरा जमिनीमध्ये गाढतात किंवा कचरा जमिनीवरच जाळला जातो. तसेच दुषित सांडपाणी प्रक्रिया न करता जमिनीमध्ये सोडले जाते.

त्यामुळे जमीन ही नापीक बनते तसेच मातीचे प्रदूषण होते. जंगल तोडीमुळे झाडांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होऊ लागली आहे.

प्रदूषणाचे परिणाम

प्रदूषणामुळे मानवाच्या जीवनावर वाईट परिणाम होतात. प्रदूषणामुळे सर्व ठिकाणी रोगराई पसरते. त्यामुळे अन्य प्रकारचे आजार पसरतात. पाणी दुषित झाल्यामुळे पशु – पक्ष्यांची प्रजाती नष्ट होत चालली आहे.

प्रदूषणामुळे पाऊस वेळेवर पडत नाही आहे. तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती निर्माण होण्यासाठी प्रदूषण कारणीभूत आहे.

निष्कर्ष:

प्रदूषणाच्या संकटातून सुटका करण्यासाठी मानवाला काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मनुष्याला पाणी साठ्यांजवळ कचरा टाकणे बंद करायला हवे. तसेच मानवाने प्लास्टिकचा उपयोग कमी केला पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीने जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत. जर देशातील प्रत्येक व्यक्ती प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करेल तरच आपला देश प्रगती करू शकतो.

Updated: नवम्बर 13, 2019 — 11:03 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *