Plastic Pollution

प्रदूषण मराठी निबंध – वाचा येथे Pollution Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. या विज्ञानामुळे मानवाचे जीवन अत्यंत सुलभ झाले आहे. परंतु मानव या सर्व गोष्टींचा दुरुपयोग करत आहे. आजच्या विज्ञान युगात मानवाला जसे वरदान मिळाले आहे.

त्याच प्रमाणे काही अभिशाप सुद्धा मिळाले आहेत. त्याच बरोबर प्रदूषण हा एक असा अभिशाप आहे जो विज्ञानाच्या क्रांतीतूनच जन्माला आला आहे. आज प्रदूषणामुळे संपूर्ण जगाला अन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आज जगात प्रदूषणाची एक गंभीर समस्या निरमा झाली आहे. मागील काही वर्षांपासून प्रदूषण हे जास्त प्रमाणात वाढत आहे.

प्रदूषणाची व्याख्या

प्रदूषणप्रदूषण म्हणजे जेव्हा घटक किंवा दूषित पदार्थ हे वातावरणात मिसळले जातात. तेव्हा प्रदूषणाची समस्या निर्माण होते. प्रदूषणाची समस्या निर्माण होण्यास सर्व प्रथम मानव जबाबदार आहे.

कारण मानव आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी या पर्यावरणाला नुकसान पोहचवत आहे.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी तीन प्रकारचे प्रदूषण हे जास्त प्रमाणात होते. जसे कि पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण इत्यादि.

पाणी प्रदूषण (दूषित पाणी )

water pollution पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी. जेव्हा कारखान्यातील अशुद्ध सांडपाणी नदी – नाले यामध्ये सोडले जाते तेव्हा संपूर्ण पाणी हे दूषित होते.

पाणी दूषित झाल्यामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात आणि आजार निर्माण होतात. तसेच गावातील काही लोक हे नद्यांमध्ये भांडी व धुतात.

त्याच बरोबर गुरांना सुद्धा धुतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे दूषित झालेले पाणी पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी तसेच पाण्यात राहणाऱ्या जीवांसाठी विनाशकारी आहे.

हवा प्रदूषण (अशुद्ध हवा)

air pollution हवा प्रदूषण म्हणजे – हवेमध्ये घटक पदार्थ मिसळणे. जेव्हा कारखान्यामधून निघणारा धूर आणि रस्त्यावर चालणाऱ्या अन्य प्रकारच्या वाहनांमधून निघणारा धूर हवेमध्ये मिसळला जातो तेव्हा हवा दूषित होऊन हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

हवा दूषित झाल्यामुळे मानवाला श्वास घेणे सुद्धा अवघड जाते. तसेच हवा प्रदूषणास लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण हे प्रमुख घटक जबाबदार आहेत.

ध्वनि प्रदूषण (मोठा आवाज)

sound polusan ध्वनी प्रदूषण म्हणजे – नको असलेला किंवा जोराचा आवाज. काही लोक हे अन्य कार्यक्रमाच्या वेळी लाऊड स्पीकर, डीजे इ. मोठ्या वजने लावतात. त्यामुळे मानवाला याचा आवाज सहन करणे अवघड जाते.

म्हणून त्याला बहरेपणाला शिकार व्हावे लागते. ध्वनी प्रदूषणामुळे मानवाला चीडचिडा पण आणि राग येत नाही तर ह्यामुळे रक्त वाहिन्या सुद्धा संकुचित होतात.

प्रदूषणावर नियंत्रण

भूमि प्रदूषण का परिणाममानवाला प्रदूषणाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व प्रथम माणसाने सार्वजनिक नळ आणि विहिरी तसेच पाण्या साठ्यांजवळ कचरा टाकणे बंद केले पाहिजे.

रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर केला पाहिजे. मानवाने प्लास्टिक पिशव्यांच्या जागी कागदाचा किंवा कपड्याच्या पिशव्यांचा वापर केला पाहिजे.

तसेच मानवाने जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत. मानवाने वाहनांचा उपयोग आवश्यकतेनुसार करणे गरजेचे आहे. तसेच घरे, फॅक्टरी आणि वाहने यापासून निघणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण कमीत – कमी ठेवणे आवश्यक आहे.

निष्कर्ष:

आज प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. यात प्रदूषणामुळे अनेकांचे जीवन नष्ट होत आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या नष्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

तसेच प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावून धरतीला सुजलाम – सुफलाम बनवले पाहिजे. जर आपण सर्वानी मिळून प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न केले तरच आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. त्याच बरोबर अनेक संस्थांनी मिळून लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे.

मराठीतील प्रदूषण निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment