प्रदूषण मराठी निबंध – वाचा येथे Pollution Essay in Marathi Language

प्रस्तावना:

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. या तंत्रज्ञानाच्या युगात मानवाला अनेक वरदान मिळाले आहेत तर काही अभिशाप सुद्धा मिळाले आहे.

परंतु प्रदूषण हा एक असा अभिशाप आहे जो विज्ञानाच्या कोखातून जन्माला आला आहे आणि याला सर्व लोकांना सामोरे जावे लागत आहे. आज प्रदूषणाची समस्या ही गंभीर समस्या बनली आहे.

प्रदूषणाचाही व्याख्या

प्रदूषण म्हणजे नैसर्गिक संतुलनातील एक दोष, प्रदूषणामुळे आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी ना शुद्ध अन्न मिळते. तसेच सजीवांना अपायकारक आणि विषारी पदार्थ जेव्हा वातावरणात मिसळले जातात तेव्हा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. जसे की हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण असे अनेक प्रकार दिसून येतात.

पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी

Essay On Air Pollution in Hindi

जेव्हा काही विषारी पदार्थ नदी – नाले, समुद्र यामध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते त्याला पाणी प्रदूषण असे म्हटले जाते.

मानव उद्योगांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा दूषित कचरा आणि सांडपाणी नदी – नाल्यात सोडतो. त्यामुळे पाणी दूषित होते. पाणी दूषित झाल्यामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात. हे पाणी मानवासाठी हानिकारक असते.

त्याच बरोबर दूषित झालेले पाणी पशु – पक्षी आणि पाण्यात राहणारे जीव – जंतू यांच्यासाठी देखील विनाशकारी असते. तर काही लोक हे नदी – नाल्यांमध्ये कपडे – भांडी धुतात, गुरांना धुतात या सर्वांमुळे पाणी दूषित होऊन जाते.

वायू प्रदूषण म्हणजेच अशुद्ध हवा 

वायू प्रदूषण म्हणजे जेव्हा हवेमध्ये हानिकारक किंवा दूषित पदार्थ मिसळले जातात हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

जसे की दिवसेंदिवस रस्त्यावर चालणाऱ्या विविध वाहनांमधून निघणारा धूर, तसेच कारखान्यातील धूर हा हवेमध्ये मिसळला जातो तेव्हा हवा दूषित होते. त्याच प्रमाणे लोकसंख्येतील वाढ आणि शहरीकरण हे घटक सुद्धा हवा प्रदूषणास जबाबदार आहेत.

हवा दूषित झाल्यामुळे मानवाला श्वास घेणे अवघड होऊन जाते. मानव स्वतः या सर्व प्रदूषणाच्या समस्याना कारणीभूत असतो.

ध्वनी प्रदूषण म्हणजेच मोठा आवाज

कारखान्यातील यंत्र आणि वाहनांचा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होते.

ध्वनी हा हवेच्या माध्यमाने प्रवास करतो त्यामुळे हवेच्या व्यापक गुणवत्ता पातळीमध्ये वाढ होते. या ध्वनी प्रदूषणामुळे मानवाला केवळ रागच येत नाही तर चीड चीडापण सुद्धा होते. तसेच रक्त वाहिन्या सुद्धा संकुचित होतात.

तर काही लोक हे अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने जोर – जोराने लाऊड स्पीकर व डीजे लावतात. यांच्या कर्कश आवाजामुळे मानवाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम होतो.

भूमी प्रदूषण

कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने औद्योगिक आणि घरगुती कचरा जमिनीवर पसरला जातो. तर काही लोक हे कचरा जमिनीमध्ये गाडतात.

अशा दूषित कचऱ्यामुळे जमीन विषारी बनते. तसेच काही शेतकरी हे आपल्या पिकांवरील कीटक मारण्यासाठी अनेक रसायनांचा वापर करतात. त्यामुळे भू – प्रदूषण वाढते.

प्रदूषणाचे परिणाम

प्रदूषणाचे मानवी जीवनावर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक परिणाम होतात. तसेच आज मनुष्य आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी दिवसेंदिवस झाडांची तोड करत आहे.

त्यामुळे झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे निसर्गात हानिकारक पदार्थ मिसळले जात आहेत. प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवी जीवनावर होतो. मानवाला अनेक आजारांना समोरे जावे लागते.

तसेच या धरतीवर राहणाऱ्या प्रत्येक सजीवासाठी प्रदूषण हे घातक आहे. पृथ्वीवरील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात आणि हवामानात बदल घडून येतात.

निष्कर्ष:

प्रदूषणामुळे आपले पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत चालले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत. जेणेकरून आपण या पृथ्वीला सुंदर आणि स्वच्छ प्रकारे ठेवू.

Updated: दिसम्बर 18, 2019 — 8:04 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *