प्रस्तावना:
भारत देश हा ऋतूंचा देश आहे. या भारत देशामध्ये मुख्य सहा ऋतू एका मागून एक येत असतात आणि निसर्गाची शोभा वाढवत असतात.
जसे कि वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर इत्यादि. त्यापैकी तीन ऋतूंना सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते – उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. परंतु पावसाळा हा ऋतू सगळ्यांचा आवडता ऋतू आहे.
कारण अतिशय उन्हामुळे सर्व लोक खूप त्रस्त होतात. त्यामुळे ते पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
पावसाचे आगमन
काही देशामध्ये एकदाच पावसाळा येतो तर काही ठिकाणी दोनदा येतो. पाऊस हा उष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात होतो.
कारण दिवसभर असलेल्या जास्त तापमानामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढते आणि त्याचे रुपांतर पाण्यामध्ये होऊन पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. पाऊस पडला कि मातीमधून सुगंध वास येतो.
पावसाचा आनंद
तर काही पावसात चिंब भिजून मजा करतात. काही लोक पावसाचे पाणी ओंजळीत घेऊन दुसऱ्यांना भिजवतात.
तसेच काही मुले पावसात भिजत “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा असे गाणे म्हणत पावसाचा आनंद घेतात.
निसर्गाचे वर्णन
त्यामुळे सगळे पशु – पक्षी पाण्याच्या शोधात असतात. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. परंतु पाऊस पडल्याने सगळी झाडे हिरवीगार होतात. उन्हाने तापलेल्या वातावरणातगारवा येतो. सर्व झाडांना नवीन जीवनदान मिळते.
पाऊस हा कधी – कधी धो – धो कोसळतो तर कधी – कधी कधी रिमझिम पडतो. त्यामुळे सर्व नदी – नाले पाण्याने भरून वाहू लागतात. त्याचबरोबर सर्व शेतकरी सुद्धा आनंदित होतात.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
जेव्हा पावसाळा सुरु होतो तेव्हा शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतात. कारण शेतीसाठी पाणी आवश्यक असते. जर शेतीसाठी मुबलक पाणी नाही मिळाले तर शेती चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही.
म्हणून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी खूप खुश होतात आणि काहीच महिन्यामध्ये शेतामध्ये पिके डोलू लागतात.
पावसाचे नृत्य
पावसाळ्यात इंद्रधनुष्य
पाऊस कधी – कधी इतका पडतो कि, सगळीकडे पाणीच पाणी होते. तसेच शाळेला सुट्टी सुद्धा मिळते. पावसाळ्यात सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो.
हा इंद्रधनुष्य जेव्हा आकाश साफ, सुंदर आणि निळे दिसू लागते तेव्हा इंद्रधनुष्य दिसतो. लहान मुले इंद्रधनुष्याला बघून भरपूर खुश होतात.
निष्कर्ष:
पावसाळा हा खरच खूप सुंदर ऋतू आहे. पावसाळा हा सर्वांचा सुखदाता आणि सर्व सृष्टीचा पोशिंदा आहे. पावसाळा सर्व सृष्टी – सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण करतो.
पावसाळा हा सर्व ऋतूंचा राजा आहे. तसेच काही कवींनी सुद्धा पावसाळ्याचे वर्णन आपल्या कवितांमध्ये केले आहे.
मराठीतील पावसाळा निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.