Rainy Season 1

पावसाळा मराठी निबंध – वचे येथे Pavsala Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमचा भारत देश ऋतूंचा देश आहे. या देशामध्ये प्रत्येक ऋतू एका मागे एक येत राहतात आणि या निसर्गाची शोभा वाढवत असतात. त्या सर्व ऋतूंपैकी पावसाळा हा एक ऋतू आहे जो सर्वांचा आवडता ऋतू आहे. त्यामुळे हा ऋतू सर्वाना हवाहवासा वाटतो तेव्हाच येतो.

पावसामुळे निसर्गात खूप बदल होतात. पावसाळा सुरु होण्या आधी डोक्यावर रणरणारे ऊन, पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन, अंगावर येणाऱ्या घामाच्या धारा यामुळे माणसाला आपले जीवन नकोसे वाटते.

तसेच माणसे उकाड्यामुळे हैराण झालेली असतात. त्यामुळे सर्व सजीव आणि मानव पावसाची आतुरतेने वाट बघत असतो.

पावसाचे आगमन

वर्षा ऋतु के कुछ दुष्परिणाम पावसाळा हा ऋतू जुने महिन्यात सुरु होतो आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. जेव्हा आकाशात काळे ढग जमा होतात आणि वातावरण अंधारून जाते तेव्हा पाऊस पडू लागतो. असे वाटते कि ढगांना खाली यायची घाई झाली आहे.

जेव्हा पाण्याचे थेंब जमिनीवर पडू लागतात आणि पहिला पाऊस कोसळतो तेव्हा संपूर्ण निसर्ग ओलाचिंब होतो. मातीमधून सुगंध दरवळतो.

पहिला पाऊस

वर्षा ऋतु से पूर्व की दशापहिला पाऊस म्हणजे घरादारांची, वृक्षवेलींची जणू काही पहिली अंघोळच आहे. त्यामुळे सारे वातावरण स्वच्छ होऊन जाते.

लहान मोठी माणसेही पावसामध्ये मनसोक्त भिजून आनंद घेतात. त्याच प्रमाणे पक्षीही पहिला पाऊस आपल्या अंगावर घेतात.

पहिला पाऊस पडताच मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतात. दरवर्षी येणाऱ्या या पाहुण्याच्या स्वागतासाठी लोक तयारी करतात. छत्र्या व रेनकोट खरेदी करतात.

निसर्गाची सुंदरता

वर्षा का वर्णन संक्षिप्त मेंपाऊस पडल्यावर माणसाना आनंद होतोच, परंतु पशु – पक्षी सुद्धा उल्हासित होतात. झाडे – पाने पावसाच्या तालावर नाचू लागतात. एका पावसातच झाडे हिरवीगार होतात. झाडांना नवीन जीवन दान मिळते.

असा वाटत कि ही धरती जणू सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्न मुद्रेने आनंद व्यक्त करत आहे. पाऊस पडताच सगळीकडे पाणीच – पाणी होते. यामुळे निसर्गाची सुंदरता मनमोहक वाटते.

इंद्रधनुष्य

Rainbow पावसाळ्यात सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो. जेव्हा आकाश साफ, सुंदर आणि निळे दिसू लागते तेव्हा सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो. हा इंद्रधनुष्य बघताना छोट्या मुलांना खूप आनंद होतो. छोटी मुले आनंदाने नाचू लागतात.

निसर्गाची देण

पाऊस म्हणजे – निसर्गाची एक महत्वाची देण आहे. कारण मानवाला, पशु – पक्ष्यांना, झाडे – झुडपाना, वेलींना पाण्याची गरज असते. मानव पावसाचे पाणी अडवून आपल्या शेतीसाठी साठवतो आणि त्याचा उपयोग आवश्यकतेनुसार करतो. तसेच पावसाळ्यात सर्व पाण्याचे स्त्रोत तुडुंब भरून वाहू लागतात. नद्या, नाले, झरे यातील वाहणारे पाणी जाऊन समुद्राला मिळते.

शेतकऱ्यांसाठी उपयोगी

वर्षा ऋतु से लाभशेतकरी पावसाची खूप आतुरतेने वात बगाहत असतो. पाऊस पडायच्या आधी शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतो आणि जमीन नांगरून ठेवतो.

शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पाण्याची गरज भासते. पाण्याशिवाय तो आपली शेती करू शकत नाही. म्हणून शेतकरी पाऊस पडल्यावर आपल्या शेतात पिके पिकवतात.

तसेच कुणी भाजीपाला उगवतो, तर काही शेतकरी मोठा बगीचा तयार करून आपल्या शेतात अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतात.

पावसामुळे नुकसान

वर्षा जलकधी – कधी हा पाऊस रिमझिम पडतो तर कधी – कधी हा पाऊस धो – धो कोसळतो. त्यामुळे काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचते. वाहने वाटेतच बंद पडतात. शाळांना सुट्टी मिळते.

पण असे वाटते कि, जर या पावसाने आपले रौद्र रूप धारण केले तर महाभायाकार होऊ शकते. पुराची शक्यता वाढते. जीवित हानी होते आणि शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते.

निष्कर्ष:

पावसाळा हा ऋतू सुखदाता आहे आणि जगाचा पोशिंदा सुद्धा आहे. तो चराचरामध्ये नवीन चैतन्य निर्माण करतो. पावसाळा हा ऋतू सर्व ऋतूंचा राजा आहे.

मराठीतील पावसाळा निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment