पावसाळा मराठी निबंध – येथे वाचा Pavsala Essay in Marathi Language

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा ऋतूंचा देश आहे. येथील प्रत्य्येक ऋतू हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासह येतो. प्रत्येक ऋतू हा आपले सौंदर्य या संपूर्ण निसर्गात पसरवतो. भारत देशात येणाऱ्या प्रत्येक ऋतूचे विशेष महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंपैकी पावसाळा हा सर्वात महत्वाचा ऋतू आहे. तसेच आमचा भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. म्हणून शेती ही पाण्यावर अवलंबून असते.

या पाण्याशिवाय कोणताही सजीव आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. म्हणून सर्व लोक हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. पावसाचे पाणी हे मानवासाठी एक अमृताप्रमाणेच आहे.

पावसाची सुरुवात

पावसाची सुरुवात ही आषाढ किंवा श्रावण महिन्यापासून होते. तसेच हा पाऊस जून महिन्यापासून सुरु होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो.

जून पासून सुरु होणाऱ्या पावसामुळे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणाऱ्या जास्त उकाड्यामुळे सर्व लोकांना उष्णतेमुळे आराम मिळतो. तसेच पावसाळा हा ऋतू शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा असतो.

निसर्गाची सुंदरता

पाऊस सुरु व्हायच्या आधी सर्व लोक, प्राणी, पक्षी हे जास्त उकाड्यामुळे त्रस्त झालेले असतात. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतात.उन्हाळ्यात सर्व झाडे सुकुन जातात.

जेव्हा पावसाचे पाणी झाड – झुडपांवर पडते तेव्हा सर्व झाडे हिरवीगार दिसू लागतात. त्याच बरोबर सर्व झाडांना पावसाळयात नवीन पालवी येते. तसेच पावसाळ्यात गवार हिरवेगार, सुंदर दिसू लागते. संपूर्ण वातावरण हिरवेगार होते.

निसर्गाचे दृश्य बघताना असे वाटते कि, जाणून काही या निसर्गाने ‘हिरवा शालू’ पांघरला आहे. पावसाळा या हंगामात ताज्या फळांचा आणि रसाळ आंब्यांचा स्वाद घ्यायला मिळतो. सगळी माणसे जसे कि, लहान – थोर माणसे पावसाचा आनंद घेतात.

पावसाचा निसर्गावर परिणाम

पावसाळ्यात सगळीकडेच पाणीच – पाणी होते. तसेच मैदाने, बगीचे हे सुंदर मखमली गवताने झाकले जाते. तसेच पाण्याचे सर्व स्रोत पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहू लागतात. जसे कि नदी – नाले, तलाव, विहिरी इत्यादी. रस्ते सुद्धा पाण्याने भरले जातात.

पावसाळ्यात माती एकदम चिखल बनून जाते. पावला या ऋतूचे अनेक फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. एकीकडे पावसाळ्यात लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळतो तर दुसरीकडे बरेच संक्रमक रोग पसरण्याची भीती असते.

शेतीसाठी फायदेशीर

पावसाचे पाणी हे शेतीसाठी फार उपयुक्त असते. कारण शेतीला पाणी मिळाले नाही तर शेतकरी शेती करु शकत नाही. म्हणून या हंगामात शेतीचे कल्याण व्हावे यासाठी शेतकरी बांधव इंद्र देवाला प्रार्थना करतात. इंद्रदेव हे भारतीयांसाठी खूप महत्वाचे आहेत.

कारण इंद्र देवाला पावसाळा या ऋतूचे स्वामी मानले जातात. या पावसाळ्यामुळे सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना, वनस्पतींना, झाडांना आणि मानवाला नवीन जीवनदान मिळते. पाऊस पडताच सर्व पक्षी आणि प्राणी आनंदाने क्रीडा करू लागतात.

पावसाळ्यातील सण

जसा पावसाळा हा ऋतू सुरु होतो तसेच आपल्या भारत देशात सणांची सुरुवात होते. पावसाळा या ऋतूमध्ये अनेक सण येतात. जसे की १५ ऑगस्ट, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी इत्यादी.

पावसाळ्यात इंद्रधनुष्य

पावसाळयात जेव्हा आकाश स्वच्छ, सुंदर आणि हलके निळे दिसू लागते तेव्हा कधी – कधी सात रंगाचा इंद्रधनुष्य देखील दिसतो. त्यावेळी संपूर्ण वातावरण आकर्षक आणि सुंदर दिसते. तसेच पांढरे, तपकिरी आणि गडद काळे ढग आकाशात प्रवास करताना दिसतात. लहान मुले इंद्रधनुष्य बघताना खूप आनंदित होतात.

निष्कर्ष:

पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वानाच लाडका आहे आणि या ऋतूमुळे निसर्गात खूप सारे बदल होतात. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनात पावसाळा या ऋतूचे सर्वात जास्त महत्व आहे.

कारण या पावसामुळे पृथ्वीची संपूर्ण जीवन प्रणाली चालू आहे. असा हा सुखदाता पावसाळा हा ऋतू सर्व सृष्टीचा पोशिंदा आहे. तो संपूर्ण चराचरात चैतन्य निर्माण करतो.

Updated: नवम्बर 27, 2019 — 11:42 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *