पावसाळा वर मराठी निबंध – वाचा येथे Paus Aala Essay in Marathi

प्रस्तावना:

आपला भारत देश हा ऋतूंचा देश आहे. या देशामध्ये सहा ऋतू हे एकामागून येत असतात आणि या निसर्गाची शोभा वाढवत असतात.

त्या सर्व ऋतूंपैकी पावसाळा हा एक सर्वात महत्वाचा ऋतू आहे. पावसाळा हा एक असा ऋतू आहे ज्याची प्रत्येकजण अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. या ऋतूला सध्या आणि सोप्या भाषेत ‘पावसाळी हंगाम’ देखील म्हणतात.

पावसाची सुरुवात

आपल्या भारत देशामध्ये पावसाळा हा ऋतू ३ महिन्यांपर्यंत चालतो. पावसाळा हा ऋतू जून किंवा जुलै महिन्यापासून सुरु होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. पाऊस मुख्यतः श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात पडतो. या महिन्यांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे सर्व सजीवांना मुक्तता मिळते.

पावसाच्या आधीची स्थिती

पाऊस पडायच्या आधी सर्व माणसे, प्राणी व पक्षी हे जास्त उन्हाच्या उकाड्यामुळे त्रस्त झालेले असतात. तसेच संपूर्ण धरती ही तव्यासमान तापलेली असते.

त्यामुळे संपूर्ण वातावरण हे गरम असते. उन्हाळयात सर्व झाडे आणि वनस्पती या सुकून जातात. तसेच पाण्याचे सर्व स्रोत हे सुखतात. त्यामुळे मनुष्य, प्राणी आणि पक्षी हे पाण्याच्या शोधात भटकत असतात.

हे सर्व पाण्यासाठी व्याकुळ झालेले असतात. कधी हा एकदाचा पाऊस येतो आणि तणाव देतो असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणून सगळेजण आकाशाकडे नजर लावून असतात.

पावसाचे वर्णन

जेव्हा आकाशात काळे ढग निर्माण होतात आणि संपूर्ण वातावरण अंधारून जाते तेव्हा पाऊस पडू लागतो. असे वाटते की, जणू काही ढगांना खाली यायची घाई झाली आहे. पावसाचे थेंब हे खाली येतात आणि जमिनीवर पहिला पाऊस पडू लागतो.

पहिला पाऊस म्हणजेच जणू काही घरादाराची, वृक्षवेलींची जणू काही आंघोळच. पहिला पाऊस पडताच निसर्ग ओलाचिंब होतो आणि मातीतून सुगंध दरवळू लागतो.

पाऊस पडताच सर्व झाडे आणि वेली देखील टवटवीत होतात. सर्व झाडांना आणि वनस्पतींना नवीन जीवन दान मिळते. सगळे पशु – पक्षी आनंदित होऊन नाचू लागतात. नदीचे सर्व स्रोत हे पाण्याने तुडुंब भरून वाहू लागतात.

पाऊस शेतीसाठी उपयुक्त

पावसाळा हा ऋतू भारत देशासाठी खूप महत्वाचा आहे. कारण भारत हा एक कृषिप्रधान देश आहे आणि या देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात.

खेड्यातील लोक हे शेती हा व्यवसाय करतात. तसेच भारताची शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. शेतकरी हे पावसाळ्यातच पिकाची पेरणी करतात.

पावसाळ्यात सणांची सुरुवात

जसे पावसाचे आगमन होते तसे अनेक सण हे एकामागून एक हे येत असतात. श्रावण महिना हा सर्वात शुभ मानला जातो. या पावसामुळे सर्वाना खूप आनंद मिळतो. संपूर्ण वातावरण हे थंड आणि मोहक बनते.

असे म्हटले जाते की भारताचे सण हे पावसाळ्यापासूनच सुरु होतात. पावसाळ्यात साजरे करण्यात येणारे मुख्य सण पुढीलप्रमाणे – रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, १५ ऑगस्ट, नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी इ.

पावसाळा ऋतूचे फायदे व तोटे

पावसाळा या ऋतूचे आपल्याला अनेक फायदे होतात. जर हा पाऊस जास्त प्रमाणात पडला तर पूर येण्याची देखील शक्यता असते. या पावसाचे अनेक फायदे आणि तोटे देखील आहेत.

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. अन्य प्रकारची पसरल्यामुळे डेंगू, मलेरिया इ अनेक आजार निर्माण होतात. तसेच पावसाळ्यात किडे देखील बाहेर पडतात.

निष्कर्ष:

पावसाळा हा ऋतू सर्व सजीवांसाठी आणि मानवासाठी एक वरदान आहे. तसेच आपण सर्वानी या ऋतूचे पूर्ण उत्साहाने स्वागत केले पाहिजे.

पावसामुळे फक्त आनंदच मिळत नाही तर सगळीकडे हिरवळ देखील पसरते. म्हणून आपण सर्वानी देवाचे आभार मानले पाहिजे की, त्याने आम्हाला पावसाळा हा ऋतू एक भेट म्हणून दिली आहे.

Updated: दिसम्बर 18, 2019 — 7:53 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *