पाण्याचे महत्त्व मराठी निबंध – येथे वाचा Panyache Mahatva Essay in Marathi

प्रस्तावना:

पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे. हे सर्व सजीवांची आणि मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच पाणी हा मानवाच्या जीवनाचा एक मूलभूत घटक आहे.

पाणी म्हणजेच जल होय. या धरतीवरील प्रत्येक सजीवांचे आणि मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. कारण कोणताही मनुष्य, प्राणी, पशु आणि पक्षी तसेच जीव – जंतू हे पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही.

माणूस काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो. परंतु पाण्याशिवाय तो एकही राहू शकत नाही. तसेच पाण्याशिवाय तो आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.

पाण्याचे प्रकार

पाण्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गोड पाणी आणि दुसरं म्हणजे खारट पाणी. गोड पाण्याचा उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. जसे की जेवण बनविण्यासाठी, पिण्यासाठी इ. परंतु खारट पाण्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जात नाही.

पाण्याचे प्रमाण

आपल्या पृथ्वीचा ७१% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यापैकी १% पाणी हे योग्य आहे. परंतु सर्वात मोठी समस्या आहे की, पिण्यायोग्य पाणी सर्वात कमी आहे. म्हणून आपल्याला पाण्याची बचत करणे गरजेचे आहे.

पाण्याचा उपयोग

मानव पाण्याचा उपयोग हा केवळ पिण्यासाठीच करत नाही तर आंघोळीसाठी, कपडे आणि भांडी धुण्यासाठी तसेच साफ – सफाई करण्यासाठी करतो.

त्याच परिमाणे औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते. पाण्याची सर्वात मोठी गरज ही शेती करताना असते. कारण शेती ही प्रामुख्याने पाण्यावरच अवलंबून असते.

मानव पाण्याशिवाय कोणतेही पीक घेऊ शकत नाही. तसेच झाडांना आणि वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज भासते.

वनस्पतींसाठी पाण्याचे महत्त्व

मानवाप्रमाणेच झाडांना सुद्धा पाण्याची गरज असते. कारण झाडे आपल्या मुळातून जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि सर्व शाखांपर्यंत पोचवतात. तसेच झाडाच्या खोडात पाणी साठवले जाते.

पाण्याशिवाय झाडांची लागवड सुद्धा करता येत नाही. जेव्हा झाडांना आणि वनस्पतींना पाणी मिळत नाही तेव्हा झाडे, वनस्पती सुकून जातात आणि लवकरच मरून जातात. आपल्याला झाडांपासून फळे, फुले, भोजन आणि इंधन सुद्धा प्राप्त होते.

प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याचे महत्त्व

जशी मानवाला तहान लागते त्याच प्रमाणे प्राणी आणि पक्षयांनासुद्धा तहान लागते. गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, सिंह इ प्राणी देखील पाणी पितात. पाणी ही एक अशी गोष्ट आहे ज्या शिवाय कोणीही जगू शकत नाही.

वाळवंटा मध्ये राहणारा उंट हा ५० लिटर पाणी आपल्या शरीरात साठवून ठेवतो. म्हणून तो बरेच दिवस पाण्याशिवाय जगू शकतो.

पाणी संवर्धन करण्याचे उपाय

पाणी हे एक अमूल्य संसाधन आहे. याचा उपयोग प्रत्येकाने सांभाळून केला पाहिजे. प्रत्येक माणसाने पाणी कधीही व्यर्थ वाया घालवू नये. माणसाने पाण्याचा उपयोग हा आवश्यकतेनुसार करणे गरजेचे आहे.

जेव्हा आपण कोणतीही भाजी किंवा फळे धुतो तेव्हा नळाच्या ऐवजी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन धुतली पाहिजेत. प्रत्येकाने काम झाल्यावर नळ हा बंद केला पाहिजे. अंघोळ करताना शॉवर ऐवजी बादलीचा उपयोग केला पाहिजे.

तसेच पावसाचे पाणी हे टाकी किंवा तलावामध्ये जमा करून ठेवले पाहिजे. त्याच परिमाणे नदी – नाले आणि तलावांमध्ये दूषित पाणी सोडले जाऊ नये.

निष्कर्ष:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पाण्याचा ऐक – एक थेंब महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे. या पाण्याशिवाय कोणताही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. म्हणून म्हटले आहे की, पाणी हेच जीवन आहे.

तसेच मानवाला पाणी हे निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. पाण्याचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने समजून घेतले पाहिजे आणि त्याच योग्य वापर केला पाहिजे.

Updated: November 27, 2019 — 11:42 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *