प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान पुरुषांचा देश आहे. या भारत देशात अनेक महान पुरुष होऊन गेलेत. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेचले.
ज्या भारत देशाने बऱ्याच वर्षांपासून ब्रिटिशांची गुलामगिरी केली आणि अन्याय व अत्याचार सहन करणाऱ्या देशाला मुक्त करण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मोलाचे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे महान पुरुष होते.
पंडित जवाहलाल नेहरू यांना राष्ट्रे चळवळीच्या वेळी अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. परंतु त्यांनी आपला उद्देश कधीच सोडला नाही. ते आपल्या दृढ निश्चयाने पुढे जात राहिले आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण केले.
पंडित जवाहलाल नेहरू हे भारताचे खरे देशभक्त होते. तसेच ते महान लेखक, कुशल राजनेता आणि विचारक सुद्धा होते.
जन्म
त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. जे एक प्रसिद्ध बॅरिस्टर आणि समाजसेवक होते. तसेच त्यांच्या आईचे नाव स्वरूप रानी असे होते.
शिक्षण
त्यांनी आपल्या वयाच्या १५ व्या वर्षी सन १९०५ ला नेहरूंना इंग्लंड येथील हॅरो स्कुल मध्ये पाठविण्यात आले. २ वर्षानंतर पंडित नेहरूंनी लंडन येथील ट्रिनेटी कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी प्रेवेश घेतला. कैम्ब्रिज विश्वविद्यालयातुन त्यांनी न्याय शास्त्रातील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सन १९१२ साली भारत देशात परतले आणि आपल्या वकिलाला सुरुवात केली.
राजकारणात प्रवेश
पंडित जवाहरलाल नेहरू सन १९१७ साली होमरूल चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यांनी २ वर्षानंतर राजकारणामध्ये प्रवेश केला. तेव्हाच त्यांचा परीचा महात्मा गांधीजींशी झाला.
जेव्हा महात्मा गांधीजींनी रौलेट अधिनियम या विरोधात मोहीम सुरु केली. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे गांधीजींच्या शांतिपूर्वक सविनय कायदेभंग आंदोलनाने प्रभावित झाले. ते महात्मा गांधीजींना आपला आदर्श मानू लागले. तसेच त्यांनी विदेशी वस्तुंचा त्याग केला.
त्याच प्रमाणे त्यांनी सन १९२० ते १९२२ मधल्या गांधीजींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांना अटक सुद्धा झाली होती.
पूर्ण स्वातंत्र्याची मागणी
त्या सत्रात पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. त्यावेळी मोतीलाल नेहरू आणि ब्रिटिश शासनाकडे संपूर्ण राज्याची ईच्छा धरून होते. १९२९ ला लाहौर अधिवेशन भरण्यात आलं.
त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सत्रातच एक प्रस्ताव मांडण्यात आला ज्यात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली.
भारताचे पहिले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू हे पद सांभाळत असताना देशाच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.
त्यांनी भारताच्या भावी विचारसरणीने सामर्थ्यवान भारत देशाचा पाया रचला. तसेच भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली आणि विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले.
निष्कर्ष
पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुलांबद्दल अतिशय प्रेम होते. त्यामुळे त्यांना लहान मुले ‘चाचा नेहरू’ असे म्हणत.
पंडित नेहरूंच्या आधुनिक विचारसरणीमुळे आपण आज सर्वजण आधुनिक आर्थिक दृष्ट्या मजबूत आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू हे एक यशस्वी आणि पराक्रमी नेता म्हणून त्यांची ख्याती होती.