neture

निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Nisarg Maza Mitra Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

परमेश्वराने या निसर्गाला भरपूर सुंदर प्रकारे बनविल आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मनुष्य जीवन आहे.

या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथे असणारे वातावरण आणि निसर्ग. निसर्ग आणि मनुष्य या दोघांचा भरपूर जुना संबंध आहे. या निसर्गातून मनुष्याला विविध प्रकारची वस्तू प्राप्त होते.

हा निसर्ग मनुष्याला भरपूर काही देतो पण त्या बदल्यात मनुष्याशी काहीही मागत नाही. या निसर्गाशिवाय मनुष्य अपना जीवन नाही जगू शकत.

निसर्ग म्हणजे काय –

Nisarg निसर्ग म्हणजे सृष्टी, पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश या पांच तत्वांनी बनलेली सृष्ह्ती म्हणजे निसर्ग होय. मनुष्याचा जन्म या पांच तत्वातूनच झाला आहे. आम्ही सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीनही होतो.

निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी

gostti या निसर्गातून मनुष्याला जीवन जगण्यासाठी शुद्ध हवा मिळते. तसेच त्याला निसर्गातून फुले, फळे, भाज्या इ. वस्तू प्राप्त होतात. म्हणून हा निसर्ग दानशूर आहे. निसर्ग हा बोलत नाही पण कृती करतो.

मनुष्य या निसर्गाच्या अंगाखांद्यावर प्रगत होऊ लागला. त्याने अवजारे बनवली. दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला. तसेच मानवाने चाकाचा शोध लावला.

यामुळे मानवाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. मनुष्य दगडाच्या मदतीने शिकार करू लागला आणि आगीच्या मदतीने शिकार शिजून खायला लागला.

मानव आणि निसर्ग

निसर्गाचीहजारो वर्षानंतर मनुष्याचे जीवन सुधारू लागले. मनुष्य इमारती बंधू लागला कपडे शिउन घालू लागला. मानवाला अन्य प्रकारच्या आजारापासून औषधानी दूर ठेवले आणि माणसाचे आयुष्य वाढू लागले.

यामुळे लोकसंख्या वाढू लागली. समाज निर्माण होऊ लागला. भाषेची आणि लिपीची गरज भासू लागली. तसेच संस्कृती आणि परंपरा निर्माण होऊ लागल्या. या निसर्गाने मानवाच्या प्रगतीसाठी त्याची साथ दिली. मानवाचा विकास होण्यासाठी विविध साधन सामुग्री दिली.

त्यानंतर त्याने विजेचा शोध लावला, रस्ते बांधले, नौका बनवल्या समुद्र प्रवास चालू केला. हि सगळी कल्पना आणि प्रेरणा मनुष्याला निसर्गाकडूनच मिळाली.

झाडांचे महत्व

पेड़ पौधों की रक्षामनुष्यला या निसर्गातून भरपूर काही मिळाल. त्यामध्ये त्याला मुख्य म्हणजे – झाडांमुळे विविध वस्तू मिळू लागल्या. या धरतीवर झाड हे निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे. झाडांपासून मनुष्याला अन्य प्रकारची वस्तू मिळतात.

त्या वस्तूंचा उपयोग मनुष्य आपल्या जीवनामध्ये करतो. तसेच मनुष्याला झाडांपासून लाकूड मिळते. त्याचा उपयोग मनुष्य इंधन म्हणून करतो.

मनुष्य झाडांच्या लाकडापासून दरवाजे, खिडकी आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो. परंतु मनुष्य आपली सुख – सुविधा तसेच स्वार्थ पुरा करण्यासाठी झाडांची तोड करतो.

निसर्गाचा ऱ्हास

हिरवीगार बाग आज मनुष्य या सुंदर निसर्गाचा आपल्या सुख सुविधांसाठी ऱ्हास करत आहे. या निसर्गाचा ऱ्हास केल्यामुळे प्रदूषण, वृक्षतोड, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या निर्माण होत आहेत. मनुष्य या निसर्गावर आपल वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्य निसर्गाला लुटत आणि जखमा पोहचवत आहे.

निष्कर्ष:

या धरतीवर राहणाऱ्या सर्व लोकांना आज निसर्ग जपण्याची भरपूर गरज आहे. ज्याने आपला जनम दिला, ज्याने आपले संगोपन केले, आपल्या प्रगतीचा सोबती झाला त्याचाच आपण विनाश करत आहोत.

जर त्याचा विनाश असाच करत राहिलो तर निसर्गाकडे सुद्धा आपला विनास्घ करण्याची ताकद आहे. आपण सर्वांनी मिळून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे आणि त्याच बरोबर वृक्षारोपण सुद्धा केले पाहिजे.

निसर्ग हा आपला आयुष्यभराचा सोबती आहे. तसेच या निसर्गातून बराच काही शिकायला मिळत. म्हणूनच निसर्ग हाच माझा सोबती, गुरु, सखा व मित्र आहे.

मराठीतील निसर्ग माझा मित्र निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment