प्रस्तावना:
पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मानवाचे जीवन अस्तित्वात आहे. या ग्रहावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत.
मानव आणि निसर्ग (पर्यावरण) या दोघांचा खूप जुना संबंध आहे. या निसर्गातून मानवाला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.
ईश्वराने या निसर्गाची रचना अत्यंत चांगल्या प्रकारे केली आहे. निसर्ग मानवाला खूप काही देतो. पण त्या बदल्यात मानवाकडे काहीही मागत नाही.
निसर्ग म्हणजे –
निसर्ग म्हणजे – सृष्टी होय. ही सृष्टी पृथ्वी, पाणी, अग्नी, आयु आणि आकाश या पांच ततावणी बनली आहे. मानवाचा जन्म या निसर्गाच्या पांच तत्वातूनच झाला आहे. म्हणून त्याचे जीवन हे या पांच तत्वांवर अवलंबून आहे.
या पांच तत्त्वात मानव विलीन झाला आहे. या निसर्गात मानव जन्म घेतो, वाढतो आणि शेवटी विलीन होतो. म्हणून या निसर्गाचे जतन कारणी किंवा काळजी घेणे गरजेचे आहे.
निसर्ग मानवाचा सोबती
निसर्ग हा मानवाचा सोबती, गुरु आणि मित्र असतो. त्याच बरोबर निसर्ग हा आपला डॉक्टर सुद्धा असतो. जसे गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाच्या आणतो. त्याला एक आदर्श व्यक्ती घडवतो.
तसेच निसर्ग सुद्धा आपल्याला ज्ञान देतो, शिकवण देतो आणि बोधप्रद धडे देतो. निसर्ग जरी बोलत किंवा सांगत नसला तरी तो आपल्या कृतीतून बरेच काही शिकवतो. निसर्ग हा आपल्यासाठी खूप मोठ वरदान आहे.
या निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच या निसर्गातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होत. या निसर्गाने झाड, नदी, समुद्र, पाणी आणि रंग अशी खूप किमया केली आहे.
निसार हा एक चित्रकार
निसर्गावर परिणाम
यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. आकाशातील चंद्र उंच – उंच इमारतींच्या मागे लपत आहे. जनागल तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तर कधी – कधी निसर्ग आपला रौद्र रूप धारण करत आहे. अतिवृष्टीमुळे नद्या – नाल्यांना पूर येऊन शहरे किंवा गाव नष्ट होत आहेत. तर कधी – कधी भूकंपामुळे हजारो घरे उध्वस्त होत आहेत.
निष्कर्ष:
हा निसर्ग आपल्याकडे काहीही न मागता आपल्या सर्व काही देतो. म्हणून आपण सर्वांनी मिळून या निसर्गाला काहीतरी दिले पाहिजे. म्हणजेच आपल सगळ्याचं कर्तव्य आहे कि, निसर्गाचे संतुलन बिघडले नाही पाहिजे.
निसर्गाला सुंदर आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या निसर्गातून आपल्याला किती काही शिकायला मिळत. म्हणून हा निसर्ग आपला गुरु,सोबती आणि सखा व मित्र आहे. तसेच हा निसर्ग खूप दानशूर आहे.
मराठीतील निसर्ग वर निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.