प्रस्तावना:
आपण सर्वजण हिरव्यागार रंगाने भरलेल्या स्वच्छ आणि सुंदर निसर्ग असलेल्या ग्रहावर राहतो. पृथ्वी हा एक ऐसा ग्रह आहे ज्यावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध आहेत. निसर्ग हा मानवाचा चांगला मित्र आहे.
कारण आम्हा सर्व सजीवांना राहण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून देतो. म्हणून मानव आणि निसर्ग यांचे अतूट संबंध आहे. या निसर्गातून मानवाला भरपूर काही मिळत. पण त्या बदल्यात निसर्ग मानवाकडे कधीच काही मागत नाही.
निसर्ग म्हणजे काय –
निसर्ग म्हणजे सृष्टी होय. हि सृष्टी पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश या पांच तत्त्वांनी बनलेली आहे. निसर्ग आणि मानव यांचे नाते हे जन्मापासूनचे आहे. कारण याच पांच तत्त्वातून मानवाचा जन्म झाला आहे.
आपण सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीन सुद्धा होतो. म्हणून या निसर्गाचे जतन करणे आणि पोषण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
निसर्ग आणि मानव
हा निसर्ग आम्हा सर्वाना पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जागा आणि आमच्या इतर उपयोगांसाठी वनस्पती देतो.
निसर्ग माझा मित्र
जस फुल काट्यात फुलते तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहावे, झाडांप्रमाणे नेहमी खंबीरपणे उभ राहून दुसऱ्यांना सहायता करणे, नदीच्या समोर जसे अनेक अडथळे आले तरी ती वाहत असते.
त्याचप्रमाणे आपण सर्वानी कष्टांना न घाबरता सामोरे जाणे आवश्यक आहे. हे सर्व निसर्ग आपल्याला शिकवतो.
निसर्ग एक चित्रकार
निसर्ग हा एक चित्रकार आहे. हा निसर्ग नेहमी किती चित्र रंगवतो आणि आपल्याला प्रेरणा देतो. जसे कि खोल दऱ्या, निर्मल वाहणारे झरे, अथांग सागर, घनदाट जंगल, बर्फाच्छादित शिखरे, कमळांनी भरलेली सरोवरे, वाऱ्याच्या झोक्यावर डोलणारी हिरवीगार शेते, डोंगर आडून उगवणारा सूर्य हे सर्व किती सुंदर आहे. या सगळ्याचा अनुभव आम्ही नेहमी घेत असतो.
विविध ऋतू
जसे कि रिमझिम पडणारा पाऊस आणि त्यामुळे मातीतून येणारा सुंगंध वास, वाऱ्याचा झोका व त्या बरोबर येणारा फुलांचा सुगंध, तसेच उन्हाची मनाला लागणारी झुळूक हे सगळं मनमोहक आहे.
त्याच बरोबर समुद्राच्या लाटा, पक्ष्यांची किलबिल, सूर्याची कोवळी तांबूस किरणे आणि आकाश हे सर्व जणू काही निसर्गाची किमया आहे. ही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.
निसर्गाला हानी
मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी या धरतीवर असलेल्या वृक्षांची तोड करत आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.
जंगल तोडीमुळे पाऊस कमी पडत आहे. अतिवृष्टी होत आहे आणि भूकंपामुळे अनेक घरे – जमीन उध्वस्त होत आहेत. त्यामुळे निसर्गाच्या भयंकर रूपाचे दर्शन घडत आहेत.
निष्कर्ष:
निसर्ग हि देवाने दिलेली महत्वाची देणगी आहे. निसर्गाचे संतुलन ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच प्रदूषण कमी करून जास्तीत – जास्त वृक्षारोपण केले पाहिजे.
त्याच बरोबर अनेक कवींनी आणि लेखकांनी आपल्या कवितांमधून निसर्गाचे खूप सुंदर प्रकारे वर्णन केले आहे. म्हणून हा निसर्गाचं आपला खरा सोबती, मित्र आणि सखा आहे.
मराठीतील निसर्ग माझा मित्र निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.