प्रस्तावना:
सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे आणि आपण सर्व या सुंदर ग्रहावर राहतो. ही पृथ्वी खूपच सुंदर आणि हिरवीगार पालवीसह आकर्षक आहे.
या सुंदर ग्रहावर मानव वस्ती अस्तित्वात आहे. कारण येथे मानवाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून मानव आपले जीवन हे अत्यंत चांगल्या प्रकारे जगत आहे.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी
निसर्ग हा मानवाला आणि सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना आपले जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन प्रदान करतो. तसेच पिण्यासाठी पाणी देतो, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा, पोटासाठी अन्न, राहण्यासाठी घर इत्यादी सर्व काही देतो.
तसेच मानव निसर्गातून मिळणाऱ्या झाडांचा उपयोग हा इंधनाच्या रूपाने करतो. या निसर्गातून मानवाला अनेक खनिज संपत्ती सुद्धा प्रप्त होते.
निसर्गाची निर्मिती
ईश्वराने या निसर्गाची अत्यंत सुंदर प्रकारे निर्मिती केली आहे. निसर्ग मानवाला ईश्वराकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. कारण आपल्या आजूबाजूचा सर्वात सुंदर आणि आकर्षक निसर्ग हा आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक वातावरण प्रदान करतो.
या निसर्गामध्ये अनेक प्रकारची फुले, आकर्षक पक्षी, अन्य प्राणी, हिरवीगार वनस्पती, निळे आकाश, जमीन, समुद्र, नदी – नाले, वन, पर्वत, पठार, डोंगर, सूर्य, चंद्र, तारे इ सर्वांचा समावेश आहे. आपण सार्वजण आपल्या जीवनामध्ये जे काही वापरतो ती सर्व निसर्गाची संपत्ती आहे.
झाडांच्या लाकडाचा उपयोग
मानव या निसर्गातून मिळणाऱ्या झाडांच्या लाकडाचा उपयोग हा इंधन म्हणून करतो. तसेच मानव झाडाच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.
तसेच उद्योगांना लागणार कच्चा माल तयार करतो. त्याच प्रमाणे रबर, माचीस, कागद, गोंद इत्यादी सर्व वस्तू या तयार केल्या जातात.
मानवाचा आणि निसर्गाचा संबंध
मानव आणि निसर्ग यांचा सर्वात पुराना संबंध आहे. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानवाचे जीवन हे पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि पाणी या पाच तत्त्वांवर आधारित आहे.
निसर्ग हा प्रत्येक मानवाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. या सुंदर निसर्गाच्या रूपात आपल्याला देवाचे प्रेम हे लाभले आहे. म्हणून अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार आणि कलाकार यांच्या साहित्यातील सर्वात आवडीचा विषय म्हणजे निसर्ग हा आहे.
निसर्ग ही देवाने बनवलेली सर्वात सुंदर आणि आकर्षक कलाकृती आहे. निसर्ग हा असंख्य रंगांनी परिपूर्ण आहे. या निसर्गाच्या कुशीमध्ये सर्व जिवंत सजीव सृष्टी, मानव आणि निर्जीव वस्तू सुद्धा सामावलेले आहेत.
निसर्ग आपला गुरु
निसर्ग हाच आपला गुरु, मित्र आणि डॉक्टर सुद्धा आहे. ज्या प्रमाणे एक गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. तसेच त्याला ज्ञान देऊन एक परिपूर्ण मानव म्हणून घडवितो.
तसेच हा निसर्ग सुद्धा आपल्याला खूप काही शिकवतो. निसर्ग हा बोलत नाही. परंतु आपल्या कृतीतून सर्वकाही शिकवतो. जसे फुल काट्यात फुलते तसेच आपणही प्रत्येक संकटात हसत राहिले पाहिजे.
झाडांप्रमाणे खंबीर उभे राहून नेहमी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. जशी नदी वाहताना अनेक अडथळ्यांचा सामना करतो. तसेच आपणही अनेक संकटाना न घाबरता सामोरे जायला हवे.
निसर्गावर परिणाम
हा निसर्ग आपल्याला खूप काही देतो. परंतु मानव निसर्गामध्ये असणाऱ्या झाडांची दिवसेंदिवस तोड करत आहे. तो तोड करताना झाडांचा विचार करत नाही आहे.
तसेच वाढत्या आधुनिकीकरणामुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचे सौंदर्य कमी होत चालले आहे. आकाशातील चांदोबा हा उंच – उंच इमारतींच्या मागे लपलेला आहे. जंगल तोडीमुळे पाऊस कमी पडत आहे. तसेच अनेक प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत.
अतिवृष्टीमुळे नद्या – नाल्यात पूर येऊन शहरे नष्ट होत चालली आहेत. तर कधी भूकंपाने हजारो घरे उध्वस्त होत चालली आहे. या सर्वांचा वाईट परिणाम या निसर्गावर होत आहे.
निष्कर्ष:
आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, आपण सर्वानी निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे. जर हा निसर्ग सुंदर राहिला तर या धरतीवरील मानवाचे आणि अन्य प्राण्यांचे, पक्ष्यांचे जीवन सुरक्षित राहील.