प्रस्तावना:
आम्ही सर्वजण सुंदर ग्रहावर राहतो. तो ग्रह म्हणजे – पृथ्वी होय. जी खूपच सुंदर आणि हिरवीगार पालवीसह आकर्षक आहे. पृथ्वी हा एक एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवनाचा प्रवाह चालतो. तसेच निसर्ग हा आपला चांगलाच साथीगार आहे. जो आम्हा सर्वाना या पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी अन्य प्रकारची संसाधने उपलब्ध करतो.
आपल्या सौर मंडळात अनेक ग्रह आहेत. पण आपल्याला माहित असलेल्या ग्रहांवर निसर्गाचे एक भयानक रूप आहे आणि मानवाला जीवन जगण्यासाठी संसाधने उपलब्ध नाहीत.आमची लाडकी पृथ्वी ही सर्व ग्रहांपेक्षा वेगळी आहे. या निसर्गाने पृथ्वीवर हिरव्यागार आकर्षणाचा प्रसार केला. हा निसर्ग आपल्याला जीवन देतो.
निसर्गाची रचना –
तसेच निसर्ग हा देवाने मानवाला दिलेली सुंदर भेट आहे. म्हणून आपण सर्वजण जे काही वापरतो ती सर्व निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून आपण सर्वानी तिचे जतन केले पाहिजे.
विविध गोष्टी
ईश्वराची देणगी
तसेच काही कारणांमुळे निसर्गाचे संतुलन बिघत चालले आहे. या सर्वाला मुख्य जबाबदार मानव आहे. मानव स्वतःच्या फायद्यासाठी या निसर्गाला दुखावत आहे.
निसर्ग आपला मित्र
निसर्ग हा आपला सर्वात चांगला मित्र आहे. कारण आपण सर्व ज्या ग्रहावर राहतो आणि त्याच्या सर्व भागात आपल्याला निर्सगाचे सौंदर्य पाहायला मिळते.या निसर्गाने मानुषयाला भरपूर काही दिले आहे.
परंतु मानव त्याचा दिवसेंदिवस नाश करत आहे. मानवाने आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस यांसारखी विनाशकारी कारणे आणि समस्या तयार केली आहेत.
प्राण्यांना जीवनात महत्त्व
माणसाच्या जीवनात जेवढे निसर्गाचे महत्त्व आहे तेवढेच प्राण्यांच्या जीवनात सुद्धा आहे. जसे माणसाला राहण्यासाठी घराची वश्यकता असते. त्याच प्रमाणे निसर्ग हेच प्राण्यांचे घर आहे.
जर या धरतीवर प्राणी नसतील तर जीवन अशक्य आहे. कारण आपला स्वभाव सुशिक्षित ठेवण्यासाठी प्राण्यांचे संरक्षण देखील फार महत्वाचे आहे.
निसर्गाचे संरक्षण करण्याचे उपाय
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तसेच जास्तीत – जास्त झाडे लावून जमीनीची धूप रोखली पाहिजे.
अन्य प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
मानवाने आपल्या स्वार्थासाठी कधीच या निसर्गाचा समतोल बिघडू नये.
आपण सर्वानी देवाने दिलेल्या या अमूल्य देणगीचा आदर केला पाहिजे.
तसेच निसर्गाच्या नियमांनुसार त्याच वापर केला पाहिजे.
निष्कर्ष:
पृथ्वीवरील प्रायटेक व्यक्तीने या निसर्गाला त्रास न देता त्या निसर्गाचा आनंद घ्यावा. निसर्ग हि देवाने दिलेली अद्भुत देणगी आहे.
हा निसर्ग खूप सुंदर आहे ज्यामध्ये अनेक महत्तवपूर्ण शक्ती आहेत. ज्या आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन देतात. म्हणून आपण सर्वाना या निसर्गाची रक्षा केली पाहिजे.
मराठीतील निसर्ग निबंधा संदर्भात अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली आपली टिप्पणी देऊन आम्हाला विचारू शकता.