प्रस्तावना:
आपल्याला अनेकदा शाळेमध्ये स्वतः वर निबंध लिहायला सांगितला जातो. तसेच स्वतःची ओळख सांगण्यास सांगितले जाते. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे वेगवेगळे असते. ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते.
स्वतःचा परिचय
नमस्कार, माझे नाव कुणाल देशपांडे आहे आणि मी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. माझे वय १३ वर्ष इतके आहे. मी आज ज्या शाळेत शिकत आहे ती शहरातील सर्वात उत्तम शाळा आहे.
माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यामंदिर असे आहे. माझी शाळा ही माझ्या घरापासून थोड्या अंतरावर आहे. मो नेहमी शाळेत चालत जातो.
अगदी सुरुवातीपासून मला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी चांगली मूल्ये शिकवली आणि चांगले संस्कार सुद्धा दिलेत. जसे की वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे, त्यांचे म्हणणे मानने, वृद्ध आणि गरीब लोकांना सहायता करणे. तसेच प्रत्येक व्यक्तीशी सुसंगत राहणे.
माझे कुटुंब
माझ्या कुटुंबात ऐकूण १० सदस्य आहेत. माझ्या कुटुंबात माझे आजी – आजोबा, आई – वडील, काका – काकी, माझे दोन भाऊ आणि बहीण इ सर्व आम्ही प्रेमाने आणि एकत्र राहतो.
माझे बाबा हे कर विभागात एक सरकारी अधिकारी आहेत. ते अतिशय शिस्तबद्ध व्यक्ती आहेत. ते माझ्या एक मूर्ती आणि प्रेरणास्रोत आहेत.
आई एक शिक्षिका
माझी आई ही एक सरकारी शाळेत शिक्षिका आहे. ती आपल्या कामाबरोबर घरातील सर्व माणसांची अगदी चांगल्या प्रकारे काळजी घेते. माझा छोटा भाऊ माझ्या शाळेत इयत्ता ३ मध्ये आणि माझी बहीण इयत्ता ४ मध्ये शिकते.
माझ्या घरी आजी – आजोबा आहेत ज्यांच्याशी माझा खूप बंध आहे. त्यांच्या बरोबर माझा मोकळा वेळ घालविण्यासाठी मला खूप आवडते. ते मला माहिती पूर्वक गोष्टी सांगतात आणि माझे जीवन अनुभव सांगतात.
तसेच ते मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. ज्यामुळे माझे मनोबल वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
माझे व्यक्तिमत्व
मी एक शांत स्वभावाचा मुलगा आहे. मी सगळ्यांसाठी एक आदर्श आणि सुसंस्कृत मुलगा आहे. मला नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदत करायला आवडते.
माझ्या द्वारे केले गेलेले कोणतेही काम किंवा बोलणे यामुळे इतर कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात नाहीत याची काळजी घेतो . तसेच मी सर्वाना आनंदित पाहू इच्छितो.
माझ्या चांगल्या सवयी
माझ्या अनेक चांगल्या सवयी आहेत. कारण मी माझी सर्व कामे वेळेतच पूर्ण करतो. तसेच मला अन्य प्रकारच्या झाडांची आणि फुलझाडांची लागवड करायला वाढते. त्याच बरोबर त्यांची काळजी घ्यायला आवडते. मला नियमित दिनक्रम पाळायला वाढतो.
माझे ध्येय
मला माझ्या जीवनामध्ये एक यशस्वी डॉक्टर बनायचं आहे आणि गरीब, पीडित आणि असहाय लोकांवर उपचार करायचं आहे. जेणेकरून या लोकांना नवीन जीवन मिळू शकेल. तसेच ते आपले जीवन आनंदाने जगू शकतील.
माझा छंद
माझे अनेक छंद आहरेत. जसे की मला रिकाम्या वेळेत गोष्टींची पुस्तक वाचायला आवडतात. तसेच संगीत ऐकणे, टीव्ही पाहणे, गाणे ऐकणे आणि फिरायला सुद्धा वाढते. मी कधी – कधी सुट्टीच्या दिवशी नदीकाठी फिरायला जात असे. मला मासे पकडायला खूप आवडते.
माझ्या आवडत्या गोष्टी
मला आईसस्क्रीम खूप आवडते. माझे बाबा मला दर रविवारी आईसस्क्रीम खायला घेऊन जातात आणि मी मोठ्या आनंदाने खातो.
तसेच मला डोसा पण खूप आवडतो. माझी आजी कधी – कधी घरी डोसा बनवते आणि तिच्या हातचा डोसा घरातील प्रत्येक सदस्याला खूप आवडतो.
निष्कर्ष:
मी माझ्या जीवनामध्ये नेहमीच एक आदर्श आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. मी माझे व्यक्तिमत्व अधिक सुधारण्यासाठी आणि माझ्यातील उणीव दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसेच मी इतर लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो.