माझे आवडते शिक्षक मराठी निबंध – वाचा येथे My Teacher Essay in Marathi

प्रस्तावना:

आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षक महत्वाचे स्थान आहे. कारण शिक्षक आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाच्या गोष्टी शिकवतात. म्हणून शिक्षकांना देवापेक्षा सर्वात उच्च स्थान दिले आहे.

शिक्षक हे एका मातीची भांडी बनवणाऱ्या कुंभारा प्रमाणे असतात. कारण कुंभार एका हाताने मातीची भांडी बनवताना हाताळतो आणि दुसऱ्या हाताने त्यांना योग्य आकार देतो.

तसेच शिक्षक सुद्धा मुलांना चांगल्या प्रकारे ज्ञान देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करतो. एका शिक्षकांशिवाय चांगल्या समाजाची कल्पना करता येणार नाही.

एक माळी म्हणून शिक्षक केवळ वनस्पतींचे पालन – पोषण करत नाही तर संस्काराच्या रूपात एका बहार आलेल्या फुलांना बहरून सद्गुणांचा सुंगंध देखील देतात.

माझे आवडते शिक्षक

माझ्या आवडत्या शिक्षकांचे नाव आहे रमेश देशपांडे. ते गणित विषयाचे चांगले शिक्षक आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. तसेच त्यांच्या प्रभावी व्यक्तित्वामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थी त्यांचे कौतुक करतो.

त्याच प्रमाणे त्यांचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना समान प्रमाणे वागणूक देतात. सर्वांसोबत नम्रतेने आणि सौम्यतेने वागतात.

माझे शिक्षक माझी मूर्ती

मी माझ्या रमेश सरांना माझा आदर्श आणि प्रेरणा मानतो. ते एक असे शिक्षक आहेत की, संपूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि चिकाटीने अज्ञान विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश भरतात.

ते जोपर्यंत विद्यार्थी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तंदुरुस्त होत नाही तोपर्यंत कठोर परिश्रम घेत असतात. रमेश सरांचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व मला खूप प्रेरणा देते.

रमेश सर मला का आवडतात

माझे रमेश सर यांचे स्पष्ट बोलणे, शांत स्वभाव आणि दयाळू, कोमल व सौम्य वागणे मला खूप आवडते. ते गणित हा विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. जर कोणत्या मुलाला समजले नाही तर अत्यंत चांगल्या प्रकारे परत सांगतात.

तसेच त्यांनी गणितामध्ये मला बळकटी देण्यात मदत केली. त्यांची अद्वितीय आणि प्रभावी जीवन शैली मलाच नाही तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सक्षम आणि यशस्वी करण्यात मदत करते.

माझ्यासाठी प्रेरणा स्रोत

माझे आवडते शिक्षक हे सर्व विद्यार्थ्यांना अगदी कोमलतेने वागवतात. तसेच त्यांना आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करतात.

रमेश सरांनी मला एक चांगला विद्यार्थी म्हणून घडविण्यात खूप मदत केली आहे. त्यांनी मला माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे शिक्षण देऊन घडविले आहे.

रमेश सरांनी माझ्या चुकांबद्दल मला कधी मारले नाही. त्या ऐवजी त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले आहे. म्हणून ते माझ्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहेत.

माझे शिक्षकांशी नाते

माझे आवडते शिक्षक आणि माझे नाते हे एक शिक्षक आणि शिष्य नसून ते मला एका मित्रासारखे आहेत. मला अभ्यासाबरोबर माझ्या वैयक्तिक समस्या देखील समजून घेतात. तसेच ते मला योग्य मार्गदर्शन देऊन मला पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

निष्कर्ष:

माझे आवडते शिक्षक हे मला पुढे जाण्याची प्रेरणा देत नाही तर माझ्यामध्ये सकारात्मक भावना देखील जागृत करतात. आज त्यांच्यामुळे मी एक आदर्शवादी आणि नैतिकतापूर्ण बनू शकलो. मी माझ्या प्रिय शिक्षकांना इतकेच संगी इच्छितो की,

तुमचे आभार कसे मानावेत यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आज मी जो आहे ते तुमच्यामुळे. कारण तुम्ही मला चांगल्या प्रकारे ज्ञान देऊन मला घडवलं. म्हणूनच मला माझ्या आवडत्या सरांचा खूप अभिमान वाटतो आणि मला माझे सर खूप – खूप आवडतात..

Updated: दिसम्बर 17, 2019 — 1:55 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *