सहल वर निबंध – वाचा येथे My Picnic Essay in Marathi

प्रस्तावना:

आजच्या जीवनामध्ये मानवाला करमणुकीची आवश्यकता आहे. कारण सर्व लोक हे दररोज काम करून कंटाळतात आणि त्यांना काळजीपासून दूर राहण्यासाठी करमणुकीची आवश्यकता असते.

या सर्वांपासून दूर होण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे – सहल. आपण सर्वानी वेळेच्या नुसार सहलीची योजना बनविली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला रोज – रोज काम करून खूप कंटाळा येतो म्हणून कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करतात.

कोणी दोन दिवसांची सुट्टी घेऊन जातो, तर कोणी एक आठवडा सुट्टी घेतात. बरेच लोक हे नैसर्गिक, डोंगराळ भागात किंवा बागांमध्ये अशा ठिकाणी जातात.

सहलीची तयारी

आमची सहामाही परीक्षा संपली होती आणि आम्ही परिश्रम करून खूप थकलो होतो. म्हणून आमच्या शाळेतील शिक्षकांनी आमच्यासाठी सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. हे ऐकताच आम्ही सर्वजण आनंदाने नाचू लागलो. वर्गामध्ये सहलीविषयी करायची तयारी या संदर्भात चर्चा करण्यात आली.

तसेच कर्तव्ये सुद्धा सुरु झालीत. सर्व मुलांचे चार – पाच गट तयार करण्यात आले. खाद्य पदार्थांचे नियोजन करण्यात आले. तसेच स्वयंपाकाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. सहलीच्या आदल्या दिवशी एका गटाने भांडीची व्यवस्था केली, दुसऱ्या गटाने फळे, भाज्या व इतर खाद्य पदार्थांची खरेदी केली.

सहलीला जाण्यासाठी बस

सहलीला जाण्यासाठी आम्ही सकाळी ८ वा. शाळेत पोहोचलो. तिथे बस उभी होती आणि काही मुलांनी सर्व सामान हे बसमध्ये ठेवलं.

सहलीला जाण्याचा क्षण हा आमच्यासाठी खूप आनंददायी होता. सर्व मुलांमध्ये एकता आणि परस्पर सहकार्याची भावना दिसत होती. उन्हाळयाचा महिना होता आणि मस्त हवा वाहत होती.

बस ही गतीने गतीच्या दिशेने धावत होती. दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडांच्या ओळी आणि हिरवेगार शेत हे मन मोहून टाकत होते.

सहलीचा प्रवास

हलणारी बस, वाहणारी हवा आणि ओठांवर गोड गाणी हे सगळं अगदी मजेशीर वाटत होत. जणू काही आम्ही सुंदर स्वर्ग लोकांकडे जात आहोत असे वाटतं होते. यामुळे काही मुले ही आनंदाने नाचू लागली.

त्याच प्रमाणे आमच्या शहरापासून दूर नदीकाठी एक सुंदर आणि भव्य अशी बाग विकसित केली आहे. त्यामध्ये फुलांची झाडे होती. झाडांच्या दाट सावलीशिवाय मुलांसाठी झरे, झुलायला झुले सुद्धा होते. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी १० वा. पोहचलो. तेथे चार हॉटेल्स होती. काही लोक हे आपल्या कुटुंबासोबत तेथे हजार होते.

तेथील वातावरण हे खूप मस्त होत. तिथे पोहचल्यावर आम्ही झाडांच्या सावलीत बसलो आणि सतरंजी पसरवली. थोड्या अंतरावर मातीची भांडी, फळे, भाज्या आणि जेवण बनविण्यासाठी सामान ठेवले.

सहलीची मजा

काही मुले तेथील नदीमध्ये आंघोळ करू लागली तर काही मुले त्यात पोहू लागली. त्यामध्ये बोटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.

त्यानंतर मुले वेगवेगळे खेळ खेळू लागली. या मैफिलीच्या  ठिकाणी मुले मैत्री, प्रेम आणि सहकार्याचे भाव प्रदर्शित करत होते. हे सर्व आम्ही या पूर्वी कधीच पाहिले नाही होते. त्यानांतर आम्ही सर्व जेवायला गेलोत.

जेवणामध्ये वाटाणे, पुलाव, शाही पनीर, बटाटा रायता, उडीद डाळ, चपाती आणि कोशिंबीरीचे पदार्थ होते. आम्हा हे जेवण खूप चवदार वाटले. जेवणानंतर आईसक्रीमचे वाटप करण्यात आले. असा संपूर्ण दिवस हा सहलीमध्ये गेला.

निष्कर्ष:

जेव्हा आपण सहलीला जातो तेव्हा खूप मजा येते. तो दिवस आपल्या नेहमी स्मरणात राहतो. तसेच निसर्गाचे सौंदर्य बघायला सुदधा चांगले वाटते. सहलीचा प्रत्येक क्षण हा मनोरंजक असतो. म्हणून प्रत्येक मुल सहलीला जाण्यासाठी खूप आनंदित होतो.

Updated: दिसम्बर 17, 2019 — 1:44 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *