प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचे स्थान म्हणजे – घर होय. या जगामध्ये घरासारखे दुसरे कोणतेच सुंदर स्थान नाही. प्रत्येक मानवी जोड ही घराशी संलग्न असते. म्हणून घर लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाला आपले घर खूप आवडते.
म्हणून घर हे प्रेम, काळजी आणि एकमेकांशी जवळीक करण्याची भावना असल्याचे प्रतीक आहे. घर हा एक छोटा दोन अक्षरी शब्द आहे. परंतु प्रत्येकाच्या मनात घराला स्वतंत्र स्थान आहे. आपण आपल्या घरात हक्काने विश्रांती घेऊ शकतो.
माझे घर
आज मी ज्या घरात जन्माला आलो आहे ते माझ्या जीवनातही सर्वात महत्वाचे स्थान आहे. मला माझे घर खूप आवडते आणि ते साताऱ्यामध्ये आहे. माझे घर हे आजोबानी बांधलेले म्हणजे वडिलोपार्जित घर आहे.
माझ्या घरामध्ये आजी – आजोबा, आई – वडील, काका – काकी, माझा धाकटा भाऊ आणि बहीण राहते. माझे घर जरी विटा आणि सिमेंटचे बनलेले असले तरी माझा माझे घर खूप – खूप आवडते.
कारण माझ्या घरामध्ये सर्व सदस्य एकत्र आणि सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने राहतात. माझ्या घरामध्ये प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळी खोली आहे. तसेच स्वयंपाक करण्यासाठी वेगळी खोली आहे आणि एक देवाची खोली सुद्धा आहे.
सुंदर बाग
माझ्या घराच्या समोर एक सुंदर बाग आहे. त्या बागेमध्ये सुंदर फुलांची झाडे आहेत आणि गावात सुद्धा आहे. जसे की गुलाब, चमेली, जाई – जुई, अबोली, आणि सुवासिक वनस्पती आहेत. ज्यामुळे घरातील वातावरण सुंगंधीत आणि स्वच्छ राहत.
तसेच याशिवाय बागेमध्ये फळझाडे सुद्धा लावली आहेत. जसे की पेरू, आंबा, फणस इ. त्याच बरोबर आम्ही बागेच्या एका बाजूला भाज्या देखील करतो.
विविध सण
माझ्या घरामध्ये अन्य सण हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. तसेच प्रत्येक सण रीती – रिवाजानुसार पार पाडले जातात. दरवर्षी गणेश चतुर्थी, दिवाळी आणि होळी हे सण येतात तेव्हा माझे घर रंगीन केले जाते.
घराला अत्यंत सुंदर प्रकारे सजवले जाते. माझ्या घरातील सर्व माणसे प्रत्येक सण मिळून – मिसळून आणि एकत्र साजरे करतात. तसेच मकर संक्रांति या सणाच्या दिवशी आम्ही सर्व लहान भावंडे मिळून पतंग उडवतो.
माझे घर हे गावात म्हणजे खेड्यात असल्यामुळे इथले वातावरण शहरांपेक्षा खूप स्वच्छ आहे. येथे शहरांसारखा आवाज येत नाही. ज्यामुळे आपण घरात आरामात राहू शकतो.
तसेच माझ्या गावात सगळीकडे हिरवळ असल्याने प्रदूषणाची आणि अन्य समस्या कमी प्रमाणात उदभवतात.
माझ्या गावात एक छोटी नदी आहे. या नदीला नेहमी पाणी असते. त्यामुळे आम्हाला कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच हिरवळ देखील राखली जाते.
प्राण्याचें पालन
माझ्या घरामध्ये गाय, बैल, कोंबड्या आणि शेळ्या यांचे पालन केले जाते. मी आणि माझी लहान भावंडे लहान बकऱ्यांच्या मुलांबरोबर रोज खेळत असतो.
आम्हाला दररोज गायीचे दूध प्यायला मिळते. माझ्या घरातील आजी – आजोबा सांगतात की, गायीचे दूध पिल्याने आपण निरोगी राहतो. तसेच काही दिवसांनी माझ्या काकांनी एका नवीन सदस्याला घरी आणले होते – तो म्हणजे आमचा लाडका कुत्रा होता.
जो पाहण्यात खूप प्रेमळ होता. काही दिवसातच आमची त्याच्याशी चांगली मैत्री झाली होती. जेव्हा माझे आजोबा बाजारात जातात तेव्हा त्याला आपल्या सोबत घेऊन जातात.
निष्कर्ष:
माझे घर हे सुंदर आणि मिलनसर घर आहे. जर मला कधी माझ्या घरापासून दूर जावे लागले तर मला माझ्या घराची खूप आठवण येते. मी माझ्या घरावर खूप प्रेम करतो आणि मला माझे घर खूप – खूप आवडते. मला माझे घर नंदनवनसारखे वाटते.