प्रस्तावना:
आजी – आजोबा हे आपल्या जीवनातील महत्वाची दोन माणसे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ज्याप्रमाणे आईचे अस्तित्व असते त्याच प्रमाणे आजीचे सुद्धा असते.
जशी आई प्रत्येक मुलाबाबरोबर एक सावली बनून उभी राहते तशीच आजीमध्ये एक प्रेमाची भावना आणि गोडपणा असतो. ज्या मुलाला आजीचे प्रेम मिळते तोच तिचे महत्त्व समजू शकतो.
माझी आजी
धार्मिक महिला
मंदिरात गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटते. ती मला नेहमी सांगते की, सकाळी लवकर उठलं पाहिजे. कारण सूर्याची किरणे अंगावर पडली की, अन्य आजार दूर होतात.
माझी आजी नेहमी छोट्या – छोट्या गोष्टींबद्दल काळजी करत बसते. ती दररोज देवाकडे कुटुंबाच्या आनंदासाठी प्रार्थना करत असते. तसेच माझी आजी मला रात्री झोपताना गोष्टी सांगते.
विविध खाद्य पदार्थ
माझी आजी खूप चांगले – चांगले खाद्य पदार्थ बनवून आम्हाला खायला घालते. मला आजीच्या हातच जेवण बनवलेल खूप आवडत.
आम्ही सर्व एकत्र बसून जेवतो आणि जेवताना मला आजीच्या बाजूला बसायला खूप आवडत. ती आम्हाला नेहमी सांगत असते की, जेवताना माणसाने कधी बोलू नये.
माझी आजी माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा ती माझ्या बाजूला येऊन बसते. माझे आई – वडील कामाला जातात. म्हणून संपूर्ण घराची जबाबदारी ही तिच्यावर पडते.
माझ्या आजीला घरातील सर्व कामे करावी लागतात. माझी आजी आमच्या सर्वांची काळजी घेते आणि त्याच बरोबर घरातील कामे सुद्धा करते.
करारीपणा
माझी आजी जरी करारी असली तरी ती मनातून अत्यंत प्रेमळ आहे. आजीचे प्रेम ज्यांना मिळते ते खूप भाग्यवान असतात. माझी आजी ही आम्हा सर्व नातवंडांसाठी काहीही करायला तयार असते. आम्ही सर्व तिचे खूप लाडके आहोत.
आम्हाला कधी – कधी सुट्टी असल्यावर ती आमच्या सोबत चेस, सापशिडी आणि व्यापार खेळते. आणि या सर्व खेळांमध्ये माझी आजीचं जिंकते. आम्हाला सुट्टी लागली कि कुठेच बाहेर जावे लागत नाही.माझ्या आजीमुळे आम्हाला घराचे सर्व सुख मिळते.
शिस्तीचे महत्त्व
माझ्या आजीने मला नेहमीच शिस्तीचे महत्त्व शिकवले आहे. माझी आजी म्हणायची प्रत्येक व्यक्तीच्या अंगी शिस्त ही असली पाहिजे. तसेच ती मला वेळेचा सदुपयोग करायला सांगायची.
मला बोलायची कि एकदा गेलेली वेळ ही आपल्या आयुष्यात पुन्हा कधी येत नसते. आणि जो व्यक्ती शिस्तीचे आणि वेळेचे महत्त्व सम्जतॊ तो आपल्या जीवनात नेहमी यशस्वी होतो.
निष्कर्ष:
माझी आजी ही सर्वात चांगली आजी आहे. मला माझ्या आजीवर खूप प्रेम आहे. मला माझी आजी एक आदर्श व्यक्ती वाटते. ज्या मुलांना आजी नसते त्या मुलांची मला खूप दया येते. प्रत्येक जन्मात मला तीच आजी मिळावी अशी माझी इच्छा आहे.